मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
पंचदेव जप साधना

पंचदेव जप साधना

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


रुद्राक्षमाला जपसिद्धीसाठी महत्त्वपूर्ण माध्यम आहे. पंचदेव पूजत याद्वारे जपानुष्‍ठान केल्याने शीघ्र सफलता प्राप्‍त होते. महामृत्युंजयासारख्या अत्यंत कल्याणकारी साधनेतही रुद्राक्षाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे .

कुठलीही साधना विधीपूर्वक केल्याने फलदायी होते. साधकाने स्नानादी कर्म निवृत्त होऊन पवित्र ठिकाणी बसून साधना केली पाहिजे. चित्तसुद्धा पवित्र व शांत असावे . आरडाओरड गोंधळापासून दूर एकान्त ठिकाणी जप करणे आवश्यक आहे.

अनुष्‍ठान असल्यास सर्वप्रथम त्याचा संकल्प करावा. त्यानंतर विनियोग ऋष्यादिन्यास, करन्यास, ह्रुदयादिन्यास, अक्षरन्यास , ध्यान, इष्‍टदेवाचे षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन केले पाहिजे. पुष्पमाला समर्पण, प्रदक्षिणा इत्यादी सर्व कार्यद्वारा पूजन पूर्ण झाल्यावर जप केला जातो .

विभिन्न फलदायक मंत्र :

या ठिकाणी इच्छा-पूर्ती, संकटनाश, रोग-निवारण यांसाठी काही मंत्रांचा उल्लेख केला जात आहे. त्यांचा जप रुद्राक्षमालेने करावा.

महामृत्युंजय मंत्र :

हा मंत्र सर्व प्रकारचे रोग-निवारणात अमोघ मानला जातो. कुठल्याही प्रकारची असाध्यावस्था असो याच्या प्रभावाने दूर होते. मरणासन्न व्यक्‍तीसुद्धा या मंत्रप्रभावाने चांगली होते . हा मंत्र रुद्राक्षमाळेद्वारा जपल्यावर आपले फल दाखवितो.

त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्‍टिवर्धनम्‌ ।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुंक्षीय मामृतात्‌ ॥

जर या मंत्राचा संपुटयुक्‍त जप केला जाईल तर शीघ्र फल देणारा होतो. याचे अनुष्‍ठान सव्वा लक्ष जपाने पूर्ण होते. संपुटयुक्‍त मंत्र खालीलप्रमाणे आहे.

ॐ हौं जूं सः, ॐ भुर्भुवः स्वः, ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्‍टि वर्धनम्‌ ।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुंक्षीय मामृतात्‌ ।

स्वः भुवः भूः ॐ, सः जूं हौ ॐ ।

अनुष्‍ठान पूर्ण झाल्यावर जपाचे दशांश हवन व हवनाचे दशांश तर्पण केले पाहिजे. तर्पणाचे दशांश मार्जन व ब्राह्मण भोजन करावे. जप समाप्‍तीनंतर खालील मंत्राने शंकराची प्रार्थना करावी .

गुहयातिगुहय गोप्‍ता त्वं गृहाणास्मत्कृतं जपम्‌ ।

सिद्धिर्भवति मे देव त्वत्प्रसादान्महेश्‍वर ॥

मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतम्‌ ।

जन्ममृत्युजरारोगैः पीडितं कर्मवन्धनैः ॥

मृत्युंजय मंत्र :

महामृत्युज्जय महान जपसाधना आहे. याचे एक लघु विधान सुद्धा आहे. व ते सुद्धा सर्व रोगांचे निवारक मानले आहे. या मंत्राचा अकरा लक्ष जप करणे उत्तम आहे किंवा सव्वा सव्वा लक्ष जप करावा . मंत्र अशा प्रकारे आहे.

ॐ जूं सः, पालय पालय सः जूं ॐ ।

जेवढा जप केला जाईल त्याच्या दशांश हवन व हवनाचे दशांश ब्राह्मण भोजन केले पाहिजे. जपासाठी फक्‍त रुद्राक्षमालेचाच उपयोग करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP