TransLiteral Foundation

शिवरात्र विषय - दाशार्ह कथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


दाशार्ह कथा
प्रथम पूजनोत्तर

प्रथम प्रहरींची पूजा हे घेतली । कृपा थोर केली आम्हांवरी ॥१॥
भजन पूजनांत आम्हां रत केले । चित्त लावविले निजपदी ॥२॥
शिवशिव नाम परम कल्याणाचे । येतांच ते वाचे पाप जळे ॥३॥
धन्य शिवार्चन शिवाचे दर्शन । शिवाचे स्मरण पुण्याईचे ॥४॥
महापातकांचा नाश होत असे । पुनीत होत असे चांडाळही ॥५॥
सहस्त्रवधि पापे जळोनियां जाती । पुण्यात्मे ते होती शिवभक्त ॥६॥
दाशार्हासी आला ऐसा अनुभव । नामाचे वैभव कळले त्या ॥७॥
कलावतीसंगे अंगी दाह झाला । राव घाबरला फ़ार मनी ॥८॥
सांगे कलावती शिवाचा महिमा । गात जावे नामा ऐसे सांगे ॥९॥
गर्गापाशी जात उपदेश घेत । मन्त्रासि जपत नम: शिवाय ॥१०॥
काकरुपे पापे निघाली अंगातूनी । गेली ती जळोनि मंत्रतेजे ॥११॥
विनायक म्हणे तोच नाममन्त्र । मज ठायी गिरित्र सिद्ध करी ॥१२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-21T18:59:31.9770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

differential pulley block

  • भिन्न व्यास कप्पीयंत्र 
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.