TransLiteral Foundation

शिवरात्र - गणांची तल्लीनता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गणांची तल्लीनता
ऐसे ते भजन रंगांत की आले । कोणी न ऐके भले पार्वतीचे ॥१॥
कडीये घेवोनी शिव नाचताती । केस मोकळे होती तेव्हा तीचे ॥२॥
अस्ताव्यस्त झाला सकळ परिवेष । परि बहु आवेश नाचण्याचा ॥३॥
कोणी नाही जागा सकळ तल्लीन । आनंदाचा घन मिसळता ॥४॥
शिवासंगे नाचतां समाधिनिर्भर । आनंदासी भर थोर आला ॥५॥
आनंदसागरी बुडोनि राहिले । प्रमत्त बनले आनंदाने ॥६॥
आनंदाचा कैफ़ आला आंगावरी । आनंद अंतरी समावेना ॥७॥
उन्मत्त बनले बहुत नाचती । आनंदाची स्थिति वर्णवेना ॥८॥
कधी न अनुभविले ऐसे प्राप्त झाले । मन भरुनी गेले तेव्हा त्यांचे ॥९॥
मन ते मरतां प्रकाश पडला । ऐक्याच्या रुपाला अनुभविती ॥१०॥
विनायक म्हणे ऐक्य ते पावोनी । शिवालागी ध्यानी अनुभवीती ॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-21T19:09:15.3500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दमामा

  • पु. १ बकमाल ; कडाबीन . २ गडगा ; धमधमा ; मेढा ; ( तोफेसाठी रचलेला ) टप्पा . [ फा . दमामा ] 
  • पु. १ मोठा नगारा ; नौबत . [ फा . दमामा ] 
RANDOM WORD

Did you know?

How I do save the text on my computer?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.