स्कंध १२ वा - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


N/A॥७६॥
निवेदिती सूत नर-नारायण । ऐकूनि स्तवन वदते झाले ॥१॥
ब्रह्मनिष्ठा, तव पाहूनि तपासी । संतोषलों चित्ती वर मागें ॥२॥
मार्कंडेय तदा बोले कृपेनेंचि । धन्यता मजसी प्राप्त झाली ॥३॥
आतां वासनेचा लेशही न चित्ती । दुर्लभ देवांही दर्शन हें ॥४॥
परी देवा, माया दाखवा हे इच्छा । तथास्तु ते तया वदतेझाले ॥५॥
पुढती पूजितां गेले ते स्वस्थानीं । निजकर्मी मुनि दंग नित्य ॥६॥
ऐसा कांही काळ लोटतां प्रत्यक्ष । माया मूर्तिमंत पुढती ठाके ॥७॥
वासुदेव म्हणे मायेचें दर्शन । घ्या आतां ऐकून स्वस्थ चित्तें ॥८॥

॥७७॥
पुष्पभद्रातीरीं एका सायंकाळीं । वायु एकाएकीं सुटे बहु ॥१॥
विद्युल्लतेसवें मेघांची गर्जना । पुढती पर्जन्या बल येई ॥२॥
पाहतां पाहतां जलमय सृष्टि । गगन भेदिती, क्षुब्ध सिंधु ॥३॥
बुडूनियां गेली उदकीम त्या पृथ्वी । भयभीत चित्तीं मार्कंडेय ॥४॥
पंचमहाभूतें अंती जलमय । एक मार्कंडेय उरला तेथें ॥५॥
वेडया-पिशासम करी तो भ्रमण । क्षुधेनें तैं प्राण कासावीस ॥६॥
वासुदेव म्हणे मकरादि प्राणि । येताती धांवूनि अंगावरी ॥७॥

॥७८॥
इतस्ततः तया लोटिताती लाटा । अंती व्याकुळता येई बहु ॥१॥
लाटांच्या आघातें बहुवार बुडे । बहु धडपडें तदा मुनि ॥२॥
आवर्ती सांपडे तदा त्या भ्रमण । टाकिती गिळून कदा प्राणि ॥३॥
रुदन, बेशुध्दि कदा येई त्यासी । कदा येई स्फूर्ति, कदा दु:ख ॥४॥
व्याधिग्रस्त कदा मरणोन्मुख होई ॥ वर्षे कोटयावधि ऐसी स्थिति ॥५॥
पुढती पृथ्वीच्या एका उंचभागीं । आढळ्दला त्यासी वटवृक्ष ॥६॥
ईशान्य दिशेच्या शाखेवरी त्याच्या । पाहिलें बालका वटपत्रीं ॥७॥
वासुदेव म्हणे भाग्यकाल येतां । प्रभुदर्शनाचा लाभ घडे ॥८॥

॥७९॥
प्रभा त्या बाळाची फांकली सर्वत्र । तेणें अंधकार नष्ट होई ॥१॥
नीलकर्ण कांति मनोहर मुख । शोभे कंबुकंठ भव्य वक्ष ॥२॥
सुंदर भिंवया श्वासोच्छ्‍वासें केश । हालतां सौंदर्य शोभे बहु ॥३॥
कर्णवलयांची शोभा शंखासम । दाडिम कुसुम कर्णी शोभे ॥४॥
शुभ्र सुधेसम सुहास्य विराजे । आरक्तता साजे अधरोष्ठाची ॥५॥
नूतन कमलकेसरासमान । प्रकाशती जाण नयन बहु ॥६॥
दृष्टीची ते शोभा प्रेमळ प्रसन्न । पिप्पलाचें पर्ण उदर भासे ॥७॥
चलत त्रिवलीनें विचलित नाभि । अंगुलि त्या अति तेजःपुंज ॥८॥
पादांगुष्ठ करीं घेऊनियां मुखीं । घालूनिया चोखी बालक तें ॥९॥
वासुदेव म्हणे ऐसें तें बालक । पाहूनि आश्चर्य मुनीलागीं ॥१०॥

॥८०॥
न्याहाळितां तया क्लेश दूर होती । प्रफुल्लित होती नय्न त्याचे ॥१॥
अंगावरी त्याच्या ठाकले रोमांच । पुसावें बाळास कुशल चिंती ॥२॥
तोंचि श्वासोच्छ्‍वासांसवेंचि क्षणांत । शिर उदरांत मुनि त्याच्या ॥३॥
पूर्वीसम पृथ्वी, ग्राम तैं आश्रम । उदरीं पाहून चकित मुनि ॥४॥
हिमाचलस्थित निजाश्रम पाही । सकल मुनीही पाही तेथें ॥५॥
पाहतां पाहतां उदराबाहेरी । येऊनि सागरीं बुडला पुन्हां ॥६॥
वासुदेव म्हणे अद‍भूत बाळासी । तदा अवलोकी मार्कंडेय ॥७॥

॥८१॥
सुहास्यपूर्वक अमृतकटाक्ष । फेंकी तैं बालक मुनीवरी ॥१॥
डोळे भरूनि त्या पाही मार्कंडेय । भेटायासी धांव पुढती घेई ॥२॥
परी सर्वसाक्षी तदा कमलाक्ष । जाहला अदृश्य तयावेळी ॥३॥
वटवृक्ष, सिंधु, सर्वही अदृश्य । होतांचि मुनीस नवल वाटे ॥४॥
अहो, क्षणार्धात आश्रमांत स्वयें । ध्यानमग्न पाहे आपणासी ॥५॥
वासुदेव म्हणे माया श्रीहरीची । अहो, अतर्क्यचि वर्णवेना ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP