मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कोकिळा माहात्म्य| अध्याय पांचवा श्री कोकिळा माहात्म्य ॥ अथ कोकीळामहात्म्य प्रारंभ: ॥ अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठठाविसावा अध्याय ऐकोणतिसावा अध्याय तिसावा कोकीळामहात्म्य - अध्याय पांचवा शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने, शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते. Tags : kokilamarathipothiकोकिळापोथीमराठी कोकीळामहात्म्य - अध्याय पांचवा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नम: ॥ समकादिक ऋषी म्हणती ॥ अगा सुता महामती ॥ सांगितली ब्रह्मयाची उत्पत्ति ॥ आणि हनन मधुकैटभाचे ॥१॥पुढे दक्ष प्रजापतीचा जन्म कथिला त्वां साचा ॥ श्रिया देवीच्या तपाचा ॥ मह्मा निर्धारें कथियेला ॥२॥पुढें त्रैलोक्याची जननी ॥ आदिमाया जगज्जननी ॥ जन्मली ते लीला श्रवणी ॥ कथा सांग ऐकिली ॥३॥आतां जन्मकर्म दाक्षायणीचें ॥ निरोपावें आम्हा साचें ॥ सुत म्हणे भाग्य तुमचें ॥ अपार फळा आलें मज वाटे ॥४॥ऋषी आले अटयायशी सहस्त्र ॥ पुढें वसिष्ठ परम पवित्र ॥ म्हणती दक्षा भाग्य थोर ॥ फळा आलें आजि तुझ्या ॥५॥कन्या तुझी परम पवित्र ॥ ब्रह्मादि वंदिती सुरवर ॥ महिमा इचा अपार ॥ शेष वर्णू शकेना ॥६॥हे उभयकुळ तारिणी माया ॥ आधार ईचा ब्रह्मांडासिया ॥ ईच्या अवलोक प्राणिया ॥ ज्ञान होईला अपार ॥७॥ रती वर मदन कोटी ॥ ओवाळून टाकावें चरणांगुंष्टी ॥ कल्पांत सुर्य़ नख दृष्टी ॥ ओवाळावे देवीच्य ॥८॥चंद्राचें तेज अद्भुत फार जाण ॥ ओवाळावें मुखावरुनी ॥ दक्षेपूर्वी अपार तप करुन ॥ तेचि फळ हे कळुं आले ॥९॥कन्यादन घडे जरी ॥ कुळ उध्दरे निर्धारी ॥ नारायण आपुले शेजारी ॥ बैसवी कुळासहित ॥१०॥शास्त्रामध्ये ऐसें आहे ॥ प्रथम कन्या व्हावी पाहे ॥ तेणे जन्म सफल होय ॥ तोचि पुरुष दैवाचा ॥११॥प्रथम पुत्र झाला जरी ॥ तरी ते लोभाचे फळ भारी ॥ होतां कन्यारत्न उदरी ॥ सुरगण आनंदती ॥१२॥कैलासनाथ जाश्वनीळ ॥ तोच ईचा भ्रतार अढळ ॥ जयाच्याकृपें ब्रह्मांड सकळ ॥ पालनपोषण होतसे ॥१३॥साधुसंत योगीजन ॥ भजती निशिदिनी इजलागून ॥ हे दक्षराजया कल्याण ॥ झाले तुझें किती वर्णूं ॥१४॥जन्मतांचे जगज्जननी ॥ वृक्ष सदां फळ गेले गगनी ॥ पर्जन्य न मागती अवनी ॥ वरी होय अपार ॥१५॥जनजरार हित झाले तरुण ॥ मृत्यु दरिद्र गेले उडोन ॥ घरोघरी पुराणश्रवण ॥ शिवलीला गीतगाती ॥१६॥धेनु दुभती त्रिकाळ ॥ कामक्रोधा सुटला पळ ॥ मद मत्सा दंभ सकळ ॥ चळचळां कांपती ॥१७॥घरी स्त्रिया आणि पुरुष ॥ अक्षयीं झाले निर्दोष ॥ नामस्मरण रात्रंदिवस ॥ करिती सांब शिवाचें ॥१८॥वल्ली सफळ अवकाळीं ॥ बहुत दाटल्या पुष्पावळी ॥ आदिमाया अवतरली ॥ म्हणुन आनंद जाहला ॥१९॥म्हणुन व्रत नेम यज्ञयाग ॥ करिती पुण्यपुरुषार्थ संतान ॥ कीर्ति ज्याची त्रिभुवनी ॥ व्यापोनियां राहिली ॥२०॥व्रतदान नेम न करिती ॥ त्यासी पुत्रपौत्र पापी होती ॥ मातापितयास दु:ख देती ॥ विटंबिती नानापरी ॥२१॥ऐसा देवीचा जन्मकाळ ॥ वसिष्ठ मुनि वर्णिती सकळ ॥ ऐकती त्यास्सी शिवदयाळ ॥ प्रसन्न होईल निर्धारें ॥२२॥व्रताचा करिती अव्हेर ॥ त्यास वैधव्य निरंतर ॥ अपदा होती अपार ॥ म्हणोनि आदरें व्रत अर्चावें ॥२३॥इतिश्री भविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिला म्हात्म्ये ॥ पंचमोऽध्याय गोडहा ॥२४॥अध्याय पांचवा ॥ ओंवी ॥२४॥॥ श्रीलक्ष्मी नारायणार्पणमस्तु ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥॥ अध्याय पांचवा समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : October 29, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP