मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
गायत्रीमंत्र व रुद्राक्ष-धारण

गायत्रीमंत्र व रुद्राक्ष-धारण

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


सर्व मंत्रांत गायत्री मंत्र प्रमुख आहे. ज्या ठिकाणी कुठल्याच मंत्राचा उल्लेख नसेल त्या ठिकाणी गायत्री मंत्राचा प्रयोग करु शकता. एका विशिष्‍ट कार्यासाठी विशिष्‍ट मंत्र आहे व ऐन वेळी त्याची आठवण नसेल अशावेळी गायत्री मंत्राचा उपयोग करावा . मांत्रिक, तांत्रिक कुठलाही प्रयोग असो गायत्री मंत्र लाभदायक आहे. हा मंत्र संध्यासमयी मुख्य रुपाने प्रयुवत होतो.

"ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्‌ !"

जर आपण ज्या कुठल्या देवतेचे उपासक असाल त्या देवतेसंबंधित गायत्री मंत्राचाही प्रयोग करु शकता. काही मुख्य देवतांसंबंधी गायत्री मंत्राचा उल्लेख आवश्यक असल्याकारणाने या ठिकाणी देत आहे .

१.

गणेश गायत्री :- "ॐ एक दंष्‍ट्राय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्‌ ।"

२.

ब्रह्म गायत्री :- "ॐ चतुर्मुंखाव विद्महे हंसारुढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्‌ ।"

३.

विष्णु गायत्री :- "ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्‌ ।"

४.

रुद्र गायत्री :- "ॐ पंचवक्‍त्राय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्‌ । "

५.

नृसिंह गायत्री :- "ॐ उग्रनृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नो नृसिंह प्रचोदयात् ‌ ।"

६.

वरुण गायत्री :- "ॐ जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात् ‌ ।"

७.

यम गायत्री :- "ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यमः प्रचोदयात् ‌ ।"

८.

राम गायत्री :- "ॐ दाशरथये विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात्‌ ।"

९.

कृष्ण गायत्री :- "ॐ देवकीनन्दनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्णः प्रचोदयात् ‌ ।"

१०.

हनुमान गायत्री :- "ॐ आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुतिः प्रचोदयात्‌ ।"

११.

लक्ष्मी गायत्री :- "ॐ महालक्ष्म्यै विद्महे विष्णुप्रियायै धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ‌ ।"

१२.

सरस्वती गायत्री :- "ॐ सरस्वत्यै विद्महे ब्रह्मपुत्र्यै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ‌ ।"

१३.

दुर्गा गायत्री :- "ॐ दुर्गा देव्यै विद्महे शक्‍तिरुपाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ‌ ।"

१४.

सीता गायत्री :- "जनकनन्दिन्यै विद्महे भूमिजायै धीमहि तन्नो सीता प्रचोदयात् ‌ ।"

१५.

राधा गायत्री :- "ॐ वृषभानुजायै विद्महे कृष्णप्रियायै धीमहि तन्नो राधा प्रचोदयात् ‌ ।"

१६.

तुलसी गायत्री :- "ॐ श्री तुलस्यै विद्महे विष्णुप्रियायै धीमहि तन्नो वृन्दा प्रचोदयात्‌ ।"

१७.

इन्द्र गायत्री :- "ॐ सहस्‍त्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इन्द्रः प्रचोदयात्‌ ।"

या प्रकारे इतर देवतांसंबंधी गायत्रीचे प्रयोग केले जाऊ शकतात. त्यातील कुठला सिद्ध करण्याचा असेल तर कमीत कमी सव्वा लाख जप करुन त्याचे दशांश हवन, त्याचे दशांश तर्पण व त्याचे दशांश ब्राह्मण भोजन करावे . वरील कुठल्याही गायत्रीच्या सिद्धमंत्राने रुद्राक्षास अभिमंत्रून धारण केल्याने शीघ्र फल प्राप्‍त होते.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP