मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
माझें मागणें , मागणें हें...

भक्ति गीत कल्पतरू - माझें मागणें , मागणें हें...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


माझें मागणें, मागणें हें तव पायीं ।

ऐक्य भक्ति ही मला देई । माझें मागणें ॥धृ०॥

नांव जरी भक्त, तरी नोव्हे विभक्त ।

प्रेम लक्षणा करणें व्यक्त । प्रेम लक्षणें, चित्त होय सक्त ।

अखंड हरीपदीं अनुरक्त । माझें मागणें० ॥१॥

देई तव भक्ति, भक्ति अंतरींची । वार्ता नसो ती द्वैताची ।

प्रेमरस भरें, गोडी लागो त्याची ।

इच्छा पुरवी ही मनींची ।माझें मागणें० ॥२॥

हरी तुझ्या ऐक्य, भक्तींत रंगावें ।

स्वानंद सुखा न भंगावें । अखंड तव नाम प्रेमाने गावें ।

वारीसी हेंची तुंवा द्यावें । माझें मागणें० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP