TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

चरणाखालिल हाय मीच रज !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.


चरणाखालिल हाय मीच रज !

सांगुं कुणा गुज साजणि, मनिंचे ?

बोलहि वदण्या चोरि समज मज;

मी पतिविरहित, शंकित नयनें

बघुति लोक मज, अशुभ गणुनिया टाळतात मज. ध्रु०

कुणाजवळ करुं ह्रदय मोकळें ?

कोंडमार किति ! दिवस कंठितें गिळुनि दुःख निज १

मी न मनुज का ? काय न मज मन ?

नच विकार का? लहरि उठति मनिं, काय सांगुं तुज ! २

पुरुष वरिति नव नवरि कितितरी,

सकल शुभच तें ! असहायच मी मुकेंच सावज ! ३

कशास जाई तो या मार्गी ?

बघुनि दुरुनिया पाणी पाणी होतें काळीज. ४

दुसर्‍या मिरविति युवति पतिशिरीं,

तुडविति पाउलिं चरणाखालिल हाय मीच रज ! ५

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - श्रीमती

राग - तिलककामोद

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

Last Updated : 2012-10-11T13:15:16.7970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वेंचकुली

  • स्त्री. वाकुली ; वेडावणें ( सामान्यतः अनेकवचनांत उपयोग - वेंचकुल्या ); टिवल्याबावल्या ; तोंडें वेडीं वांकडीं करणें . बाळकृष्णपंतांचा रामराम होतांच गाडीबाहेर तोंड काढून माकडासारख्या वेंकुचल्या महाराजांनीं करून दाखविल्या . - विक्षिप्त १ . ३६ . [ विचकणें ] 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.