स्कंध २ रा - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४२
राव म्हणे मुने, निर्गुणाचे गुण । नारदें वर्णन केले केंवी ॥१॥
आश्चर्यकारक वर्णन तें करा । ईश्वर भेटला श्रोत्यांप्रति ॥२॥
कल्याणकथा ते ऐकतां आसक्ति । सुटूनि देहासी सार्थकता ॥३॥
शरत्कालीं जेंवी उदकें निर्मल । तेंवी मनोमल श्रवणें जाई ॥४॥
तापतप्त जीव कथामंदिरांत । सदनीं येतां पान्थ तेंवी सुखी ॥५॥
भूतसंबंध न वास्तविक जीवा । देह प्राप्त व्हावा केंवी मग ॥६॥
कमलनाभी तो परी सावयव । वैशिष्टय तें काय इतरांहूनि ॥७॥
वासुदेव म्हणे ब्रह्मदेव तप । कां करी रायास कळेचिना ॥८॥

४३
अवयोद्भुत कथूनि हे लोक । कल्पिलेही तेथ म्हणतां केंवी ॥१॥
दैनंदिन तेंवी शतवर्षात्मक । प्रलयस्वरुप कथन करा ॥२॥
कल्पकाल कथीं, भूतभविष्यादि । शब्द हे कोणासी योजिताती ॥३॥
आयुष्यप्रमाण कथावें सकळ । कालगति स्थूल सूक्ष्म केंवी ॥४॥
किती कोणती ते कर्मगति सांगा । जावें इष्टलोका कवण्या पंथें ॥५॥
पृथ्वी पातालादि प्राणीही तेथींचे । निवेदावें मातें केंवी झाले ॥६॥
अंतर्बाह्य विश्वप्रमाण कथावें । वासुदेव पावे प्रश्नें हर्ष ॥७॥

४४
वर्णा साधूंचीं चरित्रें । वर्णाश्रमांचीं स्वरुपें ॥१॥
युगकाल,युगधर्म । तेंवी कथा मनुज धर्म ॥२॥
धर्म कथावे प्रजेची । तैसेचि त्या नृपाळाचे ॥३॥
धर्मरक्षण संकटीं । केंवी करावे तें कथीं ॥४॥
संख्या गुणही तत्त्वांचें । निवेदावें कार्य त्यांचें ॥५॥
पूजाविधी तेंवी योग । अर्चिरादि कथा मार्ग ॥६॥
सूक्ष्म शरीराचा क्षय । प्रश्न कथी वासुदेव ॥७॥

४५
वेद उपवेद शास्त्रें तैं पुराणें । स्वरुपकथनें निवेदावीं ॥१॥
उत्पत्ति संहार प्रलयही केले । पुरुषार्थ कथा तें सकल कर्म ॥२॥
पुनरुत्पत्ति तैं पाखंडसंभव । मुक्तबद्ध जीव अलिप्तही ॥३॥
क्रीडतो कां ईश, मायेमाजी सांगा । लेप न मायेचा केंवी तया ॥४॥
मुने, ब्रह्मदेवें कथिलें नारदा । व्यासमुखें मरणाची नुरली भीति ॥६॥
ऐकूनि ते प्रश्न शुकांसी आनंद । कथिती भागवत नृपालागीं ॥७॥
वासुदेव म्हणे मायेचें वर्णन । करिती, द्या ध्यान पुढती आतां ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP