मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|अभंग व पदें| १६ ते २० अभंग व पदें १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० अभंग व पदें - १६ ते २० महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी अभंग व पदें - १६ ते २० Translation - भाषांतर पद १६ वें एक घरांत मांजर व्याली । सात घरें फिरली ॥धृ०माजघरी नौबत आहे । न वाजवितां वाजत आहे ॥आकाशाची पाहतां सोय । तेथे एक खोली । एक० ॥दोन घरें आहेत भिंगाची । आंत मूर्ती श्रीरंगाची । तेथें वाट नाहीं जायाची । पाहतां चौकी बसली । एक० ॥संताघरची वळखुण वाट । तेथें आहे एक बोट । गोपाळनाथ गुरुची गोष्ट सत्य बोली । एक० ॥३॥पद १७ वें ।स्थिर हंस चालल्या मेंढया । बावन खंडया ॥धृ०चालला स्थिर मेंढयांचा भार । आधारचक्रींतरती चार ॥स्वाधिष्ठानीं सहा सरदार । बारा मेंढया । स्थिर हंस० ॥२॥मनपुरीं चरती त्रिगुणी । बावन खंडया । स्थिर हंस चाल० ॥बारापुढें चालल्या सोळा । सोळापुढें चार ओढाळा । स्थिर घेती त्या उल्हाळा । तांबतोंडया । स्थिर हं० ॥३॥लागले तीन लांडगे पाठीं । जाऊन दडाले गिरीकपाटीं ॥मेंढया हाती घेऊनी काठी । मूळचा बंडया । स्थिर हेस चा० ॥४॥आधीं ओंकार मेंढका भला । त्यानें अवघ्या केल्या गोळा ॥गोपाळनाळ खुणें दासाला । दाखविल्या मेंढया । स्थिर हंस चालल्या० ॥५॥पद १८ वें साजनी मंगल दसरा । आम्हास झाला बाई ॥धृ०करुन घटाची स्थापना । चिद्रुप दीप लावूनी जाणा ॥सोहं माळा लावूनी धना । निजबीज पेरिलें ठायीं । साजणी मंगळ दसरा ॥१॥नवविध भक्तीचे नव दिवस । दहावा अद्वैत निज कळस ॥अनुहत माळा लावुनी त्यास । वाद्य वाजे घनबाई । साजणी मंगळ० ॥२॥आत्मा कांचन घेऊन सुरां । मनमेंढा मारुन पुरा । गेलें मूळच्या निज घरा । लीन झाले गुरुपायीं । साजणी० ॥३॥अंबर फोडूनि चिदंबर झालें । अंबरस्वारी । करुनी आलें ॥निजरुप होऊन ठेलें । वोवाळिलें बाई । साजणी० ॥४॥नाना शास्त्रें हे पुराण । याचा अर्थ करितां जाण ॥गोपाळनाथ लीन होऊन । शरण गेला गुरुपायीं । साजणी मंगल दसरा० ॥५॥पद १९ वें नाथचे घरची उलटीच खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥धृ०बाई एक मी नवल देखिलें । वळचणींचे पाणी आढयास गेलें । नाथाचे घरची० ॥१॥हातांत घागर बाहेर पाणी । पाण्यासि पाणी आलें बांधोनी । नाथचे घर० ॥२॥शेत पेरिलें हो त्यासीं कणीस आलें । राखणवाल्यासी त्यानें गिळिलें । नाथाचे० ॥३॥मडकें खाऊन भात टाकून दिसला । बकर्याचे पुढे देव कपीला । नाथाचे० ॥४॥श्रीधरस्वामी म्हणे मार्ग हा उलटा । जाणेल तोची गुरुचा बेटा । नाथाचे घरची उलटीच० ॥५॥पद २० वें सोहंमोरणी, मोरणीगे साजणी । गुरुने दिलीं होती आंदणी ॥धृ०सप्तधातूंचे कांचन । घोटिलें बहुतां युक्तिनें । नवरंगाची रंगाची नवरत्ने । बनविली कारागिरानें ॥अस्सल तीन हिरे । हिरे त्रिगुण । सुरती मोत्यें वर दीन ॥राखाडीवर सरजे सरजे हो दोन । जसें चंद्राचे चांदणे ॥उलट वरफांसा, फांसा बसवूनी । गुरुनें दिली० ॥१॥रत्नमणिक हें माणिक हे अद्भुत । लावण्यावर जडली प्रीत ॥शामरंगाचा, रंगाचा लालक । केवल रजनीचा सुत ॥श्वेतकर्पूर, कर्पूराऐसी कांत । बसविला हिरकणीसहित ॥केली एकाएकीं, एकाएकीं जडणीं । गुरुने० ॥२॥चमके वर नीळ, नीळसद्रेचा । सुनीळ गाभा गगनाचा ॥आंतबहु जडाव, जडाव रत्नांचा । प्रकाश अनंत सूर्याचा ॥डौल हा कैसा, कैसा मायेचा । दाविला झोंक मोरणीचा ॥खवळला काम, काम योग्यांचा । लोपला प्रकाश वस्तूचा ॥झाली झांपडी, झांपडी ब्रह्मभुवनी । गुरुने० ॥३॥ऐसी हे माया, माया मोरणी । नवरंगाचे हे पाणी ॥गुंतले महान् महान् सिध्दमुनी । अगाध मायेची करणीं ॥शिवलिंग बोले, बोले ऐशिया वाणी । लागे सद्गुरुचे चरणी ॥सोहंमोरणी मोरणीगे सा० ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP