मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|आख्यानें| ६७०१ ते ६७१० आख्यानें ६६६४ ते ६६६७ ६६६८ ते ६६८० ६६८१ ते ६६९० ६६९१ ते ६७०० ६७०१ ते ६७१० ६७११ ते ६७२० ६७२१ ते ६७३० ६७३१ ते ६७४० ६७४१ ते ६७५० ६७५१ ते ६७६० ६७६१ ते ६७६७ ६७६८ ते ६७६९ ६७७० ते ६७७८ ६७७९ ते ६७८० ६७८२ ते ६७८७ ६७८८ ते ६७९८ ६७९९ ते ६८१७ ६८१८ ते ६८२९ ६८३० ते ६८६९ ६८७० ते ६९१४ ६९१५ ते ६९२४ ६९२५ ते ६९३० ६९३१ ते ६९३४ बाळक्रीडा - ६७०१ ते ६७१० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत बाळक्रीडा - ६७०१ ते ६७१० Translation - भाषांतर ॥६७०१॥आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनी ॥१॥खेळ मांडियेला यमुनें पाबळीं । या रे चेंडूफळी खेळूं आतां ॥२॥आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनियां वांटी गडिया गडी ॥३॥गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥४॥जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसी उपाव तोचि सांगे ॥५॥सांगे सकळांसी व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥६॥मज हा नलगे आणीक सांगाती । राखावी३ बहुतीं हाक माझी ॥७॥माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेका ॥८॥एका समतुकें अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥चेंडू धरा ऐसें सांगतों सकळां । आपण निराळा एकलाचि ॥१०॥चिंतुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळीक पाहातचि ॥११॥पाहातचि ठेलीं न चलतां कांहीं । येरु लवलाहीं ह्मणे धरा ॥१२॥धरावा तयानें त्याचें बळ ज्यासी । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥विचारीं पडिले देखोनी गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥१५॥मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥यामागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥पंथ जे चुकले आपले मतीचे । तयामागें त्यांचे तेचि हाल ॥१९॥हाल दोघां एक मोहरा मागिलां । चालतां चुकला वाट पंथ ॥२०॥पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥सिकविलें हित नाइके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥नये तेंचि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तोचि खरा ॥२४॥रानभरी झाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥लाज सांडुनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठीच्या ॥२६॥चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें ॥२८॥सोयी धरुनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥सांभाळिलें तुका ह्मणे सकळांहि । सुखी झाले तेही हरिमुखें ॥३०॥॥६७०२॥मुखें सांगे त्यांसी पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥जळांत पाहातां हाडति या दृष्टि । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥४॥वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥५॥कैसें करुनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥डोहो बहु खोल काळ्या भीतर । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥जयाचें कारण तयासीच ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥त्यासी नारायण ह्मणे रहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥वरी जातां हरि पाहाती गोपाळ । ह्मणती सकळ आह्मी नेणों ॥१०॥नेणों ह्मणती हें करितोसी कायी । आह्मां तुझी आई देईल सिव्या ॥११॥आपुलिया कानां ठेवूनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडु तळीं ॥१४॥तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥॥६७०३॥नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥न पुरेसा हात घाली चेंडुकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥२॥सांभाळ करिता सकळां जीवांचा । गोपाळांसी वाचा ह्मणे बरें ॥३॥बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण बर्या बरें ॥४॥बरें म्हणऊनी तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडु तळा ॥५॥तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडत येती घरा ॥६॥येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥पुसती ते मात आप आपल्यासी । हरिदु:खे त्यांसी न बोलवे ॥८॥न बोलवे हरि बुडालासे मुखें । कुटितील दु:खे उर माथे ॥९॥मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दु:ख चित्तीं गोपाळांच्या ॥१०॥॥६७०४॥गोपाळां उभडु नावरे दु:खाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥झालें काय ऐसें न कळे कोणासी । ह्मणती तुह्मांपासीं देव होता ॥२॥देवासवें दु:ख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥आजी दिसे हरि फांकला यांपाशी । ह्मणऊनी ऐशी परी झाली ॥४॥जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शहाणे तयांसी कळों आलें ॥५॥कळों आलें तिहीं फुंद शांत केला । ठायींचाच त्यांला थोडा होता ॥६॥होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥सांगे आतां हरि तुह्मां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥यासी अवकाश नव्हेचि पुसतां । झालिया अनंता कोण परी ॥९॥परी त्या दु:खाची काय सांगो आतां । तुका ह्मणे माता लोकपाळा ॥१०॥॥६७०५॥पाषाण फुटती तें दु:ख देखोनी । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥एकांचिये डोळां असूं बाह्यात्कारीं । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥जळतील एकें अंतर्बाह्यात्कारे । टाकिली लेंकुरें कडियेहूनी ॥४॥निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥वांचणें ते आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरीसवें ॥७॥सवें घेऊनियां चाललीं गोपाळां । अवघींच बाळा नर नारी ॥८॥नर नारी नाहीं मनुष्याचें नांव । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनी जाती ॥१०॥तिरीं माना घालुनियां उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दु:खें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥यांचें त्यांचे दु:ख एक झालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥मायबाप तुका ह्मणे सदोदर । तोंवरीच तीर न पवतां ॥१४॥॥६७०६॥तीर देखोनियां यमुनेचें जळ । काठींच कोल्हाळ करिताती ॥१॥कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासी ओढी भय मागें ॥२॥मागें सरे माय पाउलापाउलीं । आपलेंच घाली धाकें अंग ॥३॥अंग राखोनियां माय खेद करी । अंतरींचें हरी जाणवलें ॥४॥जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥५॥॥६७०७॥भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥अंतरला बहु बोलतां वाउगे । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडतीं तीं ॥५॥तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥मायाबापांची तों ऐसी झाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥७॥॥६७०८॥आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणासाठीं होता ॥१॥होता भाव त्यांचा पाहोनी निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥आधीं पाठीमोरीं झालीं ती सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥दिली हाक त्याणें जाऊनी पाताळा । जागविलें काळा भुजंगासी ॥४॥भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥गर्व हरावया आला नारायण । मिस या करुन चेंडुवाचें ॥६॥चेंडुवाचे मिसें काळ्या नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ॥७॥॥६७०९॥काळ्याचे मागे चेंडू पत्नीपाशीं । तेज:पुंज राशी देखियेला ॥१॥लावण्यपुतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥पाहिला सकळ तिनें न्याहाळूनी । कोण या जननी विसरली ॥४॥विसरु ही तीस कैसा याचा झाला । जीवाहूनी वाला दिसतसे ॥५॥दिसतसे रुप गोजिरें लहान । पाहतां लोचन सुखावले ॥६॥पाहिलें पर्तोनी काळा दुष्टाकडे । मग ह्मणे कुडें झालें आतां ॥७॥आतां हा उठोनी खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥जीव याचा कैसा वांचे ह्मणे नारी । मोहिली अंतरीं हरीरुपें ॥९॥रुपें अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥॥६७१०॥ह्मणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥त्याचें आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन झालें तिचें ॥२॥तिची चित्तवृत्ति होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आह्मांवरी ॥४॥वरी उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥संचारकरुनी कोण्या वाटे आला । ठायींच देखिला अवचिता ॥६॥अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥मोठयानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्याकृतांतधुधुकारें ॥१०॥कारणें ज्या येथें आला नारायण । झालें दरुषण दोघांमध्यें ॥११॥दोघांमध्यें झाले बोल परस्परें प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥चिंतावला चित्तीं तोंडें बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥झाला सावकाश झेंप घाली वरी । तंव हाणे हरि मुष्टिघातें ॥१४॥तेणें काळें त्यासी दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव आला ॥१५॥आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुत नागकुळें ॥१६॥कल्हारीं संधानीं वेष्टियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥यांस तुका ह्मण नाहीं भक्ताविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : May 26, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP