रक्तवहस्त्रोतस् - रक्तज कृमि

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


मार्ग

बाह्य

स्वभाव

रक्तदूषण

निदान

विरुद्धाजीर्णशाकाद्यै: शोणितोत्था भवन्ति हि ।
सु. अ. ५४-१८ पान ७७३

गुणधर्मानें परस्पर विरुद्ध असलेलीं द्रव्यें भक्षण करणे, शिळेंपाकें, नासलेलें, मलिन असें अन्न घेणें अजीर्ण भोजन करणें, भाज्या फार खाणें या कारणांनीं रक्तजकृमी होतात. कुष्ठरोगांत सांगितलेले कारणही रक्तजकृमीस कारणीभूत होतें. (च. वि. ७-११)

केशरोमनखादाश्च दन्तादा: किक्किशास्तथा ।
कुष्ठजा: सपरीसर्पा ज्ञेया: शोणितसम्भवा: ॥१५॥
ते सरक्ताश्च कृष्णाश्च स्निग्धाश्च पृथवस्तथा ।
रक्ताधिष्ठानजान् प्रायो विकारान् जनयन्ति ते ॥१६॥
सु. उ. ५४-१५ पान ७७३

शोणितजानां तु खलु कुष्ठै: समानं समुत्थानं; स्थानं-
रक्तवाहिन्यो धमन्य:; संस्थानम्-अणवो वृत्ताश्चापादाश्च
सूक्ष्मत्वाच्चैके भवन्त्यदृश्या:; वर्ण:-ताम्र: नामानि-
केशादा, लोमादा, लोमद्वीपा:, सौरसा औडुम्बरा,
जन्तुमातरश्चेति; प्रभाव:-केशश्मश्रुनखलोमपक्ष्मापध्वंस:,
व्रणगतानां हर्षकण्डूतोदसंसर्पणानि, अतिवृद्धानां च
त्वक्सिरास्नायुमांस-तरुणास्थिभक्षणमिति; (चिकित्सिम-
प्येषां कुष्ठै: समानं, तदुत्तरकालमुपदेक्ष्याम:)
च. चि. ७/११ पान ५४२

रक्तवाहीसिरोत्थाना रक्तजा जन्तवोऽणवा: ।
अपादा वृत्तताम्राश्च सौक्ष्म्यात्केचिददर्शना: ॥५१॥
केशादा लोमविध्वंसा लोमद्वीपा उदुम्बरा: ।
षट्‍ ते कुष्ठैककर्माण: सहसौरसमातर: ॥५२॥
वा. नि. १४/५१, ५२. सटीक पा. ५२९

रक्तजा: कृमयो रक्तवाहिसिरोत्थाना स्यु: । तथा अपादा ।
वृत्तास्ताम्रवर्णाश्च । सौक्ष्म्यात् - सूक्ष्मत्वकारणात्, केचि-
ददर्शना: प्रत्यक्षप्रमाणासमधिगम्या: कार्येणैवानुमीयन्ते ।
तेषां नामान्याह-केशादा, लोमविध्वंसा, लोमद्वीपा, उदुम्बरा
इति । तथा सहसौरसमातृभ्यां वर्तन्त इति सहसौर-
समातर: । सौरसमातृसंज्ञं नामद्वयम् । एवं षडेते रक्तजा:
कृमय: । अन्ये त्वेवं पठन्ति - ``सहजा रसमातर:'' इति ।
सह शरीरेण जायन्त: इति सहजा:; रसो माता-जननी,
तेषां तत्प्रभवत्वात्ते रसमातर इति । कुष्ठेन सहैकं कार्य-
रोमहर्षकण्डूतोदादिकं केशलोमध्वंसादिकं त्वक्सिरा-
स्नायुमांसतरूणास्थिभक्षणं वा, येषां त एवम् ।
टीका - पान ५२९ वा. नि. १४-५१-५२.

रक्तामध्यें उत्पन्न होणारे कृमी रक्तवाहिन्यांच्या आश्रयानें असतात. हे कृमी आकारानें बारीक, गोल, पाय नसलेलें असतात. कांहीं अत्यंत सूक्ष्म असल्यानें डोळ्यानें दिसूं शकत नाहीत. यांचा वर्ण बहुधा तांबडा असतो. केशाद, लोमाद,लोमद्वीप, सौरस, औदुंबर, जंतुमातर अशीं नांवें या वर्गातील कृमींच्या प्रकारांना दिली आहेत. सुश्रुतानें नखाद, दन्ताद, कुष्ठज परिसर्प अशीं नांवें निराळीं सांगितलीं आहेत. अरुणदत्तानें वाग्भटावरील टीकेंत सौरस आणि मातर या ऐवजीं सहज आणि रसमातर असे पाठ घेऊन रसमातर कृमींचें उत्पत्ती स्थान रस असतें असें त्यास म्हणावयाचें असले पाहिजे. शरीरांत स्वाभाविकपणें प्रकृतित: उत्पन्न होऊन शरीराच्या हिताची कार्ये करणारे सूक्ष्म कृमीहि कदाचित् सहज शब्दानें अभिप्रेत असतील. चरकानें या कृमींचा उल्लेख केला आहे. (अन्यत्र सहजेभ्य च. वि. ७-९)

रस रक्त समान अधिष्ठानाचें रसोत्पन्नकृमीचाही रक्तोत्पन्नकृमीमध्यें समावेश केला असावा असें दिसतें. अरुणदत्ताचा हा पाठ स्वीकारला असतां चरकानें उल्लेखलेले सहजकृमी ते रस रक्तज असतात अशी विशेष माहिती मिळते. परंतु रक्तज प्रकाराचे सहाही कृमी कुष्ठरोग उत्पन्न करणारे असतात या वाग्भटाच्या वचनाशीं सहजकृमीची संगति लागत नाहीं. यासाठीं अरुणदत्ताच्या पाठाचा विचार स्वतंत्रपणें करावा. सुश्रुतानें रक्तजकृमींची संख्या सातही दिली आहे त्यातील `किक्विश' या प्रकारच्या कृमीचे कार्य काय असावें तें स्पष्ट होत नाहीं. या कृमीमुळें केस, श्मश्रु, रोम व पापण्या गळून पडतात किंवा कुरतडल्यासारख्या होतात. आधीच उत्पन्न झालेल्या व्रणामध्यें हे कमीं निर्माण झाले असतां हर्ष, कंडू, तोद, व्रण पसरणें हीं यांची लक्षणें होतात. हे कृमी फार वाढले असतां त्वचा, स्नायू, सिरा मांस, तरुणास्थी भक्षण करतात (किडतात, झिजतात). रक्तदुष्टीचे इतर विकारहि होतात.

चिकित्सा

चिकित्सा कुष्ठाप्रमाणें करावी. (च. चि. ७/११)
रक्तशोधन व तिक्तरसात्मक द्रव्यें वापरावी.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP