मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
मी तो विकलों तुमचे पायी ।...

संत चोखामेळा - मी तो विकलों तुमचे पायी ।...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


मी तो विकलों तुमचे पायी । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥

माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥

नव मास माता वोझें वाहे उदरीं । तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥

अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP