मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध २ रा| अध्याय १ ला स्कंध २ रा द्वितीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा स्कंध २ रा - अध्याय १ ला सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध २ रा - अध्याय १ ला Translation - भाषांतर १शुक म्हणे राया, प्रश्न तुझे श्रेष्ठ । जाणें हितप्रद सकल लोकां ॥१॥पंचसूनादोषयुक्त जे अज्ञाने । तयां इष्ट जनीं शास्त्रें बहु ॥२॥पामरांचें ऐशा निद्रा-रतिसौख्यें । अर्धायुष्य जातें सहज व्यर्थ ॥३॥कुटुंबपोषणप्रयत्नांत अर्ध । अवशिष्ट आयुष्य व्यर्थ जाई ॥४॥आप्तस्वकीयांचे मरण प्रत्यक्ष । पाहूनीहि सत्य मानी विश्व ॥५॥शाश्वत श्रीहरी ध्यावा-गावा नित्य । ऐकावा ज्या मोक्षइच्छा तेणें ॥६॥सांख्य योगधर्म निष्ठा जयाप्रति । नारायणस्मृति अंतीं घडे ॥७॥जन्मसाफल्य तें, ज्ञातेही यास्तव । म्हणे वासुदेव हरि गाती ॥८॥२ब्रह्मज्ञानप्रद श्रेष्ठ भागवत । द्वापरयुगांत कथिलें तातें ॥१॥परमभक्त तूं यास्तव कथीन । जेणें हरिप्रेम उपजे मनीं ॥२॥इहपर हेतु येणें पूर्ण होती । ज्ञानी, योगी गाती यास्तव हें ॥३॥अल्पायुष्यभय न धरावें मनीं । मूढाचें या जनीं व्यर्थ वय ॥४॥ज्ञात्यासी घटिकाद्वयही मोक्षद । मूढा सहस्त्राब्द व्यर्थं जाणें ॥५॥दोन घटींमाजी खट्वांग कृतार्थ । सप्ताह आयुष्य असे तुज ॥६॥वासुदेव म्हणे सज्जन उदार । संकटींही धीर देती जनां ॥७॥३मृत्यु पातल्या समीप । प्रथम व्हावें निर्भयचित्त ॥१॥पुत्र-कलत्रादि पाश । पुढती छेदावे समस्त ॥२॥बाधा न व्हावी पुनश्च । म्हणूनि त्यजावें गृहास ॥३॥यमनियमेंसी पुण्य - । तीर्थी, व्हावें भावें स्नान ॥४॥सर्वश्रेष्ठ प्रणवजप । करुनि व्हावें अंतर्मुख ॥५॥व्हावा प्राणांचा संयम । पुढती सगुणाचें ध्यान ॥६॥अचल ध्यान ते धारणा । एकाग्रता तेणें मना ॥७॥वासुदेव म्हणे ऐसी । उपजे भक्ति भगवंताची ॥८॥४राव म्हणे कैसी साधावी धारणा । जिंकावें आसना म्हणती मुनि ॥१॥तेथ प्राणजय साधूनि विजय । इंद्रियांचा होय आवश्यक ॥२॥पुढती करावें स्थूलरुपध्यान । जें विश्व व्यापून उरलें बहु ॥३॥पाद तें पाताल पार्ष्णि रसातल । गुल्फ महातल, सुतल जानु ॥४॥ऊरुद्वय ज्याचें अतल-बितल । जघन महातल, नभ नाभी ॥५॥स्वर्ग वक्षस्थल, ग्रीवा महर्लोक । जनोलोक मुख तयाप्रति ॥६॥तपोलोक तया ईश्वरा ललाट । मस्तकें अनंत सत्यलोक ॥७॥इंद्रादिक हस्त दिशा तेचि कर्ण । श्रोत्र शब्द, घ्राण गंध तया ॥८॥विस्तार याहूनि पहा भागवतीं । यावीण जगतीं नसे कांहीं ॥९॥स्वयेंचि स्वप्नांत बहुरुपी जीव । सकलां अनुभव तैसे यासी ॥१०॥वासुदेव म्हणे ऐशा ईश्वरासी । ध्यातां संसृतीची बाधा टळे ॥११॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP