मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|अभंग व पदें| ६ ते १० अभंग व पदें १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० अभंग व पदें - ६ ते १० महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी अभंग व पदें - ६ ते १० Translation - भाषांतर पद ६ वेंएक मी देखिलें नगर, एक मी देखिले नगर ॥नवदरवाजे दशवेंद्वार, नवदरवाजे दशवेंद्वार ॥तेणें राजा रघुवीर, एक सखरा । एक मी दे० । धृ० । परा पश्चंती मध्यमा, परा पश्चंती मध्यमा ॥चौथी वैखरी ती जाणा । चौथी वैखरी ती जाणा ॥तेथे वाजे रुणझुणा । साक्षेपेरे । एक मी देखीलें ॥२॥सहस्त्रदळ औटपीठ, सहस्त्रदळ औटपीठ । अवघा भरलासे घनदाट, अवघा भरलासे घनदाट । तेथें मूळ मायेचें पीठ । श्रीरामाचें पीठ । एक मी दे ॥३॥अखंड झालासे ऊबारा, अखंड झालासे ऊबारा । निरंजनी त्यासी थारा । गोपाळनाथ निजमोहरा, सखया झाला ॥एक मी देखिलें ॥४॥पद ७ वें सखी पुसे सखयेसी । सद्गुरुची महिमा कैसी । तें गुज सांगे मजपाशीं । सखयेबाई ॥१॥सद्गुरुराज दयाळ मोठा । तोडी अहंकाराच्या वाटा । नेऊन बसवी मूळपीठा । सखयेबाई ॥२॥काया वाचा मनोभावें । सद्गुरुला शरण जावें आपुले स्वहित विचारावें सखयेबाई ॥३॥तुका म्हणे अहो बाई । ऐसे नवल सांगू काई । पुन्हा जन्ममरण नाहीं । सखयेबाई ॥४॥पद ८ वेंबाई मी लिहिणें शिकलें । सद्गुरुरायाशीं ॥धृ०ब्रह्मी झाला जो उल्लेख । तोचि नादाकार देख ॥तोचि नादा । ओंकाराचा लेख । तुर्या म्हणती त्यासी । बाई० ॥१॥पांच शहाणे पांच मूर्ख । पांच चाळक असती देख । पांच खोडकर अनेक । गणती केली छत्तीसी । बाई० मी लिहिणे शि० ॥२॥चार खोली चार घरीं । चार पुरुष चार नारी । पाहून चौघांच्या विचारी । बैसले पांचव्यापाशीं । बाई मी लिहिणें शिकले सद्गुरुरायापाशी । ३ ॥बीजापासून अंकुर । झाला वृक्षाचा उभार । फळे पुष्पें तो भार ॥तया बीजाचे कुशीं । बाई मी लिहि० । कातिन तंतूमी काठून । त्यावरी क्रीडा करी आपण । शेवटीं तंतूसी गिळून । शेवटीं राहे औपासी । बाई मी० ॥५॥ज्ञानदेवाचा प्रताप । मस्तकीं श्रीगुरुचा हात । जनी म्हणे केला मात । पुसा नामदेवासी । बाई मी । ६ ॥पद ९ वें वोही राम पछानोजीं । मेरा कहेना मानोजी ॥धृ०परनारकूं षंढ बना है । परनिंदाकूं बहेरा । परधन देखत अंधा होवे ॥आपई है सबसारा । वोही रा० । सदा रहत उदासी । निंदा स्तुती नहीं जानेकिनकी । ये धेनू ये वागह न जाने ॥सब आत्मा है एकी । वोही राम पछेनोजी० ॥२॥भेद नही अभेद हुवा मन । राम भरा जग सारा । कहत कबीरा सुनभै साधू । जगमो हरकर न्यारा । वोही राम० ॥३॥पद १० वें मी सद्गुरुची लेक । भाव एक ॥धृ०बाई मी नि:संग धांगडी । प्रपंचाचे लुगडे फेडी । नाकी नाही नथ काडी । माझे नाव म्हणती आवडी ॥जन भुलले देख । मी० ॥१॥सद्गुरु माझा चंद्रमौळी । माझ्या काखेंत देऊन झोळी । मजला हिंडवी आळोआळी । मज जन म्हणती सुकाळ ॥बहु सुख मी सद्गुरुची लेक ॥२॥गुरुनें मज पाजीली भांग । मजला घडला संतसंग ॥गुरु गुह्य मजला सांगे । मारुन हांक । मी सद्गुरुची० ॥३॥ऐसी म्हणे मुक्ताबाई । जा शरण गुरुचे पायीं । पुन:जन्ममरण नाहीं । ऐसी भाक । मी सद्गुरुची. ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP