श्री स्वामी समर्थ - भूलोकीचा समर्थ

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!


श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा
भूलोकीचा समर्थ स्वामी सतत अंतरी धरा

गंध रेखिले विशाल भाळा
कंठी रुद्राक्षाच्या माळा
माय माऊली, कृपा साऊली सदैव चित्ती स्मरा
श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा

घेता दर्शन गुरुचरणांचे
शमन होतसे शत पापांचे
कृपासिंधु अवधूत दयाघन कल्पतरु आसरा
श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा

जगदोध्दारक हा अवतारी
मुक्तिसंपदा याच्या दारी
नतमस्तक व्हा श्रीगुरुचरणी, आत्मसुखाते वरा
श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा
भूलोकीचा समर्थ स्वामी सतत अंतरी धरा

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP