मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|उत्सव| योगमाहात्म्य उत्सव विषय वासुदेव-चरित-सार आज्ञा मागणी भिक्षा समारंभ वासुदेवांचा निरोप वासुदेव समाधिस्थ झाले भास्कर ब्राह्मणाची कथा गुरूः साक्षात्परब्रह्म वासुदेव-चरित्र-सार योगमाहात्म्य ध्यानयोग दत्तदासांची महती आध्यात्मिक-कर्मयोग विभूतिपूजनासाठी आज्ञा मागणी कृतज्ञतावचन अंगार्याचा उत्सव - योगमाहात्म्य श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन पूजेनंतर Translation - भाषांतर योग हाचि दंड इंद्रियदमना । योजिती साधना गुरुराज ॥१॥शत्रूंच्या कंदना योग हे हत्यार । षडरि-संहार साधावया ॥२॥दैव फ़िरवाया मृत्यु चुकवाया । देति योगाश्रया गुरुराय ॥३॥अंतरीची वृत्ति शमन कराया । घालीति योगीं या गुरुराज ॥४॥बलहीना लागी परमात्मप्राप्ती । नाहींच संप्राप्ति नियम हा ॥५॥’नहि बलहीने न आत्मा’लभ्यते । ऐसेच सांगतो वेदपुरुष ॥६॥योगे प्राप्तबल होतसे मनुजा । त्याचियाच काजा योगाभ्यास ॥७॥अष्टांगयोग हा शस्त्र अनुपम । तेजाचे की धाम अपूर्वची ॥८॥इंद्रिये वश होती वश होते जग । जडतांचि योग बलवान ॥९॥बलाचिया योगे ज्ञान निर्धारत । कैवल्य प्राप्त होत ज्ञानयोगे ॥१०॥योगाविण ज्ञान पंगूच म्हणती । म्हणोनी साधिती योगसंत ॥११॥ज्ञान निर्धारत विश्वचि हा जीव । नाही दुजाभाव वास्तविक ॥१२॥अद्वितीय ब्रह्म एकचि हा आत्मा । जीव परमात्मा ज्ञान बोले ॥१३॥परि बलावीण बाघ पंगू होत । राहे भयभीत जीव मनी ॥१४॥भय निवाराया शत्रूंते नासाया । मृत्यु चुकवाया योगशास्त्र ॥१५॥हत्यार अपूर्व गुरु आम्हां देती । मग खंड पाडिती कामादिकां ॥१६॥यम भीत सदा या योग दंडासी । योग्याच्या इच्छेसी मान देई ॥१७॥योगसिद्ध नर प्रेत उठवितो । यमा ठकवितो निजबळे ॥१८॥यमपाश फ़ोल होती योग्यापुढे । माहात्म्य हे गाढे योगीयाचे ॥१९॥योगी पुत्र देतो ज्याच्या दैवी नाही । सकलही पाही देतो योगी ॥२०॥पर्जन्याते पाडी चुकवी अवर्षणा । ग्रहांसही जाणा सत्ता त्याची ॥२१॥सकळ दैवते तयाच्या स्वाधीन । योग अभ्यसन ऐसे असे ॥२२॥सकलही सत्ता योग्या प्राप्त होत । त्रिभुवन होत मत्ता त्याची ॥२३॥जेथे जेथे योग दंडधारी फ़िरतो । विजय पावतो तेथे तेथे ॥२४॥आशीर्वाद त्याचा होत सामर्थ्याचा । सिद्ध त्याची वाचा सर्वकाळ ॥२५॥चिंतिले ते होय कल्पिले साकार । ऐसे सर्व सार योगाचे की ॥२६॥योग ईश्वरासी साधला जयासी । त्याच्या महात्म्यासी कोण जाणे ॥२७॥तोच दत्तगुरु तोच अवधूत । वासुदेव होत तोच जाणा ॥२८॥किमया ही आहे जो का योगदंड । सामर्थ्य उदंड तयाचे की ॥२९॥विनायक झाला अनुग्रह गुरुचा । प्रादुर्भवे साचा वासुदेव ॥३०॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP