श्री स्वामी समर्थ - दत्तात्रय माऊली

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!


दत्तात्रय माऊली,
माऊली, दीनांची साऊली

त्रिगुणात्मक प्रभु त्रिकालज्ञानी
एकरुप जाहले मन्मनी
पदस्पर्शाने अवघी धरणी आनंदे नाहली
माऊली, दीनांची साऊली

अत्रिवंश कुलदीप दत्त हा
भस्म विलेपुनी अवघ्या देहा
भक्तांलागी अभय द्यावया या लोकी प्रगटली
माऊली, दीनांची साऊली

रुप दिगंबर सगुण मनोहर
वदनावरती हास्य शुभंकर
करी कमंडलु पायि खडावा धेनूसह चालली
माऊली, दीनांची साऊली

कैवारी हा सकल जनांचा
मार्ग दावितो मोक्ष पदाचा
‘अलख निरंजन’ गात वैखरी आनंदे नाचली
माऊली, दीनांची साऊली

नतमस्तक हे विश्व जाहले
गीत मनीचे सहजी फुलले
स्वामि समर्थांच्या चरणावर भावफुले वाहिली
माऊली, दीनांची साऊली

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP