रक्तवहस्त्रोतस् - पाददाह

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


पादयो: कुरुते दाहं पित्तासृक्सहितोऽनिल:
विशेषतश्चड्क्रमत: पाददाहं तमादिशेत् ।
मा. नि. वातव्याधी ६२

पाददाहमाह-पादयोरित्यादि । विशेषतश्चड्क्रमतइत्यनेन
स्थितस्य मन्दो दाह इति दर्शयति । वैवर्ण्यादेरभावाद्वात-
रक्तादस्य मेद:
म. टीका पान २०८

प्रकुपित वात, फार चालल्यामुळें विशेष प्रकुपित होऊन पित्ताच्या व रक्ताच्या आश्रयानें पावलांमध्यें दाह हें लक्षण निर्माण करतो. चालण्यामुळें हें लक्षण वाढतें.

चिकित्सा :-

स्नेहन करुन पायास अवगाह स्वेद द्यावा. सारिवा, मंजिष्ठा, दशमूळें, एरंडेल, भल्लातक, म. यो. गुग्गुल व रास्नाकाढा हीं औषधें वापरावींत. वातपितघ्न औषधांचे लेप करावे. चंदन, अगरु व मसूरडाळ यांचा उपयोग करावा.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP