मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
देवा किती सोसावा । ह्या ...

भक्ति गीत कल्पतरू - देवा किती सोसावा । ह्या ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


देवा किती सोसावा । ह्या द्वैत मत्सर भावा ॥धृ०॥

हें मीपण छळीतें भारी । तें तूंपण जाय कधीतरी ।

हा भेद राहे कुठवरी । तें ऐक्य होय केधवा ॥देवा० ॥१॥

जरी केलें तुझें तें ध्यान । तरी द्वैत त्यांत तें जाण ।

तें ध्येय ध्यातें पण । कधी ऐक्य होय ह्या जीवा । देवा० ॥२॥

जरी झाले ब्रह्मज्ञान । तरी अहंपण उठोन ।

करी दूर स्वरुपांतून । कधी ऐक्य योग घडावा । देवा० ॥३॥

वारीची आंस ही मनीं । हें द्वैत जावें निरसुनी ।

हीं सर्व एक होवुनी । स्वानंद मेवा घ्यावा । देवा० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP