मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|अभंग व पदें| ३६ ते ४० अभंग व पदें १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० अभंग व पदें - ३६ ते ४० महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी अभंग व पदें - ३६ ते ४० Translation - भाषांतर पद ३६ वें तें रुप पहावें गे बाई पहावें गे । तरीच जन्मा यावेंगे ॥धृ०चिंतिति हरिहरतें रुप नारद । अलक्ष अगोचर । तेथे मन हे न्यावेगें बाई न्यावेंगे । ते रुप प० ॥१॥उलट पलट करी त्रिकुट शिखरपर । अमृत झरझर वाहे निरंतर ॥योगबळानें प्यावेंगे बाई प्यावेंगे । तरीच जन्मा यावे० ॥२॥झांझाझंगाट वाजे अवघड । नाद भडाभड होती कडाकड ॥अनुहत त्याचें बाई नांवगे बाई नावगे । तरीच जन्मा यावे० ॥३॥निजानंदे आनंदे । नारायणें श्रीरंगुनी जावेंगे । तरीच जन्मा यावें० ते रुप पहावेंगे बाई० ॥४॥पद ३७ वें आम्हीनमुं त्याला त्या बा नमुं त्याला । उपाधि नाहीं । ज्याला । धृ० । संशय उरला नाहीं । अवघा ब्रह्मचि झाला पाहीं । आम्ही नमुं त्याला बा न० ॥१॥स्वयंभु मुळीचा आहे । द्वैतपणासी गिळूनि राही । आम्ही न० ॥२॥समूळ अवघे हरिले । सगुण जयासि कळलें । आम्ही न० ॥३॥रंगनाथ गुरु पाहे । त्याचा अनुभव दुसरा नोहे । आम्ही नमुं त्याला० ॥४॥पद ३८ वेंम्हणुनि हरि भजिजे हरि भजिजे । पदोपदी शिव स्मरिजे ॥धृ०दाटत कंप कफानें । नाना देहीं उठति तुफानें । म्हणोनि हरि० ॥१॥आंगडी पडशी शालदुशाला । अंति लेता होय कशाला । म्हणोनि० ॥२॥कंठीं कुडक्या मुद्या । आवधीं संपत्ती जाइल उद्यां । म्हणोनि० ॥३॥जेव्हां देहासि लागेल उचकी । तेव्हां स्त्रीसुत पैसे उचकी । म्हणोनि० ॥४॥अमृत अनुभवी भरला । म्हणवुनियां चरणीं जडला । म्हणोनि० ॥५॥पद ३९ वें श्रीहरिचे उपकार । आठवूं किती श्रीहरिचे उपकार ॥धृ०भक्त मनोरथ पूर्ण कराया । रुप घरी साकार । आठवूं० ॥१॥अघटित घडवूनी आत्मत्वाचा । देत असे साकार । आठवूं० ॥२॥अमृत म्हणे घ्या नाम तयाचें । होईल जयजयकार । आठवूं० ॥३॥पद ४० वें डोळा उघडेना । उघडेना । पश्चाताप घडेना ॥धृ०अहंममता करणें । नाना योनीं जन्मुनि मारणे । डोळा० ॥१॥चिदचिद्ग्रंथि सुटेना । क्षणभर विषयीं चित्त विटेना । डोळा० ॥२॥निजानंदी रंगेना । निश्चळ निर्मळ भवभंगेना । डोळा० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP