मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
कर आता गाई गाई तुला...

बालगीत - कर आता गाई गाई तुला...

बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.

Balgeet is a traditional or composed song or poem taught to children for development of vocabulary.


कर आता गाई गाई

तुला गाते मी अंगाई

आज माझ्या बाहुलीची

झोप कुणी नेली बाई ?

बोळक्यांची उतरंडी

लुटुपुटीची चूल

आवरले आहे बाई

आता कुठे घरकुल !

काम सारे उरकता

थकला ग माझा जीव

नको छ्ळू तूही राणी

येऊ दे ना जरा कीव ?

नीज नीज लडिवाळे

नको रडू, देते झोका

उभा बागुल दाराशी

सांग त्यास बोलावू का ?

गीत - शांता शेळके

N/A

References : http://aathavanitli-gani.com/
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP