TransLiteral Foundation

शिवरात्र - ’भस्मावशेष मदनं चकार’

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


’भस्मावशेष मदनं चकार’
सप्तमपूजनोत्तर

भट ऐसा नाही दुजा या जगती । अनुपम कीर्ति ज्याची असे ॥१॥
त्याचीच उपमा त्याजला साजते । थोकडी पडते इतर जे का ॥२॥
त्यासी प्रतिभट ब्रह्माण्डांत नाही । एकलाच पाही विजय पावे ॥३॥
कोणी न कधी केले तेच याने केले । महिमान भले अनुपम ॥४॥
अचिन्त्य कृत्यांचा एकची हा कर्ता । यासम परता कोणी नाही ॥५॥
दुर्जय सकळां अवश हा मोठा । धैर्याचा की सांठा मूर्तिमंत ॥६॥
सकल दुनियेते जेणे वश केले । दास बनविले ब्रह्मा विष्णु ॥७॥
इंद्र चंद्र वंश थोर थोर मुनि । सकल जिंकोनी ठेविले की ॥८॥
ज्याचा बाण कधी माघार न घेई । प्रतिपक्षाचा घेई, बळी, जो का ॥९॥
ऐसा महायोद्धा प्रेरिला देवांनी । सकल देवोनी साह्य त्यासी ॥१०॥
अकाली वसंत अप्सरांच्या संगे । जात असे मागे सहाय्यार्थ ॥११॥
ऐसा पुष्पधन्वा वश करण्यासी । सवे पार्वतीसी देवोनीयां ॥१२॥
पाठविती देव गिरि-कंदरासी । भूल बैरागियासी पाडावया ॥१३॥
आम्रमंजरीचा बघुनीया भर । आकर्ण ओढी मार धनु निज ॥१४॥
अप्सरा नाचती कोकिला आलापिती । वनदेवता वर्षती पुष्पभार ॥१५॥
पार्वती करोनी सकल शृंगार । उभी राहे समोर बैराग्याच्या ॥१६॥
अंगालागी भस्म वेष दिगंबर । समाधि-निर्भर योगिराज ॥१७॥
त्यासी जिंकावया भूल पाडावया । साधावया देवकार्या पाठवीती ॥१८॥
करितां टणत्कार निज धनुष्याचा । उघडिला साचा तृतीयनेत्र ॥१९॥
बह्नि प्रगटला काम भस्म झाला । ढीग तेथे पडला भस्माचा की ॥२०॥
तेव्हा पासोनियां कंदर्प-प्रतिभट । नम हे सुभट पडले की ॥२१॥
तया शरण जातां कामबाधा नोहे । न छ्ळी तो पाहे शिवभक्ता ॥२२॥
विनायक म्हणे कृपा संपादावी । मात्रा न चालावी कामाची की ॥२३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-25T18:36:31.2870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

operant reserve

  • व्यापारक संचय 
RANDOM WORD

Did you know?

गांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल? नांवे कशी पडली असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.