मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गोविंदचरितमानस| साधन सिध्दता श्री गोविंदचरितमानस अणुक्रमणिका प्रस्तावोध्याय ज्ञानेश्वरदर्शन संसार स्थितिवर्णन साधन सिध्दता कीर्तन बहिरंग परीक्षण कीर्तन अंतरंग परीक्षण जीवन प्रसंग वर्णन रौप्य महोत्सव वर्णन त्रिताप महोत्सव वर्णन पुण्यधाम दर्शन संत दर्शन निर्याण प्रसंग कळसाध्याय पूर्णविराम आरती अध्याय चौथा - साधन सिध्दता भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र. Tags : govindacharit manasmarathiगोविंदचरित मानसमराठी साधन सिध्दता Translation - भाषांतर जय जय श्रीरामेश्वरा । केळकर कुलदीपका सोमेश्वरा । सांप्रदायाच्या ईश्वरा । साष्टांग नमन तवचरणी ॥१॥रेवणसिध्द मरुळसिध्द । समर्थ श्री काडसिध्द । ज्यांच्या अनुग्रहे श्रीनारायणसिध्द । गुरुलिगजंगम झाले ॥२॥गुप्तपणें साधन करुन । संपादिलें आत्मज्ञान । पुरुषार्थाचाही पुरुषार्थ साधून । जगदोध्दार केला ॥३॥सांप्रदायाच्या सिंहासनीं । श्री नारायण दिसती शोभुनी । ध्वज डोले गगनी । परमार्थाचा ॥४॥पाया भक्कम भरला । इमारतीला डौल आला । आणि कारभार पसरला । दिगंतरी ॥५॥तें निंबरगी मूळपीठ । जेथून फुटलें मार्ग नीट । सुत्रधार श्रीनारायण सुस्पष्ट । म्हणोनी वरिष्ठ सर्वांसी ॥६॥थोर पुरुष आपणां ऐसे । निर्माण केले योग्य जसे । म्हणोनी भाग्य आपैसे । आले सामान्य जनांसी ॥७॥गुरुलिंग जंगमांचा साधनक्रम । नेहमी दिसे अनुपम । नित्यक्रमी विक्रम । साधिती सुखोपायें ॥८॥मेंढरें राखण्या दूर जावें । एकांत स्थळ शोधावें । स्वात्मानुभवीं रमावें । हा त्यांचा दिनक्रम ॥९॥ऐशा साधनी स्वानंद भोंगता । अद्भुत घडलें ऐका आतां । रघुनाथप्रियसाधु सहजतां । आले सोनगीगांवीं ॥१०॥निंबरगीपासून न अति दूर । रघुनाथप्रिय करिती चमत्कार । तपोबल त्यांचें थोर । चकित होती जनबहू ॥११॥पुढील कार्य ओळखून । श्रीनारायणांनी आगमन । सोनगी गांवास करुन । रघुनाथप्रियासी भेटले ॥१२॥“पुण्यमार्ग हा तुमचा । वाटतो जरी भाग्याचा । फेरा न चुकवील जन्ममरणाचा । आहे हें सर्व मायिक” ॥१३॥येतां श्रेष्ठांचा सुशब्द कानीं । दचकले रघुनाथप्रिय अंतकरणी । अधिकार ओळखुनी । घातले लोंटगण पायावर ॥१४॥वरद हस्त मस्तकी आला । जीव सार्थकीं लागला । श्रीनारायणांचाही झाला । भक्तिप्रसार सोपा ॥१५॥पापपुण्य ओंलाडुनी । जाणें आहे निरंजनीं । ऐसे रघुनाथप्रियासी सांगुनी । म्हणती त्यांना ॥१६॥“जगदोध्दारासाठीं । पडल्या तुमच्या आमच्या गांठी । आतां हें कार्य उठाउठीं । पडलें तुमच्या शिरीं ॥१७॥वैभव तुमचे वाढेल । थोर कीर्ती होईल । परमार्थही पसरेल । दशदिशा ॥१८॥ऐसें आशीर्वचन । मिळालें भाग्याचें भाग्याचें पूर्ण । चिमड पसरेल । दशदिशा ॥१८॥ऐसें आशीर्वचन । मिळालें भाग्याचें पूर्ण । चिमड क्षेत्र दिंले नेमून । भक्तिप्रसारासाठीं ॥१९॥श्रीरामभाऊ महाराज यरगट्टीकर । श्री नारायणांचे दुसरे शिष्यवर । साक्षात्कारीं द्विजवर । चिमडासी पाठविले ॥२०॥श्रीलक्ष्मीआक्का नामें एक । श्रीगुरुलिगजंगमांची शिष्या अलौकिक । तपस्विनी अन्वर्थक । शोभे ज्यांना ॥२१॥त्याही आल्या चिमडाला । भक्ति प्रसार करण्याला । ऐंसे महत्व या क्षेत्राला । अनन्य साधारण ॥२२॥श्री रामभाऊ महाराजांचे पुत्रवर । श्रीनारायण महाराज यरगट्टीकर । अधिकार ज्यांचा थोर । परमार्थ कार्य चालविती ॥२३॥याची एक शाखा । सांगलीस आली ती ऐका । भर सांगलीच्या लौकिका । जेणें आला ॥२४॥हनुमंतराव कोटणीस । परमार्थाचा हव्यास । सांगलीच्या रसिकांस । गोडी परमार्थाची लाविली ॥२५॥साक्षात्कारीं संत हनुमंत । ऐशी कीर्ती झाली दिगंत । तों मामाहीं विचारांत । पडले एके दिवशी ॥२६॥जपजाप्य पुरश्चरणें । जरी केली जागरणें । तरी सद्गुरुवीण उणें । सर्व काही ॥२७॥मनीं एक निश्चय केला । गेले तात्यांच्या घराला । डोई ठेविली चरणाला । तों तात्यांनीं जाणलें ॥२८॥तरी म्हणती अहो, बापूराव, । आज वेगळाच दिसे भाव । काय मनींची हांव । करा निवेदन निसंकोच ॥२९॥मामा सद्गद होवोनी म्हणति । आलो ऐकून तुमची कीर्ति । जीवास मिळेल परम शांती । तो मार्ग दाखवा ॥३०॥आलो धरुन विश्वास । निश्चयाची बळकट कांस । जीव लागे झुरणीस । आतां अंतर न दयावें ॥३१॥चरणी जीव जडला । आतां अनुग्रह व्हावा आपुला । धरोनी या आशेला । आलों द्वारी ॥३२॥प्रेमळ सत्पात्र शिष्य पाहोनी । तात्या गहिंवरले मनीं । बोलले विचार करुनी । अमृत वचन ॥३३॥तुमचा विश्वास माझेवरी । हें मज समाधान अंतरी । मी जें सांगेन खरोखरीं । तें सावधान ऐकावें ॥३४॥नाहीं तुम्हांस म्हणूं कैसे ? । परी ईश्वरी योजना वेगळींच असे । मम बोलावरी विश्वासें । राहावेंजी ॥३५॥तुमचे सद्गुरु पूर्वनियोजित । असति चिमड क्षेत्रांत । श्रीनारायण संतश्रेष्ठ । थोर अधिकारी ॥३६॥विलंब आतां न करावा । सत्कार्यास उशीर न व्हावा । मार्ग आपुला सुधारावा । विघ्ने येथें असति बहु ॥३७॥तुमची इच्छा होईल सफळ । मन करावें निर्मळ । विकल्पांचा कोलाहाल । करुं नये ॥३८॥ज्या पुढें अडचणी येतील । त्या येथेम दूर होतील । एकता हें मधुर बोल । मामा संतोष्लें ॥३९॥ शिर्सावंद्य शब्द मानोन । आणि चरण वंदून । मामा गेले चिमडास निघोन । साधुरायापाशी ॥४०॥ तापनाशी तीर्थात । श्रीसाधुरायाची समाधि शोभत । श्री गुरुलिंगजंगमांचें लक्ष जेथ । सदा असे ॥४१॥घातलें साष्टांग दंडवत । जोडिले दोन्ही हात । मस्तक करोनी नत । राहिले उभे ॥४२॥तों आले श्रीनारायण । पुसती आदरें आपण “कोण ?” । कां केलें आगमन । शुभवर्तमान सांगा जी ॥४३॥पाहोनी घट्ट धरीलें चरण । केले अश्रुंचें सिंचन । पुढें शुभे दर्शन । झाले आजी ॥४४॥कृतार्थ व्हावया जीवन । कैसे असावें आचरण । आपुला अनुग्रह व्हावा पूर्ण । हा मानस ॥४५॥शके आठरांशे अठ्ठावीस । माघ वदय द्वितियेस । गुरुवार हा शुभ दिवस । श्रीनारायण प्रसन्न झाले ॥४६॥स्वत: अनुग्रह देऊन । शांत केले मामांचे मन । साधन मार्ग विस्तारुन सांगते झालें ॥४७॥संसार ‘सोडूं’ म्हणून सुटेना । करावी लागे पोटाची विवंचना । परी तेथें मनानें गुंतावें ना । हें आपुल्या हातीं असे ॥४८॥संसार न संपवी येरझार । म्हणोनी आसक्ति सोडावी सत्वर । अलिप्तपणे करी संसार । तोची धन्य ॥४९॥वृथा शरीर न दंडावें । न सुखसाधनी गुंतवावें । नेटके लावावें ठेवूनी अनुसंधानीं ॥५०॥वर्म जाणेल तोंची संत । सुगम मार्ग असे तेथ । वाउगे कष्टताप्राप्त । कष्टचि होती ॥५१॥एकाग्र करोनिया मन । जें केलें भजन पूजन । तेंचि होय देवासी अर्पण । इतर कष्ट वाउगे ॥५२॥मन परतेल संसारांतून । तेव्हां तें करील ईशचिंतन । म्हणोन तोडावें बंधन । निश्चयानें ॥५३॥क्षणभंगुर सुखासाठीं । त्यागाव्या शाश्वत सुख गोष्टी । ही तरी अविवेक दृष्टि । करी अध:पात ॥५४॥निजसुखाची सोडोन कांस । जन उगाच होती उदास । जेथें सुख नाहीं तेथें खसखस । त्यांची उगाच चाले ॥५५॥तेथून व्हावया निवृत्ति । आजी निजसुखाची प्राप्ति । विवेक आणि विरक्ती । ही जोडी पाहिजे ॥५६॥विवेक करावी ईश्वरभक्ति । संसारा सोडवी विरक्ति । हीच परमार्थाचि युक्ति । मार्ग सुखाचा ॥५७॥दृढभाव गुरुचरणांवरी । ठेवून वृत्ति अंतर्मुख करी । मोडी द्वैताची वाटच पुरी । साधन मार्गे ॥५८॥विचारोप्तत्ति विचारलय । हाचि भवसागराचा प्रलय । तो थांबता देवालय । हें शरीरचि होईल ॥५९॥राम तोचि आत्माराम । साधक तोचि उदयांचा सिध्द परम । चिद् चिद् ग्रंथी भेदन उत्तम । साधी साधन मार्गे ॥६०॥मन धरीं देहाभिमान । तों गळतां ते मनच होय उन्मन । मंगलचि मंगल खूण । साधन मार्गे ॥६१॥खंडसुख मायेचें । अखंड सुख आत्मारामाचें । दिवस येतील भाग्याचें । साधन मार्गे ॥६२॥ऐसा असावा भाव । सद्गुरु वचनावीण सर्व वाव । सत्पदीं मिळवावा ठाव । साधनमार्गे ॥६३॥सहा जिंकोनी निर्विकार व्हावें । सावध त्यासचि म्हणावें । अलक्षीं लक्ष साधावें । साधनमार्गे ॥६४॥रामनाम छंद मनोमार्ग गति । संकल्प विकल्पीं रामचि चित्तीं । याची देहातचि प्रचिती । साधनमार्गे ॥६५॥इडा आणि पिंगला । सुषुम्नेंत सरल्या । रामनाम लेणें ल्याल्या । साधनमार्गे ॥६६॥जैसा जैसा साधेल पवन । निश्चित करवील देवदर्शन । मग अष्टौप्रहर ईशचिंतन । आपोआप होईल ॥६७॥सावधानता आणि नित्यनेम । साधील साध्य परम । अंतरी सद्गुरुंचें प्रेम । मग काय उणें ॥६८॥होता देवाची भेटी । मग आत्मसुख्याच्याच गोष्टि । मग वृथा संसार संकटी । कोण येतो ॥६९॥ऐकतां ऐसे सद्गुरुवचन । मामा झालें सुखसंपन्न । विसरले देहाभिमान । एकसरें ॥७०॥आधींच मामांचे आचरण । निर्मल आणि सद्गुणसंपन्न । वरी सद्गुरुंचे कृपादान । कळस सोन्याचा ॥७१॥कधीं न इच्छिती मोठेपण । नम्रभाव अनन्यसाधारण । आपुलीं सत्कृत्यें लपवून । हरप्रयत्नें करुनी ॥७२॥कधीं न कोणाचें मन दुखविती । अन्याय साहून मृदुवचन बोलती । त्रिंविध तापांचे आघात सोशिती । मनें कष्टीं न होऊनी ॥७३॥साधा सरळ स्वभाव । गुरुपदीं अनन्यभाव । शुध्दाचरण सदैव । सप्रेम उपासना ॥७४॥सदा मनावरी अंकुश । कार्य साधिती सावकाश । नित्यनेमाचा हव्यास । मनापासूनि ॥७५॥आसक्ति न देहाची । अथवा धन मान स्वजनांची । अनन्यभक्ति परमेश्वराची । वृत्ति रंगली अहर्निश ॥७६॥रात्र रात्र साधनीं घालविती । श्रवण मनन अभ्यास चित्तीं । परमार्थी निश्चल वृत्ति । सदोदित ॥७७॥सद्गुरु अधिकार संपन्न । आणि शिष्य साधनीं निमग्न । संसार मानोनी गौण । सुखविती सद्गुरुंना ॥७८॥मामांनी धरिले सद्गुरुचरण । जें स्वात्मसुखाचें परमनिधान । मिळतां आशीर्वचन । आले समाधिपाशीं ॥७९॥रघुनाथप्रिय गुरुवर । सदा जागृत सुत्रधार । वाढविती परिवार । संत जनांचा ॥८०॥दीपें दीप उजळले । प्रांतो प्रांती गेले । अखंड रुपे झळकूं लागले । भक्तभजनास्तव ॥८१॥श्रीगुरुलिंगजंगमाची । कृपा जेथ सदाची । प्रभा साधुरायाची । उजळोन दिसे ॥८२॥पंचप्राणपंचारती । मामा सद्गद हृदयें ओवाळिती । आणि एकदांच होती । सुखसहित दु:खरह्ति ॥८३॥निरोप घेवून सद्गुरुचा । मार्ग आक्रमिला स्वगृहाचा । येथून मामांच्या साधनक्रमाचा । मार्ग बदलला ॥८४॥साधन झालें संप्रदायानुकूल । वाचन, पंचपदी भाव भक्ति सोज्वळ । श्रीराम उपासनोत्सव, पुण्यतिथी, सकळ । नित्य सुरुं झालें ॥८५॥उग्र तपाचरण केलें । तेथें सहज साधन आलें । श्रीनारायणसांप्रदायाचें कळलें । महत्व आगळें ॥८६॥संसारियासी परमार्थ । येथें कळे यथार्थ । साधावया खरा स्वार्थ । करावा संसार परमार्थनुकूल ॥८७॥संसार करावा परमार्थासाठीं । केवळ शरीर रक्षणासाठीं । नेटके करुन ईश्वरगांठीं । करण्यासुगम ॥८८॥जे आकंठ बुडाले संसारीं । त्यांना श्रीनारायणपंथी सोय खरी । चिमड निंबाळ उमदी यापरी । नांवे जरी दिसती विविध ॥८९॥श्रीगुरुलिंगजंगम श्रीनारायण कर्णधार । सर्वांचा जेथें विश्वास थोर । म्हणोनि दिगंतरी गजर । झाला प्रसार सांप्रदायाचा ॥९०॥मामा आले तात्यांच्या घरीं । निवेदिली कथा सारी । तात्या म्हणती तुमच्या भाग्याची थोरी । काय आतां वर्णावीं ? ॥९१॥श्रीरघुनाथप्रिय समाधि परिसर । चिमड हे पुण्यक्षेत्र थोर । तेथें जों जों रमेल नर । तो होईल नारायण ॥९२॥धरोनी तात्यांचे चरण । मामा बोलती सद्गद वचन । आपणचि मार्ग दाखवून । केले मज कृतार्थ ॥९३॥मामा श्रीरामाचे सेवक । श्रीराम मनीं धरती एक । तेणें श्रीहनुमंत त्यांचा रक्षक । सदा पाठीशीं ॥९४॥श्रीराम शिरला हृदयांत । सखा झाला श्रीहनुमंत । मग काय उणें तेथ । सदा पूर्ण ॥९५॥तात्या तरी अति प्रेमळ । श्रध्दावंतासाठीं अति सरळ । मार्ग दाखवून सोज्वळ । भाग्यविधाते शोभती ॥९६॥मामांची साधन सरिता । अखंड वाहू लागली आतां । दिन प्रतिदिन सुगमता । उमगूं लागली ॥९७॥हा साधन-मार्ग नव्हें आजचा । तो चालत आला युगायुगांचा । शुक सनकादिकांचा । हाच मार्ग ॥९८॥सुख जेथ सुखासि आलें । म्हणोनि आनंदाश्रम नाम शोभलें । मामांनी अखंड साधन सुरुं केले । या आश्रमीं ॥९९॥कधीं न दार बंद यांचे । दर्शन साधनीं रत मामांचे । जें जें घेती त्यांच्या मनांचे । विकल्प मावळती ॥१००॥ऐसा महिमा आनंदाश्रमाचा । सोहळा मामांच्या आत्मसुखाचा । रात्ररात्र चाले तरी हव्यास मनाचा । पुरा न होई ॥१०१॥या दिव्य सुखाच्या साधनीं । मामा जीवभाव टाकिती ओंवाळुनि । शांत प्रसन्न दिसती मौनी । जसे मुनि पूर्वींचे ॥१०२॥शिक्षकाचा पेशा सोडला । तो जेव्हां साधनाच्या आड आला । द्रव्यार्जनाचा मार्ग सोडला । आत्मसुखासाठीं ॥१०३॥एक नाम मनीं धरीलें । परम प्रीतीनें कवटाळिलें । तेणें संसारासि दिलें । तिलोदक ॥१०४॥एक साधन उत्तम मानून । झिजविलें देहाचें चंदन । सुगंध राहिला दरवाळून । दशदिशा ॥१०५॥संसार आणि धन । यांचे सदाचें लग्न । तें प्रारब्धावरी सोपवून । केलें मोठें धाडस ॥१०६॥अखंड जोड साधनाची । लाज सोडिली जनांची । होळी केली संसाराची । यापरीस वैराग्य कोणतें ? ॥१०७॥जवळी असोन कांता । जो तीस शिवे संततीपुरता । या निष्कामतेची अपूर्वता । आगळीचे असे ॥१०८॥कोसळले संकटांचे गिरीवर । तरी यांचा न सुटे धीर । सागरासम गंभीर । हें शांतपण अवर्णनीय ॥१०९॥लोकनिंदेचें तीव्र वार । सुटतां यांचे चित्त न थरारें । उलट निंदकांचेच चिंतिति बरें । ऐसे संतपण मामांचे ॥११०॥कठोर नेमधर्माचें पाश । आवळोनि आति कर्कश । मामा राहिले स्थिर पुरुष । हे श्रेष्ठपण असाधारण ॥१११॥आपुल्या सामर्थ्य बळें । निमटिले कामक्रोधांचे गळे । म्हणोनी त्यांच्या शौर्याचे सोहळे । चकित करिती ॥११२॥तन मन आणि धन । वेंचून झाले सेवापरायण । जीवन केले श्रीरामार्पण । हा त्याग अवर्णनीय ॥११३॥तिळमात्र न अभिमान । नामीं रंगलें ज्यांचें मन । विसरले देहाभिमान । हें विदेहपण अलौकिक ॥११४॥घरी येतां संतसज्जन । ज्यांचे हृदय ये उचंबळोन । करिती प्रेमभावे पूजन । ही सेवा अमुपम ॥११५॥शुध्द ठेवून आचरण । अखंड ठेविले अनुसंधान । तीच त्यांची शिकवण । हें दिव्यत्व अमोघ ॥११६॥अखंड वाचन संद्ग्रंथाचें । धडे गिरविले सद्विचारांचे । जें जें अनुकरणीय त्याचे आचरण झाले ॥११७॥वृथा न बहर भावनांचा । कधीं न दुराग्रह स्वमताचा । निकटवर्तियास ताप यांचा । कणमात्र नसे ॥११८॥अतिनेमक बोलणें । सुत्रमय उत्तर देणें । प्रतिपक्षांचे साहणें । कठोर वचना ॥११९॥उलट त्याचाच करुन गौरव । वादवादास न देती वाव । लीनपणाचा स्वभाव । कदा न सोडती ॥१२०॥दाटून उपदेश न करणें । योग्य तें पुन:पुन: वदणें । भक्ति मार्गावरी आणणें । हर एकासी ॥१२१॥शंका त्यांच्या दूर कराव्या । परमार्थीवृत्ती भराव्या । सद्वर्तनीं आणाव्या । चित्त वृत्ति ॥१२२॥जो स्वत: सन्मार्गी लागला । त्यानें त्याच मार्गे न्यावें दुसर्याला । जो भक्तिभावें येईल त्याला । समजावोनी ॥१२३॥म्हणोनी किर्तन आरंभिलें । तें उत्साहें तडिस नेलें । निरुत्साहाचें प्रसंग आले । तरी अखंड किर्तन ॥१२४॥अत्यंत निरपेक्ष बुध्दि । दूर सारी करी उपाधि । करी साधन समृध्दि । सुखोपायें ॥१२५॥सदा विवेक जागृत । घेती लोकमत विचारांत । परीं मनींचा निर्यण निश्चित । उत्स्फूर्त असे ॥१२६॥जें जें संत अवतरले । प्रकृतिपरत्वें वेगळें भासलें । परी ज्यानें अंतर ओळखले । तोचि धन्य ॥१२७॥तात्या आणि मामा । गाती ईश्वर महिमा । परि एकाची एकास उपमा । न साहे ॥१२८॥दोघे करिती किर्तन । परि त्यांचें स्वरुप भिन्न । भक्ति भावें अनन्य । तरीही वेगळे ॥१२९॥किर्तन एक परि रंग वेगळा । भक्तीभाव एक परि खाक्या निराळा । निष्ठा नियमितपणा एक परि आगळा । वाण याचा नि त्याचा ॥१३०॥परिस्थितीचा किंकर । असे प्रत्येक नर । म्हणोनि फरक फार । कालपरत्वें ॥१३१॥तात्यांचे साथीदार । सुदैवें होते अपार । त्यांचे पाठांतर फार । आणि समय स्फूर्ति ॥१३२॥रंजवून मन श्रोत्यांचे । तात्या काम करिती अध्यात्म प्रसाराचें । तेंच अंतरीं जिरविण्याचें । काम होते मामांना ॥१३३॥तेथें करमणुकीस नव्हता वाव । साथीदारांचाही अभाव । सुबुध्द साक्षेपी श्रोते सदैव । ठाव शोधिती किर्तनाचा ॥१३४॥अखंड नामस्मरण । हेचि उत्तम किर्तन । म्हणोनि तेच अधिक करुन । मामा करवून घेती ॥१३५॥मामा आणि तात्या । एकमेकांना पूरक उभयता । निवड मामांची करिती तात्या । पूर्ण विचारें ॥१३६॥येणे परी मामांनी । श्रवण केलें अर्थांतर साधुनी । तें भिनविलें साधन करुनी । सद्गुरुप्रसादे ॥१३७॥सारग्राही मामांचे वचन । तपशिलासह तात्यांचे प्रवचन । करविणें, विवरणें हे दोन । मार्ग होते दोघांचे ॥१३८॥हातीं घेऊन किर्तनमाला । दोघे आले शारदा मंदिरला । दोघांनी कंठी हार घातला । परी शोभती वेगळेपणें ॥१३९॥देहधर्म आपआपुले । नियोजीत कार्य आपआपले । शोधून मार्ग पाहिजे सुधारले । केवळ अनुकरण तें नाटक ॥१४०॥म्हणोन वैराग्य आणि विवेक । दोन पंथ धरी साधक । ते बळकट तितका त्तो तडक । पोचे पैलतीराला ॥१४१॥उपाधि लागती शरीराला । त्यांच्या बेताल पडे घाला । परी त्यांची झळ अंतराला । न लागू देती संत ॥१४२॥यापरी जीवन । संसारीं असोन भिन्न । जैसे वर्णिती संतजन । तैसे आंखिले रेखीव ॥१४३॥“काही करणें ?” नव्हें ! कांहीं होणें । हा साधन प्रभाव दाखविणें । सामान्यासारिखें राहणें । तरी असामान्य ॥१४४॥निर्भय समाधानी वृत्ती । नेत्र बाह्यसृष्टि न देखती । सदा रमले चित्तीं । श्रीरामचरणीं ॥१४५॥जरी अंतरीं विषयांची खळबळ । ती चेहर्यावरी उमटे तत्काळ । परी येथें चेहरा शांत निर्मळ । प्रसन्न दिसे मामांचा ॥१४६॥जो संसार तापें तापला । तो डोई ठेवी चरणाला । पाहोनी मुखकमळाला । क्षणैक होई सुप्रसन्न ॥१४७॥विसरोनी संसार । जरी एक क्षणभर । तो म्हणें हेंचि देवद्वार सुचवा । तोचि निश्चय व्हावा । जो मामांचा ॥१४९॥माघ महिना मामांचा । श्रीसमर्थांचे स्मरण करण्याचा । दासबोध वाचनाचा । नेम होता ॥१५०॥एकदां रात्रीं वाचत बैसले । तों सापाचे पोर हाताशीं बिलगले । आणि तेथेंचि स्थिरावलें । कां देव जाणें ? ॥१५१॥स्पर्श लागतां गारं । मामा राहिले खबरदार । निश्चल राखोनी शरीर । अर्पिले श्रीसमर्थचरणी ॥१५२॥सुरुं ठेविले दासबोधवचन । साप गेला कांही वेळांनें निघोन । ही वृत्ती असामान्य । सूचक आणि उद्बोधक ॥१५३॥तैसेच एकदां विंचवाने । दंश केला अति त्वेषानें । एकाग्र नामस्मरणानें । मामांनी विंचू उतरविला ॥१५४॥एकदां एका कोनाडयांत । एक वस्तु होती सुरक्षित । गांधिल माशांचे पोळें लोंबत । राहिलें काहीं काळानें ॥१५५॥मामा निवांतपणे गेले । आपली वस्तु घेऊन आले । गांधिल माशांचे मन न झालें । डंख करावया सिध्द मामांना ॥१५६॥मामांच्या किर्तनाची निर्भत्सना । लोक करिती नाना । न शिवे तो मळ मामांच्या मना । यत्किंचित ॥१५७॥ही समूळ बदललेली वृत्ति । कितीएक प्रसंग दाखविती । विचक्षण निरीक्षक चित्तीं । म्हणती हें संतपण ॥१५८॥रेखिलें जीवन ऐसे । जेथें विषय वृत्तीस वावच नसे । सदा परमार्थाचे पिंसे । अष्टौप्रहर ॥१५९॥जावें हनुमत् समाधि दर्शना । चित्त लावावें वाचना मनना । अथवा अनुसंधाना । निरंतर ॥१६०॥वाचावें रामायण भागवत । अध्यात्म चर्चावें सादयंत । किंवा रमावें किर्तनांत । हा छंद मामांचा ॥१६१॥कधीं न करिती गप्पा गोष्टी । वाउग्या चर्चा करमणुकीसाठीं । कधीं न खेळाची आवड मोठी । सदा रत नामस्मरणीं ॥१६२॥।घ्याव्या संतांच्या भेटी । सांगाव्या त्यांच्याच गोष्टी । यांतच मामांना आवड मोठी । जी कधी न विटे ॥१६३॥सद्ग्रंथांचा हव्यास । वाचनाचा भारी सोस । हंसक्षीर न्याय विशेष । त्यांत दिसे ॥१६४॥वाचणें ते स्वत:साठीं । उच्चार आचार शुध्दतेसाठीए । हीच मनास शिकवण मोठीं । शोधज्योत तत्वीं पडे ॥१६५॥सामान्यासारिखे दिसावें । परी असामान्य असावें । कैसे यासांठी शोधावें । मामांचे चरित्र ॥१६६॥लक्षावधि सामान्यजन । म्हणतील हें स्फूर्तिस्थान । करुं लागतील भगवद्भजन । ऐसे चरित्र मामांचे ॥१६७॥प्रहरो प्रहर साधन करिती । दुसर्याकरवीं करविती । शंका अडचणी निवारिती । मुमूक्षूंच्या ॥१६८॥घर ही करुन पाठशाळा । शिकविती अध्यात्माला । घर हीच प्रयोगशाळा । साधकांची ॥१६९॥कष्टविती देहासी । निरिच्छवृत्तीं अहर्निशीं । समवृत्ति लहानथोरांशी । सदोदित ॥१७०॥ऐसा साधनक्रम मामांचा । अखंड वर्षानुवर्षांचा । नव्हें तपानुतपाचा । अव्याहत अचूक ॥१७१॥इतिश्री गोविंदचरित् मानस । जें स्वभावेंचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । साधनसिध्दता नाम चतुर्थोध्याय: ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP