मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - जो जो जो ग वेल्हाळ । करि ...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


जो जो जो ग वेल्हाळ । करि निद्रा गुणि बाळा जो जो जो ग ॥

कन्यारत्‍न ही जन्मली । बहु सुकृत चांगली । ऋषीनें शोधुनियां पाहिली । शुद्धमतीं गायिली । जो जो जो ग ॥

पालक चंदनसा कातियला । रंगवुनी तयार केला । खिडक्या कंगूरे हिरे मोतीं त्याल । गोफ चहूंबाजूंला ।

आणुनी मंदिरीं बांधियला । वरी चांदवा दिला । वाजंत्री वाजती सदरेला । भिमक संतोषला । जो जो जो ग ॥

कुंच कुंचली चढवुनी । घडवुनी बाळ लेणीं । सखया येतीती घेवोनी ।

शुद्ध ओटी भरुनी । नांव ठेविलें रुक्मिणी । गूळपान वाटोनी । जो जो जो ग ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP