मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|उत्सव| भास्कर ब्राह्मणाची कथा उत्सव विषय वासुदेव-चरित-सार आज्ञा मागणी भिक्षा समारंभ वासुदेवांचा निरोप वासुदेव समाधिस्थ झाले भास्कर ब्राह्मणाची कथा गुरूः साक्षात्परब्रह्म वासुदेव-चरित्र-सार योगमाहात्म्य ध्यानयोग दत्तदासांची महती आध्यात्मिक-कर्मयोग विभूतिपूजनासाठी आज्ञा मागणी कृतज्ञतावचन अंगार्याचा उत्सव - भास्कर ब्राह्मणाची कथा श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन भास्कर ब्राह्मणाची कथा Translation - भाषांतर तुज भिक्षा करण्याचा । काम विप्र भास्कराचा ॥१॥पुरविला तुवां साचा । उत्कर्ष तुझीये सिद्धीचा ॥२॥अन्नपूर थोर केले । चार सहस्त्र जेविले ॥३॥तेच येथे महिमान । प्रगट करी दयाघन ॥४॥किर्ती ऐकिली देवाची । नृसिंह सरस्वतिची ॥५॥गाणगापूरिचे मुनिदेव । ऐकीयेले त्यांचे वैभव ॥६॥इच्छा झाली त्याच्या मना । आपण जावे तेथ दर्शना ॥७॥भिक्षा करावी स्वामिसी । सेवावे की तदुच्छिष्टासी ॥८।दरिद्री होता तो ब्राह्मण । तिघांपुरते घे प्रमाण ॥९॥तांदुळ डाळ वरकड । इतुकाच करी मांड ॥१०॥गाठोडे त्याने बांधियेले । गाणगापुरी येणे केले ॥११॥तंव येथे समाराधना । करिती ब्राह्मण-भोजना ॥१२॥सहस्त्र संख्या होय मिति । प्रत्यही अशी असे रीति ॥१३॥परम लाजला ब्राह्मण । म्हणे अपुले दरिद्रपण ॥१४॥ब्राह्मण भोजनी जेवित । उशाशि गाठोडे ठेवित ॥१५॥तीन मास क्रमीयेले । ऐसे झाले जाणा भले ॥१६॥त्याची पाळी मुळी येईना । खिन्न झाला बहु मना ॥१७॥उपहास करिती जन । घालि स्वामीसी भोजन ॥१८॥कोणे परी त्या बोलती । जेवाया आला निश्चिती ॥१९॥भिक्षा करणे ढोंग याचे । जेवण मनी साधायाचे ॥२०॥येथे फ़ुकाचे भोजन । म्हणुनि आला हा ब्राह्मण ॥२१॥ऐसे त्यासी बोलताती । कुचेष्ठा बहु करिती ॥२२॥खिन्न झाला तो ब्राह्मण । म्हणे माझे हीनपण ॥२३॥कळवळले गुरुनाथ । आतुर्बळी श्रीसमर्थ ॥२४॥भक्ताभिमानी देव असे । भक्तांसाठी उडी घेतसे ॥२५॥भक्तांसाठी कळवळे । त्याचे ह्र्दय कोवळे ॥२६॥बोलाविले भास्करासी । आज भिक्षा तुजपाशी ॥२७॥सर्व द्विजांसवे आम्हां । जेउ घालि द्विजोत्तमा ॥२८॥म्हणे सामर्थ्य देवाचे । सत्य करील अपुले वाचे ॥२९॥अंगिकारी तो शाहाणा । नमन करित चरणां ॥३०॥गुरु सांगती बोलवाया । सकळही द्विजरायां ॥३१॥बोलावितां हांसताती । उपवास आज म्हणती ॥३२॥कैचा आला हा ब्राह्मण । दुदैव आमुचे हे पूर्ण ॥३३॥लाज न कैसी वाटे तुज । बोलाविसी कां रे आज ॥३४॥केला तुवां मूर्ख्पणा । उपवास आम्हां जाणा ॥३५॥त्याचे कोणी न ऐकती । स्वामी स्वये सांगताती ॥३६॥आज येथेच जेवावे । तुम्ही घरी नच जावे ॥३७॥ब्राह्मण मनी विचारिती । कैशी होणार ही स्थिती ॥३८॥मठामाजी सिधा असे । शिजविती वाटतसे ॥३९॥लोक ऐसा विचार करिती । स्वामि पुन्हा बोलाविती ॥४०॥स्त्रिया पुत्रासवे यावे । आज आकंठ जेवावे ॥४१॥कोपा चढले ब्राह्मण । त्यासि देती की दूषण ॥४२॥मग शिष्ठ बोलताती । विचार करा निगुती ॥४३॥गुरु निरोप सांगतसे । याचा काय दोष असे ॥४४॥आह्मी तथास्तु म्हणावे । गुरु आम्हां न कोपावे ॥४५॥भास्करासी आनंद झाला । स्वयंपाक करी भला ॥४६॥आपुली छाटी तया देती । अन्नावरी घाल म्हणती ॥४७॥करित प्रार्थना द्विजांची । ऊर्मि येत त्यां कोपाची ॥४८॥स्वये गुरु आज्ञापिती । हां हां मग सकळ म्हणती ॥४९॥मग हर्षले ब्राह्मण । खुलले त्यांचे अंत:करण ॥५०॥वाढा वाढा ऐसे म्हणती । आग्रह फ़ार फ़ार करिती ॥५१॥सकळ ब्राह्मण जेविले । स्त्रीपुत्रां भोजन दिधले ॥५२॥अतिशूद्र बोलाविले । त्यांसी अन्न देवविले ॥५३॥कोणी असे उपवासी । यावे त्यांनी भोजनासि ॥५४॥ऐसे नवल चमत्कार । दावोनियां गुरु साचार ॥५५॥भास्करासी निरोप देती । भोजन करी आतां म्हणती ॥५६॥तोही आकंठ जेविला । मग गुरुसी म्हणाला ॥५७॥भीमेमाजी सकळ अन्न । सोडियेले तेव्हा जाण ॥५८॥चार सहस्त्र झाली मिती । ऐसी आहे प्रभूची कीर्ती ॥५९॥तीच आतां मी गावोनि । चरणी शिर ठेवोनी ॥६०॥साक्षात्कार तोच व्हावा । येथे प्रसाद करावा ॥६१॥व्हावा येथे अन्नपूर । वहावी अमृताची धार ॥६२॥भाविक सर्व तृप्त व्हावे । परम कल्याण साधावे ॥६३॥विनायक म्हणे देवा । आपुल्या विस्तरा वैभवा ॥६४॥==आज्ञा मागणीसायंकाळ ( पुजे पूर्वी )आज्ञा द्यावी महाराज । आपुले पूजेचीये काज ॥१॥पादुकाते उचलावया । स्नानादिक त्यां घालाया ॥२॥उपचार समर्पाया । सकळ सोपस्कार व्हाया ॥३॥आज्ञा द्यावी दत्तात्रेया । आज्ञा द्यावी अत्रितनया ॥४॥आज्ञा द्यावी वासुदेवा । आज्ञा द्यावी दत्तदेवा ॥५॥स्वये येथे प्रगटोनि । आमुच्या ठायी संचरोनी ॥६॥कार्य करवोनि घ्यावे । आम्हालागी यश द्यावे ॥७॥कार्य तुमचे उत्सव तुमचा । मीहिपण असे तुमचा ॥८॥म्हणोनियां दत्तात्रेया । माझे हाती करवा कार्या ॥९॥विजयध्वजा माझे हाती । द्यावी तुम्ही बा श्रीपति ॥१०॥महिमा जागवायासी । स्थान प्रगट व्हावयासी ॥११॥साक्षात्कारी प्रगटावे । निजकार्य करवावे ॥१२॥अधिकारी आम्हां करावे । कृपादृष्टी आम्हां पहावे ॥१३॥गुरुदोष नष्ट व्हावे । शुद्ध आम्हां बनवावे ॥१४॥शुचिर्भूत आम्हां कराया । सोवळेपण आम्हां आणाया ॥१५॥निजदृष्टी आम्हां पहावे । आमुच्या ह्रदयी प्रगटावे ॥१६॥आपणासी स्पर्शावया । आज्ञा द्यावी दत्तात्रेया ॥१७॥चरणपूजा करावया । उपचार समर्पाया ॥१८॥आज्ञा द्यावी दत्तात्रेया । आम्हांलागी श्रीगुरुराया ॥१९॥स्नानकार्य साधायासी । संकल्प शुद्ध करायासी ॥२०॥उत्सव यज्ञ हा करवा । आमुचेसाठी दत्तदेवा ॥२१॥पूर्णानंद स्वरुपाने । येवोनीयां आनंदाने ॥२२॥यज्ञकंकण माझे हाती । बांधिलेत रमापति ॥२३॥भजन याग पूर्ण कराया । यज्ञ सिद्ध येथे व्हाया ॥२४॥करवावे निजकार्य । संकल्प जेणे सिद्ध होय ॥२५॥उपासना वाढवाया । तैशा तुझ्या सांप्रदाया ॥२६॥भजनयाग आवश्यक । करवावा तो नित्यक ॥२७॥भजनपूजनाचा रंग । येथे करा रमारंग ॥२८॥आम्हां करा भजनी दंग । विकसावे अंतरंग ॥२९॥काया वाचा आणि मने । भजन करणे आनंदाने ॥३०॥पुरोपुर रंग यावा । निजजन दंग व्हावा ॥३१॥प्रसादवात येथे वहावा । प्रसादगंध दरवळावा ॥३२॥प्रसादाचे अवभृथस्नान । यज्ञ याग जेणे पूर्ण ॥३३॥भजन यज्ञीं आम्हां घालावे । आम्हालागी प्रसादावे ॥३४॥भजनामृते पान भोजन । घडवा आम्हां दयाघन ॥३५॥निजकृपमृत पायस । प्रसाद द्यावया आम्हांस ॥३६॥यज्ञकर्म प्रसादाचे । नित्य करवा येथे साचे ॥३७॥यागामध्ये दोन भेद । प्रकृति विकृति वरद ॥३८॥प्रकृति याग नित्य भजन । विकृती विश्री जोपासना ॥३९॥जीवितावार्ध हा यागा । व्रतचर्या तूंच सांग ॥४०॥सत्य वदणे धर्म पाळणे । प्रत्यक्ष ईशालागी स्मरणे ॥४१॥व्रतचर्या या यागाची । असे जाणा त्याग साची ॥४२॥व्रतचर्या करवावी । आम्हांकडूनी पाळवावी ॥४३॥माझ्या करवी करवणे । भजन तुझे की प्रमाने ॥४४॥तेच ब्राह्मणभोजन । दक्षिणा कथेचे श्रवण ॥४५॥अग्रहार प्रवचन । नाममंत्र हेच दान ॥४६॥येथे स्वार्थाचे हवन । नियम येथे जे जे ध्यान ॥४७॥भजन हेच श्रेष्ठ साधन । तेच करवा येथे यजन ॥४८॥याच साठी आज्ञा द्यावी । आपुल्या या मंगलकार्यी ॥४९॥गरुडेश्वराहुनी विभूति । पाठविली की श्रीपती ॥५०॥अनुग्रह थोर केला । साक्षात्कार येथे दाविला ॥५१॥क्षणभर दर्शनासी । दिधले देवा तूं मजसी ॥५२॥उत्सव तुम्ही करविला । आम्हांकडुनी त्याचा भला ॥५३॥सोळावा हा असे उत्सव । पूर्ण करा वासुदेव ॥५४॥वार्षिक हे तुझे कार्य । सिद्ध करा दत्तात्रेय ॥५५॥निरंतर आम्ही भजनी । आळवूं तुज यश गावुनि ॥५६॥यास्तव आतां आज्ञा देई । कृतार्थता जेणे होई ॥५७॥विनायक तुजला शरण । यासी करी आज्ञापन ॥५८॥==आज्ञा मागणी( विभूती पूजनापूर्वी )विभूति पूजनासीं आतां आज्ञा देई । वासुदेव माई निजकृपे ॥१॥गरुडेश्वराहुनी प्रसाद पाठविला । निज हाती भला परात्परा ॥२॥पूर्णानंदे केली त्वदीय स्थापना । तूझीये पूजना सांगितले ॥३॥तुझीया नांवे स्थान हे स्थापियेले । अनुग्रहीत केले मजलागी ॥४॥चंपाषष्ठी दिन पहांटेची वेळ । मुहूर्त प्रबळ पाहोनियां ॥५॥संकल्प पूर्वक स्थापना करीयेली । मज सांगितली प्रसादखुण ॥६॥तीन वर्षे ऐशी करी उपासना । देईल दर्शना वासुदेव ॥७॥आज अवतार प्रत्यक्ष दत्ताचा । वासुदेव साचा यति श्रेष्ठ ॥८॥श्रीपादश्रियावल्लभ प्रथम अवतार । दुसरा साचार नरहरी ॥९॥नृसिंह सरस्वती गाणगापूरींचा । तृतीय हो साचा वासुदेव ॥१०॥पूर्णानंदे ऐसे मज सांगितले । मस्तकी ठेविले स्वकराला ॥११॥उपासना धर्म वाढवाया कारण । केले संकल्पन भजनाचे ॥१२॥तीन वर्षे ऐशी करित मी पूजा । तुम्हां महाराजा कळविले ॥१३॥गरुडेश्वरी तेव्हां नर्मदेचे तीरी । वास परिकरी तुमचा होता ॥१४॥पाठविली तेव्हा प्रसादाची खूण । स्वये तुम्ही आपण वासुदेवा ॥१५॥गुरुवार होता नक्षत्र पुनर्वसु । समय प्रदोषु पूजेसाठी ॥१६॥जेष्ठ तृतीयेसी पावली विभूति । आनंद आम्हांप्रती बहू झाला ॥१७॥उत्सव करावा पूजन विभूतीचे । म्हणोनियां साचे कल्पियेले ॥१८॥तुमची आज्ञा घ्यावी म्हणोनि लेखन । करणे संकल्पन बसलो मी ॥१९॥प्रथम भजन तुमचे करावे । म्हणोनि बरवे योजिले मी ॥२०॥मध्यान्हीचा होता तेव्हां शांत समय । जेव्हां गुरुराय प्रगटलां ॥२१॥एक क्षण मज साक्षात दावीयेले । निजरुप भले या स्थानांत ॥२२॥दुजीयासी तेव्हां दाविला दृष्टांन्त । कोणी यति येत शिष्यांसह ॥२३॥आम्ही आदरोनी तयासि पूजिले । स्वप्नांत पाहिले जागा होई ॥२४॥दुसर्यासी तैसा दृष्टांन्त दिधला । आपुल्या स्थापनेला स्वये केले ॥२५॥तोच हा उत्सव वार्षिक तुमचा । पातलासे साचा दयानिधे ॥२६॥गुरुवार होता नक्षत्र पुष्य होतं । प्रदोषकाळाते धरोनियां ॥२७॥आषाढाचा होता द्वितीयेच दिन । केले की पूजन विभूतीचे ॥२८॥मोठा समारंभ तेव्हां तो जाहला । साक्षात्कार दाविला तेव्हां तुम्ही ॥२९॥सोळावे हे वर्ष वाढविन आज । म्हणुनि महाराज आज्ञा द्यावी ॥३०॥आज्ञा द्यावी मज प्रसाद पूजाया । वासुदेवराया दत्तमुनि ॥३१॥तुझीया कृपेची आम्ही गा माणसे । भयते कायसे आम्हालागी ॥३२॥ढोंगी म्हणतील खरेच हे ढोंग । शुद्ध अंतरंग ढोंगे होई ॥३३॥इतर ढोंगाहुनी ढोंग हे विशेष । जिवितावधि यास आचरीन ॥३४॥लोकांसवे काय माझे असे काज । पुरवित चोज देव माझे ॥३५॥जैसा संकल्प मी करुनि ठेवितो । तैसा पुरवितो देव माझा ॥३६॥देवावांचूनि मी ओशाळा कोणाचा । साह्य करी साचा देव माझा ॥३७॥ऐसा अनुभव बहुतां दिसांचा । पाठिराखा साचा वासुदेव ॥३८॥ऐसे महात्म्य तूझे गाउनि मी वाचे । मागणे आज्ञेचे करितो की ॥३९॥आजवरि माझे लाड पुरविले । कौतुक माझे केले कितीपरी ॥४०॥आकाश ठेंगणे माझेसाठी तूज । माझे प्रेमकाज जननी तुज ॥४१॥त्याच अनुभवे आज्ञा मी मागतो । चरणी ठेवितो मस्तकाला ॥४२॥विनायक म्हणे केली विनवणी । तेणे चक्रपाणी संतु ला ॥४३॥==कृतज्ञता वचन( पूजेनंतर )आनंदाचा दिन देवे दाखविला । कृतकृत्य झाला भक्तजन ॥१॥वार्षिक निजकार्य देवे सिद्ध केले । आम्हां आनंदविले वासुदेवे ॥२॥महायज्ञ झाला आज तीन दिस । देवे प्रसादास केले आम्हां ॥३॥दिला आशीर्वाद प्रसाद पायस । तेणे अंतरास सुखवीले ॥४॥कायसे बोलावे कितीसे वानावे । कृपा वासुदेवे थोर केली ॥५॥उणे कांही नाही पडूं येथ दिले । स्वये सकळ केले कार्य थोर ॥६॥आपण संभार सकळ जमविला । आपणचि केला सिद्ध यज्ञ ॥७॥भजन रचविले जैसे जैसे हवे । सदय वासुदेवे जाणावे की ॥८॥प्रथमपासूनि कार्य शिरी घेतले । वासुदेवे केले सिद्ध थोर ॥९॥रचना प्रसादाची करोनि ठेविली । तैशी जमविली सामुग्रीही ॥१०॥आपणचि स्वये रचिले नाटक । गोड संविधानक रचियेले ॥११॥आपणचि तैसे नटोनियां आले । येथे संचरले आपणची ॥१२॥आपणचि केला सकळ जयजयकार । आशिर्वाद थोर आम्हां दिला ॥१३॥आमुच्या कल्याणाचा दिला आशिर्वाद । आपण वरद झालो म्हणती ॥१४॥आम्ही तुम्हांवरी प्रसन्न म्हणति । कल्याणाचे प्रति सांगताती ॥१५॥आपण आम्हां देती स्वये मोठेपण । ऐसे वात्सल्यपण प्रकाशिती ॥१६॥आमुची करिती सुखाने वाहवा । वत्सल स्वभावा प्रगटिती ॥१७॥धन्य तुम्ही आम्हां म्हणती वासुदेव । म्हणोनि माझा भाव तुम्हांपाशी ॥१८॥आज प्रिय भाव आम्हां जननीचा । काय माझी वाचा बोलेल की ॥१९॥प्रियपण आज दिसोनियां आले । काय वंदु भले बोलवेना ॥२०॥कार्य त्वांच केले आम्हां गौरवीले । काय सांगुं भले तुझे प्रेम ॥२१॥याहुनि आणिक बोलतां येइना । उगीच वल्गना काय करुं ॥२२॥अधिकचि आम्ही धरावा भक्तिभाव । तुज वासुदेव सेवावे की ॥२३॥तेथे भवसागर तरोनियां जावा । आम्ही रंगवावा निज आत्मा ॥२४॥तल्लीन होवोनियां रहावे अंतरी । सेवावे नरहरी तारकाला ॥२५॥हाच तुझा आहे उपदेश देवा । याच आम्ही भावा ओळखावे ॥२६॥शरण चरणासीं तुझ्या प्रिय भावेसी । घेई पदरासी वासुदेव ॥२७॥हेच माझे ज्ञान भक्ती वैराग्य पूर्ण । तरी नारायण पदरी घ्या ॥२८॥जैसा आहे तैसा मज पदरांत । घ्यावा की त्वरित वासुदेवा ॥२९॥याहुनि काय बोलुं तुजं काय सांगूं । याहुनि काय मागूं तुजपाशी ॥३०॥मागण्याचे नाही मजसी उरले । सर्वस्व मी केले त्वदर्पणा ॥३१॥आतां मागण्यांचे नसेच की कांही । कृपा मज पाही नित्य करा ॥३२॥तुझाच मी असे नसे कवणाचा । गुरुराया साचा भाव माझा ॥३३॥विनायक म्हणे अनन्य शरण । माझे तूं अरण करावे की ॥३४॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP