गुरुद्वादशी - देवांचा विचार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मागणी ऐकूनी प्रसन्न जाहले । आणिताती भले मनी देव ॥१॥
अवतार घ्यावा जगदुद्धारासाठी । धर्महानी मोठी वांचवाया ॥२॥
धर्मरक्षणासी अवतार घेणे । धर्माची करणे प्रतिष्ठा की ॥३॥
सत्पात्र, हे आहे ओळखिले मनी । येथेच जन्मोनी यावे आतां ॥४॥
करोनियां ऐसा विचार माधव । प्रगटीती भाव जगत्प्रभु ॥५॥
आश्वासिती तिज अर्थ सिद्ध होय । जगद्वन्द्य होय पुत्र तुम्हां ॥६॥
परी एक खूण सांगतो ऐकावी । अंतरी धरावी निश्चयाने ॥७॥
होय जो का पुत्र त्याचिया बोलासी । कधी न विघ्नासी तुम्ही कीजे ॥८॥
त्याच्या वचनी तुम्ही रहावे चिकटून । होऊं द्यावे पूर्ण त्याच्या इच्छे ॥९॥
ऐसे सांगोनियां अदृश्य जाहले । तेज संचरले सतीमाजी ॥१०॥
आपुल्या पतिसी सांगत वृत्तांत । होय आनंदित भर्ता तिचा ॥११॥
धन्य धन्य धन्य धन्य पतिव्रते । तुज उपमा ते नाही नाही ॥१२॥
मध्यान्हासी सूर्य येतां समयांसी । भिक्षुक वेषेसी दत्त येती ॥१३॥
अनमान कांही मुळी न करितां । भिक्षा अवधूता घालावी की ॥१४॥
हाच नेम नित्य राखावा सज्जनी । तेणे द्त्तमुनी तुष्ट होत ॥१५॥
पूर्ण झाले श्राद्ध पितर तृप्त झाले । मोक्षासी ते गेले खचितचि ॥१६॥
पतिव्रते तुझेयोगे घडला लाभ । जोडला पद्मनाभ आम्हां पाहे ॥१७॥
आतां अवतरोनी येईल तो खास । आमुच्या वंशास उद्धरील ॥१८॥
विनायक म्हणे अवतार कारण । ऐसे घडवून देव आणी ॥१९॥

N/A


References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.