TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - अंगाई गातें राजस बाळा ...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


अंगाईगीत

अंगाई गातें राजस बाळा

जोजवितें बाईं लाल सावळा

नीज म्हणीतें तुला वेल्हाळा

जो बाळा जो जो रे जो

पाळणा बांधिला राजमंदिरीं

पांचू मोतीं यांचा खेळणा वरी

माझीया हातीं सोन्याची दोरी

जो बाळा जो जो रे जो

मळा शिंपांचा बाळा धुंडूनी

मोतीं जमविन टिपुन टिपूनी

अंगड्या टोपड्या दिला लावूनी

जो बाळा जो जो रे जो

सरी बिंदली घातली बाळा

डूल कानींचा हालूं लागला

नईच्या वाक्यांनीं दंड सजला

जो बाळा जो जो रे जो

राघू मैनांचा नाच अंगणीं

चिऊ काऊंचा साद गगनीं

घुंगुरवाळा वाजे सदनीं

जो बाळा जो जो रे जो

चांद आभाळींचा घरासि आला

मामा लाडका बाई बाळाचा झाला

शेला चंदेरी घेऊनी आला

जो बाळा जो जो रे जो

काजळ तीट बाळाची केली

मीठ मोहर्‍यांनीं दृष्‍ट काढिली

शंका मनींची निघून गेली

जो बाळा जो जो रे जो

माझिया घरीं आनंद झाला

वर्षाराणीचा जन्म जाहला

पेढे बर्फी मी देतें सर्वांला

जो बाळा जो जो रे जो

बाई ग माझं बाळ गुणाचं

कां ग रडतं बाई लाडाचं

नीजतं बाई बाळ मैनाचं

जो बाळा जो जो रे जो

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-02T21:02:13.3100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धावरा

  • वि. १ चपळ ; धांवणारा ; वेगवान . २ जलद चालणारा ; धांवण्याचा स्वभाव असणारा ( मनुष्य , पशु ). [ धावणे ] 
  • ०गुणाकार पु. गुणाकाराचा एक प्रकार , याच्या उलट बैठा गुणाकार . गुण्याला गुणकाच्या प्रत्येक स्थानांतील संख्येने गुणून गुणाकार उजवीकडून डावीकडे मांडित जाणे . [ धांवणे + गुणाकार ] 
  • ०भागाकार पु. भागाकाराचा एक प्रकार . याच्या उलट बैठा भागाकार . [ धांवणे + भागाकार ] 
  • a  Fleet, swift, quick of foot. 
RANDOM WORD

Did you know?

मंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.