मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य|

॥ अथ कोकीळामहात्म्य प्रारंभ: ॥

शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.


आषाढ़ महिन्याच्या पौर्णिमेला कोकिला व्रत आरंभ होते आणि श्रावण पौर्णिमेला समाप्त होते. ह्या व्रताच्या कथेवरून एक गोष्ट समजते, शिक्षा फक्त मानवांनाच नाही तर ,देवी-देवतांनाही मिळते.
शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते.
शास्त्रानुसार भगवान शिवचा विवाह दक्ष प्रजापतिची मुलगी सती बरोबर झाला होता. प्रजापति शिवला पसंद करत नव्हता, हे समजत असूनही सतीने शिवबरोबर विवाह केला. यामुळे प्रजापति सतीवर नाराज झाले.
एकदी प्रजापतिने फार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले, ज्यात सर्व देवी-देवतांना बोलावले परंतु शिव आणि सतीला आमंत्रण नाही दिले. सतीच्या मनात पित्याचा यज्ञ बघण्याची इच्छा झाली आणि ती शिवाकडे हट्ट करून यज्ञस्थळी पोहोचली.
त्यावेळी दक्षाने शिव आणि सतीचा फार अपमान केला. सती अपमान सहन नाहीं करू शकली आणि यज्ञ कुण्डात उडी मारून जळून गेली. यानंतर शिवने दक्षचा यज्ञ नष्ट केला आणि हट्ट करून प्रजापतिच्या यज्ञात सामील झाली म्हणून तिला शाप दिला, तिने दहा वर्षापर्यंत कोकिळा बनून नंदनवनात रहायचे.
कोकिळा व्रताच्या विषयात अशी मान्यता आहे कि ह्यामुळे सुयोग्य पतीची प्राप्ति होते. ज्या विवाहित स्त्रियां ह्या व्रताचे पालन करतील, त्यांच्या पतिचे आयुष्य वाढते. घरात वैभव आणी सुखाची भरभराट होते. ह्या व्रतास सौन्दर्य देणारे व्रत म्हणू्नही मानतात कारण ह्या व्रतात जड़ी-बूटि स्नानासाठी वापरण्याचा नियम आहे.
कोकिला व्रत करणार्‍या स्त्रियांना नियम आहे कि पहिले आठ दिवस आंवळ्याचा लेप लावून आंघोळ करावी. त्यानंतर पुढील आठ दिवस औषधी चूर्ण, जटमासी, कच्ची आणि सूकी हळदी, मुरा, शिलाजित, चंदन, वच, चम्पक आणि नागरमोथा पाण्यात मिसळून स्नान करण्याचा नियम आहे.
प्रत्येक दिवशी स्नानानंतर कोकिळेची पूजा करावी आणि शेवटच्या दिवशी कोकिळेला सजवून तिची पूजा करावी. पूजा झाल्यावर ब्राह्मण किंवा सासू सासर्‍यांना कोकिळा दान करावी.

N/A

References : N/A
Last Updated : October 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP