मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ४| वारुणीस्तोत्र संग्रह ४ दुर्गा चरणाखालिल हाय मीच रज ! कवनकमळें मेनकावतरण जय रतिपतिवर ! शरणागत चुकला बाण मावळत्या सूर्याप्रत घर राहिलें दूर ! पाणपोईवाली वारुणीस्तोत्र जमादार ग्रीष्म विरहांतील जीवन आज पारणें कां फिटलें ? चौकीदार तें कोण या ठायिं ? वायो, खुणव तीस संगीत कलेप्रत तरुणांस संदेश ! शुभं भूयात् कोठें मुली जासि ? पुनः पुनः यावें तुझे चरण पाहिले राजद्रोह कीं देशद्रोह ? वारुणीस्तोत्र भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात. Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे वारुणीस्तोत्र Translation - भाषांतर जयतु जय भगवती ! जयतु जय वारुणी ! मूलमायाभगिनि जय जगन्मोहिनी ! ध्रु० मूलशक्त्यंतरी उठति लहरि न जरी सृजन कवणेपरी करिल मायाविनी ? १ केवि जगदंड हें, सोममार्तंड हे, रचिल नव पिंड हे मोह नसतां मनीं ? २ कल्पनागार तूं ! मोहभांडार तूं ! पुरविशी सार तूं शक्तिसहचारिणी. ३ देवदानव मिळुनि धर्म निज सांडुनी सागरा मंथुनी काढिलें तुज गणीं ! ४ श्रीसहोदरिणि तूं ! अप्सरा-भगिनि तूं ! रतिसुखस्त्रविणि तूं ! जयतु जय भास्विनी ! ५ दुःखदलमर्दिनी, विभवसुखवर्धिनी ! मोहिले ऋषिमुनी जयतु उन्मादिनी ! ६ जय कराल-प्रिये ! मोहनिद्रामये ! मूर्त हास्य स्वयें हटविकटहासिनी ! ७ देवि उदयोऽस्तु तव! देवि विजयोऽस्तु तव ! जय उदे ! जय उदे ! जय उदे ! स्वामिनी ८ N/A कवी - भा. रा. तांबे जाति - सुरमंदिर भूपाळी Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP