मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|उत्सव| वासुदेव समाधिस्थ झाले उत्सव विषय वासुदेव-चरित-सार आज्ञा मागणी भिक्षा समारंभ वासुदेवांचा निरोप वासुदेव समाधिस्थ झाले भास्कर ब्राह्मणाची कथा गुरूः साक्षात्परब्रह्म वासुदेव-चरित्र-सार योगमाहात्म्य ध्यानयोग दत्तदासांची महती आध्यात्मिक-कर्मयोग विभूतिपूजनासाठी आज्ञा मागणी कृतज्ञतावचन अंगार्याचा उत्सव - वासुदेव समाधिस्थ झाले श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन वासुदेव समाधिस्थ झाले Translation - भाषांतर वासुदेव द्त्तरुप । आज झाले निजरुप ॥१॥आनंदनाम संवत्सर । जेष्ठ महिना होता थोर ॥२॥झाला होता अतिसार । मळ-प्रक्षालन थोर ॥३॥सकळ धुवोनी काढिले । शरीर स्वामिनी आपुले ॥४॥शुद्ध केला निज देह । सांडीयेला सर्व संदेह ॥५॥योग अवलंबोनीयां । शक्तिवंत केली काया ॥६॥नर्मदेसी गेले पायां । तीर्थी धुविली निजकाया ॥७॥पद्मासन घालोनीयां । एकाग्र दृष्टी करोनीयां ॥८॥स्वामी निजानंदी मग्न । निजस्वरुपी झाले लग्न ॥९॥अमावस्या टाकीयेली । प्रतिपदा तिथी घेतली ॥१०॥मध्यरात्र समयासी । सोडियेले निजकायेसी ॥११॥ब्रह्मार्पण तनू केली । दत्तरुप मूर्ति ठेली ॥१२॥==आज्ञा मागणीआज्ञा द्यावी महाराज । आपुल्या पुजेचीये काज ॥१॥पादुकांते उचलवया । स्नानादिक त्यां घालाया ॥२॥उपचार समर्पाया । सकळ सोपस्कार व्हाया ॥३॥आज्ञा द्यावी दत्तात्रेया । आज्ञा द्यावी अत्रितनया ॥४॥आज्ञा द्यावी वासुदेवा । आज्ञा द्यावी द्त्तदेवा ॥५॥पूजनाचा आज दिन । करणे नाथ आज्ञापन ॥६॥प्रथम पूजा करयासी आज्ञा देई तूं प्रेमेसी ॥७॥कृपादृष्टी मज पाहणे । मजलागी शुद्ध करणे ॥८॥मजठाय़ी संचरावे । मजलागी बळ द्यावे ॥९॥माझे हाती करवा कार्य । श्रीगुरुराज दत्तात्रेय ॥१०॥गरुडेश्वराहूनी विभूति । पाठविली त्वां श्रीपति ॥११॥पूजन झाले तुमचे देवा । श्रीगुरुराजा वासुदेवा ॥१२॥विभूतिचे झाले पूजन । आम्ही केली विभूतिग्रहण ॥१३॥तेव्हा पासुनियां देवा । करितसो या उत्सवा ॥१४॥वार्षिक दिन तोच आज । प्राप्त झाला महाराज ॥१५॥याच कार्यासाठी देई । आज्ञा मज गुरुमाई ॥१६॥प्रथम करणे पूजन । मग उच्छिष्ट भोजन ॥१७॥मग प्रदोष पूजन विभूतिचे मग पूजन ॥१८॥ऐसा तुमचा उत्सव द्त्ता । पूर्ण करा प्रगट सत्ता ॥१९॥आज्ञा द्यावी आरंभाया । आतां मज श्रीगुरुराया ॥२०॥आम्हां ठायी संचरावे । सकळ वळ आम्हां द्यावे ॥२१॥नाथा येथे प्रगटावे । पूजन करवोनि घ्यावे ॥२२॥स्वये घ्यावी सकळ पूजा । सोपस्कार महाराजा ॥२३॥उणे कांही येथे नसो । सकळ समृद्धता असो ॥२४॥आम्हांसाठी द्त्तात्रेय । करवी आतां निजकार्य ॥२५॥केले प्रथम मंगलाचरण । आतां धरिले तुझे चरण ॥२६॥तूज करितो नमन । केले विश्वासी वंदन ॥२७॥विश्वात्मक तूंच देव । सकळ तूझेच वैभव ॥२८॥तव नमितो चरणांसी । नमन घ्यावे दयाराशी ॥२९॥नमुनीयां तुजलागी । ध्याउनियां अंतरंगी ॥३०॥आशीर्वाद मी मागतो । चरणी शिर हे ठेवितो ॥३१॥अंगिकारा या दासाला । गुरुराया श्रीदयाळा ॥३२॥विनायक तुमचा दास । आतां कराजी आज्ञेस ॥३३॥==प्रसाद याचनाआतां द्यावा नाथा प्रसाद ताटींचा । घास अमृताचा द्यावा स्वामी ॥१॥अमृतमय आम्हीं बनुनी रहावे । तुझ्या कृपे व्हावे अमृताचि ॥२॥जन्ममरण जावे आमुचे हरुनि । आमुच्या वदनी अमृत घाला ॥३॥पुत्रवत्सल माता जेवि की बालका । घोस घाली मुखा वात्सल्याने ॥४॥क्षुधा आणि तृषा लया याची जावी । बालकास यावी पुष्टी तुष्टी ॥५॥प्रेमाचाची घांस मुखी त्या घालित । आरोग्य इच्छित बालकाचे ॥६॥तैसे आमुच्या मुखीं अमृत घालावे । निरामय करावे आम्हांलागी ॥७॥आमुचे कृतदोष सकळ नष्ट व्हावे । आमुचे साधावे परम हित ॥८॥अपेयांचे पान अभक्ष्य भक्षण । प्रायश्चित जाण होवो तया ॥९॥याचसाठी देई आम्हांते उच्छिष्ट । जे का यज्ञ-शिष्ट सर्व असे ॥१०॥सकळ यज्ञांचे जे का पुण्य जाण । त्याचेच प्रापण व्हावे आम्हां ॥११॥यज्ञ-शिष्ट अन्न त्याची थोर थोरी । त्रैलोक्यामाझारी दुर्मिळ ते ॥१२॥याचसाठी द्यावा आम्हाते प्रसाद । अमुचा विषाद लया जावो ॥१३॥शोक भय जावो मोह लय पावो । आमुचे परम होवो कल्याणचि ॥१४॥तुझीये झोळींतूनी काढूनीया देई । भक्ष्य जे का होई परमान्न ॥१५॥विनायक म्हणे प्रसाद घ्यावया । आज्ञा दत्तात्रेया आतां द्यावी ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP