TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - संपवून कामधाम यावें तुझि...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


अंगाईगीत

संपवून कामधाम यावें तुझियाजवळ

पापणीशीं झेपलेंलें जरा सारावें जावळ

आवराया बाळचाळे कवळावें दोही हातीं

रागारागावत गाल कुस्करावे भुक्या ओठीं

घ्यावें बळेंच कुशींत गात अंगाई लाडकी

काऊ चिऊंची धाडावी हट्टी झोपेला पालखी !

गंध पाकळींत रात सांजावल्या क्षितिजांत

तशी यावी नीज डोळां रेशमाच्या पावलांत

जड मिटतां पापणी घ्यावें ओढून उबेंत

मायकुशीला लाभावें शिंपपण भाग्यवंत !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-02T21:03:24.7930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

simple random smpling

  • साधी यादृच्छिक नमुनानिवड ( ह्या नमुनानिवडीत समष्टीतल्या प्रत्येक घटकाची निवडसंभाव्यता सारखीच असते.) 
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site