मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|गुरुद्वादशी| आनंद निर्भरता गुरुद्वादशी विषय श्रीपाद-चरित्र-सार प्रभु यशः श्रवण माहात्म्य आनंद निर्भरता श्रीपादांचे पूर्व चरित पतिव्रतेस दत्तदर्शन पतिव्रतेस वरदान देवांचा विचार श्रीपादांचा अवतार रजकाची कथा अवतार समाप्ति गुरुद्वादशी - आनंद निर्भरता श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन आनंद निर्भरता Translation - भाषांतर झोपलो की जागा होतो । काय पहात मी होतो ॥१॥सुख किंवा दु:ख मज । कळेना हे मज चोज ॥२॥आप्तकाम पूर्णशांत । होतो निज स्वरुपांत ॥३॥निर्विकल्प निर्विकार । जैसा होतो मी सादर ॥४॥ठाव माझा मज नाही । सांडलो मी लवलाही ॥५॥कोठे मन सांपडेना । मीपणा तो गवसेना ॥६॥स्फ़ूर्ति माझी हरपली । बुद्धी माझी स्थिरावली ॥७॥मन माझे हरपले । कोणत्या रुपांत राहिले ॥८॥गवस मजला पडेना । कांही मजला कळेना ॥९॥आनन्दाचा परिभर । विनायका सविस्तरा ॥१०॥(प्रवचनात प्रसंग विशेषी केलेला )==कथा पडली अंगावरी । आतां करुं काय तरी ॥१॥कोठची झक मी मारिली । येथे येण्या मति झाली ॥२॥विनायक म्हणे देवा । काय म्हणूं या मानवा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP