मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह २|
वेदासी विटाळ शास्‍त्रासी ...

संत चोखामेळा - वेदासी विटाळ शास्‍त्रासी ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


वेदासी विटाळ शास्‍त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥

जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥

ब्रह्मीया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥

जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंतीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP