मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८५ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ८५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ८५ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर यस्यांशांशांशभागेन विश्वोत्पत्तिलयोदयः । भवन्ति किल विश्वात्मंस्तं त्वाद्याहं गतिं गता ॥३१॥अगा ये आद्या आदिपुरुषा । ज्याचिया अंशांशाचिया अंशा । विभागें सृजनस्थितिविनाशा । होती अपैशा गौण क्रिया ॥३६॥यस्य म्हणिजे ज्या पुरुषा । माया अंश म्हणिजे साचा । माया अंश तो त्रिगुणांचा । समूह ऐसा जाणावा ॥३७॥तेथ रजोगुणें सृष्टिक्रम । सत्वगुणें स्थितिसंभ्रम । तत्संहारीं प्रबळ तम । हे त्रिविध नेम त्रिगुणांचे ॥३८॥ऐसे ज्यांचे अंशांशभाग । परमाणुरूप जे योगवियोग । सृष्टिस्थितिलयकर्मेंचांग । तो तूं अव्यंग आदिपुरुष ॥३९॥अगा ये विश्वात्मका हरी । सृष्टिस्थितिलयगुणानुकारीं । कर्में होती तुजमाझारी । निश्चयात्मकें तव सत्ता ॥२४०॥किल या निश्चयें ऐसिया तूतें । आज शरण मी आलें निरुतें । जाणोनि अभय वोपीं मातें । मम विनतीतें अवधारीं ॥४१॥चिरान्मृतसुतादाने गुरुणा किल चोदितौ । आनिन्यथुः पितृस्थानाद् गुरवे गुरुदक्षिणाम् ॥३२॥काय विनति म्हणाल जरी । तरी गुरुपुत्र मेला चिरकाळवरी । त्या आणावयाची आज्ञा वैखरी । गुरूनें करितां तुम्हांप्रति ॥४२॥तुम्ही ते आज्ञा वंदूनि माथां । चिरकाळ मेलिया गुरुसुता । यम सदनींहूनि तो त्वरिता । आणिते जालेती आश्चर्यें ॥४३॥गुरुपुत्र आणोनि सवेग तुम्हीं । गुरुदक्षिणेच्या नियमीं । अर्पूनि तोषविला गुरुस्वामी । तैसीच पैं मी प्रार्थितसें ॥४४॥तथा मे कुरुतं कामं युवां योगेश्वरेश्वरौ । भोजराजहतान्पुत्रान्कामये द्रष्टुमाहॄतान् ॥३३॥तैसाच माझा मनोरथ । पूर्ण करावा तुम्हीं त्वरित । भोजराजें वधिले सुत । त्यातें येथ आणावें ॥२४५॥तुम्हीं आणिलिया मृतसुतांतें । देखों इच्छिजे माझेनि चित्तें । माझी प्रार्थना इतुकी तुम्हांतें । स्वसामर्थ्यें पुरवावी ॥४६॥कंसें वधिले आम्हांपूर्वीं । ते आणावे कोठूनि केंवी । ऐसी सहसा न वदा गोवी । तुम्ही गोसावीं ईशांचे ॥४७॥ईश्वरांचे ईश्वर तुम्ही । हें जाणोनि मी हृदयपद्मीं । मृतपुत्रांच्या दर्शनकामीं । उत्सुक जालें आत्मज हो ॥४८॥ऋषिरुवाच - एवं सञ्चोदितौ मात्रा रामः कृष्णश्च भारत । सुतलं संविविशतुर्योगमायामुपाश्रितौ ॥३४॥शुकमुनि म्हणे भारतेश्वरा । ऐसिया प्रकारें उभयकुमरां । प्रेरिती जाली वसुदेवदारा । जाणोनि ईश्वरां निजतनयां ॥४९॥प्रेरिले होत्साते मातेनें । तयेचिया आज्ञावचनें । लंघिते जाले पाताळभुवनें । मनुष्यपणें जे नतले ॥२५०॥रामकृष्ण दोघे जण । योगमाया अवलंबून । ठाकिते जाले बळीचें सदन । सुतळ अभिधान पैं ज्यातें ॥५१॥तस्मिन्प्रविष्टावुपलभ्य दैत्यराड्विश्वात्मदैवं सुतरां तथात्मनः । तद्दर्शनाह्लादपरिप्लुताशयः सद्यः समुत्थाय ननाम सान्वयः ॥३५॥अकस्मात ते सुतळभुवनीं । प्रविष्ट जाले बंधु दोनी । अवचित त्यांतें देखोनि नयनीं । दैत्येन्द्र मनीं हरिखेला ॥५२॥आत्मत्वें जे विश्वदैवत । बरव्या प्रकारें स्वभुवनीं प्राप्त । तैसेचि आपुलें अंतरगत । उपास्यदैवत जाणोनि ॥५३॥तयांच्या दर्शनाल्हादें करून । आनंदप्रचुरित अंतःकरण । तत्काळ उठिला आसनींहून । परिवारजन सह अवधा ॥५४॥चरणांवरी ठेवूनि शिर । निवान्त पडिला दंडाकार । तैसाचि परिवारजन समग्र । करिती सादर दंडवतें ॥२५५॥दंडवता नंतर पाहीं । आळंगिती दोहीं बाहीं । दिव्यासनीं त्या लवलाहीं । प्रेमप्रवाहीं बैसविलें ॥५६॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP