गुरुद्वादशी - प्रभु यशः श्रवण माहात्म्य

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सायंकाळ

परम पावन यश तुझे नाथा । आमुचीया अर्था पुरवीसी ॥१॥
श्रवणि पडतां तुझे कीर्त्यमृत । शान्ति नव येत अनुपम ॥२॥
शांत होय चित्त इंद्रियेही शांत । मन सुखावत किती सांगुं ॥३॥
स्वस्थता ती येते अंत:करणासी । शांतीचे रसासी कोण वर्णी ॥४॥
विसरे संसार देहभान हरे । स्वर्गात विहरे जैसा कांही ॥५॥
अमर ते काया सुखही अमर । स्वरुप अमर त्याचे जाणा ॥६॥
अजर अमर होवोनी विहरे । ब्रह्माण्डीं संसरे निर्मुक्त तो ॥७॥
गुरु भजनाचा मेवा अमृताचा । अनुपम साचा की तो असे ॥८॥
अमृताचा घोट घटघट पितो । अमृतची देतो इतरां तो ॥९॥
अमृत भरले त्याचे सर्वांगांत । स्पष्ट ओथंबत इंद्रियांत ॥१०॥
अमृतांत बुडी मनाने दिधली । अमृतरुप झाली बुद्धी त्याची ॥११॥
सकळ अमृत दुजे नाही कांही । अनुपम पाही सुखयोग ॥१२॥
यश मुखी गावे कानाने ऐकावे । ह्रदय भरावे गुरुयशी ॥१३॥
यशोरुप व्हावे यशांत डोलावे । उन्मत्त बनावे यशपाने ॥१४॥
आनंदाचे भरे योग समाधिचा । लाभत सदांचा चित्तालागी ॥१५॥
सेवा गुरुयश होवोनी अवश । बनोनीयां ईश आपुले की ॥१६॥
विनायक म्हणे आनंदाची सीमा । तया परंधामा प्रेमे गांता ॥१७॥

N/A


References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.