मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|अभंग व पदें| २६ ते ३० अभंग व पदें १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० अभंग व पदें - २६ ते ३० महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी अभंग व पदें - २६ ते ३० Translation - भाषांतर पद २६ वें राईएवढें पांखरुं । दादा त्रिभुवनी त्याचा थारा । धृ० । नर आणि नारी त्याबा । पांखराचा चारा । पिंडी आणि ब्रह्मांडी ॥त्याचा अनुभव तुम्ही करा । त्याचा अनुभव घेतां चुकेल चौर्याशींचा फेरा ॥राईएवढें० ॥१॥एकवीस स्वर्गावरती त्याबा । पांखरांची उंची । डोळ्यांतील बाहुली त्याबा ॥पांखराची नीची । सप्त हे सागर । पाखरूं घेऊन गेलें चोंची । राई० ॥२॥पिंड आणि ब्रह्मांड । मच्छिंद्रनाथाने दाविलें । त्याच्या अनुग्रहें गोरक्षानें ओळखिलें ॥तयाच्या प्रसादें नाम्याशिष्याने गाईलें । राईएवढें पांखरुं । दा० ॥३॥पद २७ वें माझें नवलाचें पांखरुं । कसें मी मारुं । धृ ॥एका सकाळचे प्रहरी पांखरुं आलें माझें दारी ॥पांच रंग आंगावरी । चला सई धरु । १ ॥पांखरुं रतीहून लहान । उडतां गर्जे त्रिभुवन । त्याची कैचें जन्ममरण । धरावा धीरुं । २ ॥अपार रंग त्या पांखराचे । मजला देणें सद्गुरुचें ॥गोपाळनाथ पूर्ण कृपेचें । फळलें तारु ॥माझें नवलाचे पांखरु । कसे मी मारुं ॥३॥पद २८ वें गांवावरी एक बाभळ । खाली शेंडा वरती मूळ ॥खाली कळस वर देऊळ । गत आहे न्यारी ॥१॥तमाशा संताघरीं निर्गुणपुरीं । धृ० । फुलाआधीं गुंफिला तुरा । याचा अर्थ करीं चतुरा ॥कोण सद्गुरुघरचा पुरा । असेल चतुरा । खोविल शिरीं । तमाशा संताघरी ॥२॥घोडा रोंवून बांधिला खुंट । नगार्यावर चढविला उंट ॥कोण सद्गुरुचा पुतळा असेल बळीवंत । अर्थ विचारीं ॥तमाशा संताघरी ॥३॥दिवा वार्य़ा घालितसे शेव । ह्याचा घ्याहो तुम्ही अनुभव । तुका वैकुंठी राव । गत आहे न्यारी । तमाशा सं० ॥४॥पद २९ वें है कोय ऐसा मुरशद मौला । घरमें खुदा बतावेगा । है को० ॥धृ०पंचतनके दरगा भीतर । दिलत कथा बिछावेगा । मनमुकामे मुजे बिठाकर । बिस्मिला कलमा पढावेगा । है को० ॥१॥अरषकुरषदीधारजो । राम रहिममें दिखावेगा । चवदा तबकके अंदर सुलाके, मेरे तय झुल झुलावेगा । है० ॥बवन दरफके मायनें बताके । भेदभरमकुं मिटावेगा । उसके अंतर मुझ लेजाके, किताब के बनाय शिकावेगा । है० ॥३॥कहे कमाल कबीरका बालक । मनकिताब सुनावेगा ॥मेरा चेरा मुझे बताके, नूरनबी मिलावेगा । है० कोय० ॥४॥पद ३० वें सांग बा मारुती । कीं मजला कधिं भेटेल रघुपती । कीं मजला० ॥धृ०साधुसि छळिलें मज फळ आलें । बनीं राक्षस गर्जती । कीं म० ॥१॥बिनअपराधी वचनिं निरंतर । छळिला उर्मिलापती । कीं० म० ॥२॥एकाजनार्दनीं आश्रय तुमचा । दे साधुसंगती । कीं म० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP