मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ४| तुझे चरण पाहिले संग्रह ४ दुर्गा चरणाखालिल हाय मीच रज ! कवनकमळें मेनकावतरण जय रतिपतिवर ! शरणागत चुकला बाण मावळत्या सूर्याप्रत घर राहिलें दूर ! पाणपोईवाली वारुणीस्तोत्र जमादार ग्रीष्म विरहांतील जीवन आज पारणें कां फिटलें ? चौकीदार तें कोण या ठायिं ? वायो, खुणव तीस संगीत कलेप्रत तरुणांस संदेश ! शुभं भूयात् कोठें मुली जासि ? पुनः पुनः यावें तुझे चरण पाहिले राजद्रोह कीं देशद्रोह ? तुझे चरण पाहिले भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे तुझे चरण पाहिले Translation - भाषांतर भाग्य उजळलें तुझे चरण पाहिले, ध्रु० लागुनिया तुझे चरण घर झालें हें पावन इडापिडा जाति पळुन ह्रदय विकसलें. १ नामाचा तुझ्या गजर लाजति मुनिवर निर्जर आनंदें भरलें घर नयन-फळ मिळे. २ घडलें करिं तव पूजन मुखें नामसंकीर्तन दर्शनसुख घेति नयन अंग हर्षलें. ३ करुणेचा तूं ठेवा केली कशितरि सेवा गोड करुनि परि देवा सकळ घेतलें. ४ आतां परि करिसि गमन पुनः पुनः दे दर्शन हेंचि विनविं शिर नमवुन हात जोडिले. ५ N/A कवी - भा. रा. तांबे ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP