मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
अंगानुसार रुद्राक्षधारण मंत्र

अंगानुसार रुद्राक्षधारण मंत्र

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


रुद्राक्ष धारणेच्या वेळी मंत्र उच्चारणाचे फार महत्त्व आहे. शास्‍त्रकारांनी अंगानुसार मंत्र सांगितले आहेत. ज्या अंगी रुद्राक्ष धारण केले जातील त्याच्याशी संबंधित मंत्राचा उच्चार केला पाहिजे .

डोळे तसेच कानात रुद्राक्ष धारण करते वेळी खालीलप्रमाणे मंत्र जप करावा.

ॐ ईशानः सर्व विद्यानामीश्र्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा

शिवोमे अस्तु सदाशिवोम्‌

कंठात ( गळ्यात ) रुद्राक्ष धारण करते वेळी खालील मंत्रजप करावा.

ॐ त-पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि

तन्नो रुद्रः प्रचोदयात्‌ ।

ह्रुदय तसेच भुजामध्ये रुद्राक्ष धारण करते वेळी खालील अघोर मंत्राचा उच्चार करावा.

ॐ अघोरेम्यो घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः

या अघोर मंत्राने यज्ञोपवीत तथा कंबरेत रुद्राक्ष धारण केले जाऊ शकते.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP