मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
असें करणें होतें तुला । त...

संत चोखामेळा - असें करणें होतें तुला । त...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


असें करणें होतें तुला । तरी कां जन्म दिला मला ॥१॥

जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्‍ठुर मन केलें ॥२॥

कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥

चोखा म्हणे देवा । नका मोकलू केशवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP