मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८५ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ८५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ८५ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर यदृच्छया नृतां प्राप्य सुकल्पामिह दुर्लभाम् । स्वार्थे प्रमत्तस्य वयो गतं त्वन्माययेशर ॥१६॥जैं शुभाशुभकर्मा समता । तैं नरदेह लाहे तत्वता । येर्हवीं चौर्यांयशी लक्ष भ्रमतां । विवेकार्हता दुर्लभ पैं ॥१४५॥विवेकोदया नरदेह मात्र । अपरा योनि कर्मतंत्र । होती कर्मफळाचें पात्र । प्रारब्धसूत्रपतनान्त ॥४६॥ऐसा दुर्लभ मनुष्यदेह । लाधल्या वयं वेंचे अहरह । मूढ रुग्ण कां व्यंग होय । तरी मग काय लाभोनी ॥४७॥तेथ ही दैवें अवयवपटुता । इंद्रियपाटव अनामयता । असोनिही नर न करी स्वहिता । हे तत्वता तव माया ॥४८॥दुर्लभ ऐसा नरदेह प्राप्त । विषयीं भुलोनी न करी स्वहित । तयाची वयसा गेली व्यर्थ । तव मायेनें भुलविलिया ॥४९॥भो ईश्वरा तुझी माया । कैसी समर्थ भुलवावया । जाणत जाण नेणतिया । माजि बुडवी भवभ्रान्ति ॥१५०॥म्हणसी आश्चर्य येवढें काय । जाणोनि प्रमत्त कोणा न्यायें । तरी बहुधा पाशीं तां बांधिलों आहें । यास्तव न लाहें उमजातें ॥५१॥कैसे कोणते पाश म्हणसी । अल्प कथितों ते तुजपासीं । जगज्जगदात्मा तूंचि होसी । परि नेणसी बद्धातें ॥५२॥असावहं ममैवैते देहे चास्याध्वयादिषु । स्नेहपाशैर्निबघ्नानि भवान्सर्वमिदं जगत् ॥१७॥हा देह मी ऐसी देहीं । तादात्म्याहंता स्फुरे पाहीं । देहाचिये अन्वयविषयीं । ममता स्फुरे स्नेहभरें ॥५३॥मी देह म्हणोनी अहंता वेठे । तदभिमानें बांधला खुंटें । तेथ लागलीं जियें चर्हाटें । श्रवणपुटें तीं ऐका ॥५४॥मी कुळशीळवंत सुकृती । अपर अकुळी दुःशीळदुष्कृती । इत्यादि विद्या वयसा जाती । देहाहंमती दृढावी ॥१५५॥ऐसा देहीं निबद्ध होय । मग सुखदुःखाचे सोसी घाय । ममतास्नेहपाशांची सोय । कैसी काय ते कथितों ॥५६॥माझी वृत्ति माझी भूमी । दास दासी माझिये धामीं । कन्यापुत्र कलत्र नामीं । स्नेहपाशें हे जाणावे ॥५७॥माझे आप्तस्वजनसुहृद । माझे हय गज रथ गोवृंद । स्वार्थ रोधूनि देती खेद । शत्रु विशद ते माझे ॥५८॥ब्रह्माहमस्मि अद्वयबोध । देहतादात्म्य अहंममभेद । पाश होवोनी वोपी खेद । अनेकविध भासोनी ॥५९॥मी माझें हा भेद मुळींचा । तूं तुझें हा पर्याय त्याचा । हा याचें हें म्हणतां वाचा । होय भेदाचा विरतार ॥१६०॥तेणें गालिप्रदान केलें । प्रतिकारीं म्यां फडसाविलें । तें बीज कलहरूपें फळलें । भोगणें पडलें चीथूचें ॥६१॥स्नेह स्नेहें द्वेषें द्वेष । सुहृदीं आप्तीं तोष रोष । ऐसे बांधिती भवभ्रमपाश । चित्सुखास विसरविती ॥६२॥ऐसिया परि अवघें जग । पाशनिबद्ध गुंतलें साङ्ग । येर्हवीं जगदात्मा तूं अभंग । नित्य निःसंग भगवान् ॥६३॥जरी तूं आश्चर्यें म्हणसी हरी । तव पुत्र आम्ही राममुरारी । ईश्वरत्व आमुचे शिरीं । कवणे परी आरोपिसी ॥६४॥तरी तूं ऐकें इये विशीं । स्वमुखें वदलासि आम्हांपासीं । तैं तव वाणीच तुजपासीं । निःश्चयेसीं मी कथितों ॥१६५॥युवां न नः सुतौ साक्षात्प्रधानपुरुशेश्वरी । भूभारक्षत्रक्षपण अवतीर्णौ तथात्थ ह ॥१८॥तुम्ही आमुचे पुत्र नोहां । ऐसा प्रत्यय माझिया जीवा । साक्षात्प्रधानपुरुषां देवां । पासूनि श्रेष्ठ ईश्वरेश्वर ॥६६॥येथ मानुषी अवगणी । धरूनि क्रीडतां माझिये सदनीं । जें भूभारक्षत्रियांच्या क्षपणीं । धर्मस्थापनीं अवतरला ॥६७॥म्हणसी तुज हें कोठोनि कळलें । तरी हें तुवांचि साकल्य कथिलें । तेंही जाईल निरूपिलें । प्रस्तुत प्रार्थिलें तें ऐका ॥६८॥तत्ते गतोऽस्म्यरणमद्य पदारविन्दमापन्नसंसृतिभयापहमार्त्तबंन्धो ।एतावतालमलमिद्रियलालसेन मर्त्यात्मदृक्त्वयि परे यदपत्यबुद्धिः ॥१९॥तुम्ही नव्हतां पैं माझे कुमर । प्रधानपुरुष ईश्वर । उतरावया धराभार । क्षत्रिय अघोर मारूनियां ॥६९॥अवतरलेति माझिये सदनीं । म्हणोनि शरण मी तुमच्या चरणीं । बिरुदावळी वेद वाखाणी । तें ऐकोनि श्रवणीं दृढ जालों ॥१७०॥चरणां शरण जे जे आले । ते संसृतिभया वेगळे केले । यास्तव म्यांही दृढतर धरिले । निजार्तिहरणा लागूनी ॥७१॥दुःखितांचें दुःखनिरसन । करिसी म्हणोनि तुजलागून । आर्तबंधु हें संबोधन । शुक भगवान स्वयें वदला ॥७२॥यदर्थीं म्हणसी जरी भगवंता । मी दुःखिताचा दुःखहर्ता । परी तुजलागीं तों दुःखवार्ता । नसतां वृथा कां शिणसी ॥७३॥तरी ऐकें गा चक्रपाणी । इंद्रियलाम्पट्यें करूनी । मनुष्यदेह आत्मपणीं । स्पष्ट मानूनी चेष्टतसें ॥७४॥आणि तूं परात्पर ईश्वरेश्वर । हें गुह्य बोलिलासी साचार । त्या तुझ्या ठायीं आत्मकुमर । मानूनि अपत्यबुद्धि मज ॥१७५॥तुम्हां ईश्वरेश्वरां प्रती । अपत्य मानी माझी मती । यावरी पुरे आतां श्रीपती । इतुकें प्रार्थीं मी तुजला ॥७६॥पाञ्चभौतिकीं आत्मबुद्धी । सुतधनकलत्र आत्मीयधी । अपत्यमति ईश्वरावधी । इंद्रियलंपटें म्यां केली ॥७७॥ते येथूनि पुरे आतां । इतुकें प्रार्थितसें अनंता । तुझ्या उपदेशें तत्वता । तुझी ईश्वरता मज कळली ॥७८॥जरी तूं म्हणसी श्रीमुरारी । कैं तुज वदली मम वैखरी । माझें ऐश्वर्य कवणे परी । तुज अंतरीं अवगमलें ॥७९॥यदर्थीं ऐकें जगत्पती । सुतीगृहीं निज संभृती । दावूनि बोधिली माझी मती । तें मम चित्तीं स्मरत असे ॥१८०॥सूतीगृहे ननु जगाद भवानजो नौ सञ्जज्ञ इत्यनुयुगं निजधर्मगुप्त्यै । नानातनूर्गगनवद्विदधज्जहासि को वेद भूम्न उरुगाय निभूविमायाम् ॥२०॥पूर्वीं सूतीगृहाच्या ठायीं । प्रतियुगीं मी होतसें देही । धर्मरक्षणालागीं पाहीं । ऐसी नवाई वदलासी ॥८१॥मी निःसंग जन्मरहित । तुमच्या ठायीं प्रतियुगीं मूर्त । अवतरलों हे वदलासि मात । तैं कैं असत्य हों शके ॥८२॥आमुच्याचि ठायीं युगीं युगीं कैसा । म्हणसी तरी तूंचि परेशा । स्वयें वदलासी जगदीशा । ते परिभाषा अवधारीं ॥८३॥अनुयुगं म्हणिजे युगयुगाप्रती । तुम्ही सप्रेम दंपती । सुतपानाम तूं प्रजापती । पृश्नि निश्चित देवकी हे ॥८४॥तैं मी पृश्निगर्भनामा । तुमच्या ठायीं लाहोनि जन्मा । निजजनकत्व दिधलें तुम्हां । स्वयें अजन्मा होत्साता ॥१८५॥त्यानंतरे कश्यप अदिती । तुम्हींच दोघें पूर्वदंपती । तुमच्या ठायीं वामनमूर्ती । मी श्रीपती स्वयें जालों ॥८६॥आतां तियेंच दंपती तुम्ही । वसुदेवदेवकी ऐसिया नामीं । मी हाइ जगत्कल्याणकामी । तुमच्या सद्मीं अवतरलों ॥८७॥ऐसें वदलासि सूतिकालयीं । तें स्मरतसे माझ्या हृदयें । झणें तूं म्हणसी तो शेषशायी । होतसे देही चतुर्भुज ॥८८॥तरी हा निश्चय नाहीं हरी । तूं निःसंग गगनापरी । सुरकायार्थ नानापरी । बहुधा शरीरीं नट धरिसी ॥८९॥नभ निःसंग जेंवि निर्लेप । घट मठ नटनाट्यें अमूप । धरूनि सांडी निर्विकल्प । तव तनुजल्प तैसाची ॥१९०॥भूमन् म्हणिजे सर्वगत । उरुगाय अमळशय विस्तृत । दोंहीं संबोधनीं अनंत । वसुदेव तेथ संबोधी ॥९१॥अमळकीर्ति जनार्दना । भो भगवंता अपरिच्छिन्ना । मायाविभूतिरूपें नाना । तुझीं हीं कोणा जाणवती ॥९२॥शुक म्हणे गा परीक्षिति । स्वयें वासुदेव वृष्णिपति । बोलिला तें जगत्पति । परिसोनि वदला तें ऐक ॥९३॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP