रक्तवहस्त्रोतस् - शीतपित्त उदर्द कोठ

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.

शीतमारुतसंस्पर्शात्प्रदुष्टौ कफमारुतौ ।
पित्तेन सह संभूय बहिरन्तार्विसर्पत: ॥१॥
त्वग्दुष्टिदोषत्रयजन्यत्वसामान्यात् कुष्ठानन्तरं शीतपित्तोद-
र्दादिनिदानम् । तस्य दोषत्रयजन्यत्वमाह-शीतमारुतसंस्पर्शा-
दित्यादि । पित्तेन सह संभूयेति स्वहेतूपचितेन पित्तेन
संभूय मिलित्वा । बहिरन्तरिति बहिस्त्वचि, अन्त: शोणि-
तादौ, विसर्पत: प्रसरत: ।
सटीक मा. नि. शितपित्त

पिपासारुचिहृल्लासदेहेसादाड्गगौरवम् ।
रक्तलोचनता तेषां पूर्वरुपस्य लक्षणम् ॥२॥
मा. नि. शीतपित्त २ पा. ३४४

गार वारा लागल्यामुळें वा बेग विधारणादि इतर कारणांनीं प्रकुपित झालेलें, कफ व वायू, पित्तासह रक्ताला दुष्ट करुन त्वचेवर एक प्रकारचे गांधील माशी चावल्यानंतर येतात तशा आकाराचे उत्सेध (चकंदळें) उत्पन्न करतात. यास शितपित्त किंवा उदर्द असें म्हणतात. तृष्णा, अरुचि, हृल्लास, अंगसाद, अंगगौरव, रक्तनेत्रता हीं लक्षणें या व्याधीच्या पूर्वरुपांत असतात.

वरटीदष्टसंस्थान: शोथ: संजायते बहि: ।
सकण्डूस्तोदबहुलच्छर्दिज्वरविदाहवान् ॥३॥
उदर्दमिति तं विद्याच्छीतपित्तथापरे
वाताधिकं शीतपित्तमुदर्दस्तु कफाधिक: ॥४॥
सोत्सड्गैश्च सरागैश्च कण्डूमद्भिश्च मण्डलै: ।
शैशिर: कफजो व्याधिरुदर्द इति कीर्तितं: ॥५॥

उददलक्षणमाह - वरटीत्यादि । सकण्डूस्तोदबहुलश्छर्दिज्वर
विदाहवानिति अत्र कण्डू: कफात्, तोदो वातात्; छर्दिज्वर-
विदाहा: पित्तादिति दोषत्रयलिंगम् । अनयो: शीतपित्तो-
दर्दयो:समानसंस्थानत्वेऽपि वाताधिकं शीतपित्तं,
कफाधिक उदर्द: ।
उदर्दस्य धर्मान्तरमाह सौत्सड्गैरित्यादि । उत्सड्गैर्मध्य
निम्नै:, शैशिर इति शिशिरसंभव: ।
मा. नि. शीतपित्त पा. ३४४-४५

अंगावर गांधीलमाशा चावल्यासारखीं मंडळें उमटतात. त्यामध्यें कंडू, तोद, दाह, हीं लक्षणें अधिक असतात. सार्वदेहिक लक्षणामध्यें क्वचित् ज्वर व छर्दी हीं लक्षणें असतात. उदर्द व शीतपित्त हे शब्द एकमेकांचे पर्याय असल्याचें जरी कांही लोकांचें मत असले तरी उदर्दामध्यें वाताचें अधिक्य असतें असें वर्णन माधवनिदानकाराने केलें आहे. त्यानें उदर्दाची इतर लक्षणेंही सांगितलीं आहेत. त्यामध्यें वस्तुत: एकही नवीन लक्षण नाहीं. `

`वरटी दष्ट संस्थान' या एका लक्षणामध्यें सोत्संग, सराग, कंडुयुक्तता व मंडल हीं लक्षणें येऊन गेलीं आहेत. टीकाकारानें उत्संग शब्दाचा अर्थ मध्यनिम्न (मध्यें खोलगट असलेला) असा केला आहे. तेही तितकेंसें योग्य नाहीं. त्वचेपेक्षां किंचित् उंचावलेलीं, लाल रंगाचीं मंडलें अंगावर उठतात. त्यांमध्यें मध्यें खोलगटपणा नसतो. उलट उंचवटा मध्यभागापेक्षां त्वचेकडे किंचित् निमुळता होत गेलेला दिसतो. तसेंच `शैशिर' थंडीमुळें किंवा शिशिर ऋतूंत उत्पन्न होणारा हें लक्षणही `शीत मारुत संस्पर्शात्' या कारणांतील उल्लेखानें गतार्थ झालें आहे. त्यामुळें स्वतंत्र म्हणून दिलेल्या उदर्दच्या श्लोकांत कांहींही नाविन्य नाहीं. समानार्थक श्लोक अनवधानानें पुनरुक्त झाला आहे असें आम्हांस वाटतें. शीतपित्त व उदर्दामधील वाताधिक्य आणि कफाधिक्य हे `व्यपदेशस्तु भूयसा' या न्यायानें सांगितलेले असले तरी सामान्य संप्राप्तीत पित्तप्रधान असे तीनही दोष असतात आणि रक्त हें दूष्य असतें. त्यामुळें लक्षणांत दाह पित्ताचें, कंडू हें कफाचें व तोद हें वाताचें लक्षण असतें. राग, कंडू, उत्सेध यांमुळें रक्तदुष्टी अनुमानितां येते.

असम्यग्वमनोदीर्णपित्तश्लेष्मान्ननिग्रहै: ।
मण्डलानि सकण्डूनि रागवन्ति बहूनिच ।
उत्कोठ: सानुबन्धश्च कोठ इत्यभिधीयते ॥६॥
त्वग्दुष्टिसामादत्रैव कोठे-भिधीयते-असम्यग्वमनेत्यादि ।
असम्यक्त्वं वमनस्यायोगमिथ्यायोगादिना, तथोदीर्णानां
पित्तश्लेष्मान्नानां निग्रहोअ वेगविधाराणं, तैर्मण्डलानि जायन्ते,
स कोठ:, अथवाऽयमर्थ: असम्यग्वमनोदीर्णौ पित्तश्लेष्मणौ
तथाऽन्ननिग्रह उपस्थितवेगस्यान्नस्य निग्रहश्छर्दिनिग्रह
इति यावत्, । तैर्हेतुभिर्भवन्ति । वमनस्य चासम्यवक्त्वमयोग-
मिथ्यायोगाभ्यां ज्ञेयं अतियोगस्य तु पित्तश्लेष्मकोठाकरत्वात्
एतेन हेतुलक्षणभेदाद्भिन्न: कोठ उदर्दात् । कोठो निरनुबन्ध:
तथा चोक्तं ``क्षणिकोत्पादविनाश: कोठ इति निगद्यते तज्ज्ञै:
इति ।
सानुबन्ध त्वकोठोऽभिधीयते । सानुबन्धता च पुन: पुनर्भवनेन ।
मा. नि. शीतपित्त ६ म. टीकेसह पा. ३४५

वमनाच्या असभ्यग् योगानें वा वमनाचा वेग आवरुन धरल्यामुळें उदारांत, झालेल्या पित्तकफामुळें रक्त दुष्ट होऊन त्वचेवर लाल वर्णाचीं कंडूयुक्त अशीं मंडलें पुष्कळ प्रमाणांत उत्पन्न होतात. त्यांना कोठ असें म्हणतात. हींच मंडलें पुन्हा पुन्हा वरचेवर उत्पन्न होणारीं असलीं म्हणजे त्यांना उत्कोठ असें म्हणतात. आमच्या मतें कोठ हा एकच व्याधी वस्तुत: आहे. पित्तानें होणारी रक्तदुष्टी व ती त्वचेच्या आश्रयानें असणें ही या व्याधीची संप्राप्ती आहे. शीतपित्त वा उदर्द, हें या व्याधीचें वातानुबंधानें उत्पन्न होणारे प्रकार आहेत. व्याधीच्या पुन्हा पुन्हा उत्पन्न होणार्‍या प्रवृत्तीस अनुलक्षून कोठालाच उत्कोठ असें म्हणतात.

चिकित्सा

वमन, विरेचन द्यावें. हरीतकी, सुंठी, मिरे, आमलकी, घृत. शर्करा, सारिवा, गुडूचि, मंजिष्ठा, निंब धान्यक, धमासा, अमसूल सूतशेखर वसंतकुसुमाकर, त्रिवंगभस्म, गंधकरसायन.

अपथ्य

उन्हांत जाणें, आंबट, विदाही, गुरु, अन्न वर्ज्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP