मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|अभंग व पदें| २१ ते २५ अभंग व पदें १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० अभंग व पदें - २१ ते २५ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी अभंग व पदें - २१ ते २५ Translation - भाषांतर पद २१ वें साजणी शिमगा मी गातेगे । मन माझें मी डोळां महातेंग ॥धृ०सहाजण मारुन । साजण वरितें । साजणासंगे शिमगा मी करित्यें ॥पांचांचे संगे चवथीला नेतेंगे । मन म० ॥१॥गगनांत डोहो भरपूर भरला । स्वरुपाच्या लाटेंत साजण धरला ॥चिन्मय रहाटींत मनोरथ पुरला । पाहुन दंग मी होतें गे । मन माझे मी० ॥२॥दोहोहातीं पिचकार्य़ा धरत्यागे बाई । नवरंगी भरल्या त्या शोधित जाई ॥शुभ्र अभ्रामध्यें झळकतें बाई । रंगांत रंगुन जातेंगे । मन माझें मी० ॥३॥शिमगा तुम्हीं उमगाजाहो कोणी । जाईल शिमगा होईल हानी ॥मारुन बोंब सांगत्यें कानी । नरहरी महिपती ध्यातोगे । मन । माझे० ॥४॥पद २२ वें आली कोल्हाटीण खेळाया । सगुण माया ॥धृ०प्रपंचात रोविला वेळू । चवशून्यांत मांडिला खेळू ॥ब्रह्मा विष्णु तियेचें बाळु । लागती पायां । आली कोहाटीण खेळाया ॥१॥खेळे निर्गुणाचा कोल्हाटी । सोहं शब्दें ढोलकें पिटी । उघडी चैतन्याची पेटी । चला जाऊ पहाया । आली कोल्हाटीण खेळाया ॥२॥कोल्हाटीण बैसली डोळां । जाणे गुरुपुत्र विरळा । नरहरिबोधाची ही लीळा ॥चला जाऊं पहाया । आली कोल्हाटीण खेळाया । सगुण० ॥३॥पद २३ वें एक ब्रह्मरुपीं निर्गुण । खेळे दारुण । धृ० । ओंकार ढोल वाजवून । दाही दिशा बांधिल्याने । त्रिगुण पेठ उभारुन ॥अधऊर्ध्वदोर लावून । खेळ मांडून । एकबहु० ॥१॥आत्माबहुरुपी चांगला । चार शून्य उडोन गेला । निरालंबी तो बैसला ॥दहावे द्वारीं खेळ मांडला । जन पाहून । एकबहुरुपी० ॥२॥सत्रावी बहुरुपीन हट्टी । कांस घालुन उरफटी । हातापायांची करुन मिठी । खेळत जाण । एक बहुरुपी निर्गुण ॥३॥खेळ बहुरुपी निर्गुणाचा । अंतपार नाहीं त्याचा । दास म्हणे घ्या अनुभव याचा । गुरुपासून । एक बहु० ॥४॥पद २४ वें गुरुरायाचे नवलाव केला । देह अपूर्व बाग दाखविला ॥धृ०तया बागेचें सांगुं काई । साडेतीन चाहुर बागशाई ॥आंत पंचरंगी जाई । धनकर्त्याची कारागिरी बाई ॥१॥तया बागेत एक असे विहिर । मोट सत्रावी वाहे निरंतर ॥मनपवनाचे लावूनियां दोर । सोहं भक्तिचें बळ असे फार ॥गुरुरायाचें नवलाव केला । तया बागेंत एक माळीण ॥तिला वर असती दोघेजण एक भोगी तंतव एक जाय मरुन ॥एक जिवंत होतसे फिरुन । गुरुरायानें नवलाव० ॥३॥ऐंसे केलें सद्गुरुरायाने । मज दाविली अंतरिंची खूण । काय उतराई होऊं त्यासी जाण । वारंवार निवृत्ती वंदी चरण । गुरुराया० ॥४॥पद २५ वें निर्गुण माळ्यानें हो माळ्यानें । एक बाग लाविला जाणें ॥धृ०औटहाताचें एक वावर । वरीं धरिला नांगर । कामक्रोधमदमत्सर । बैल जुंपिले चार । हातीं ज्ञानाडघेऊन । निर्गु० ॥१॥एकवीस स्वर्गावरती एक विहीर । तिला उरफाटे पाझर ॥माळिण सत्रावी सुंदर । वाफे बहात्तर । पाणी लावितसे पाटानें । नि० ॥२॥बावन चाफे हो चौफेर । चौदावें मूळघर । तीनशे साठ जाई मोगरा ॥एकवीस आवे थोर । पाणी लावे नित्यानें । नि० ॥३॥बाग पंचरंगी फुलला । पाहून माळी दंग झाला ॥जिवाशिवाचा वर त्याला । धोंडी गुंडी बोलला । एका सद्गुरुस्मरणें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP