मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८४ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ८४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७१ अध्याय ८४ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर सन्निकर्षोऽत्र मर्त्यानामनादरणकारणम् । गाङ्गं हित्वा यथान्यांभस्तत्रत्यो याति शुद्धये ॥३१॥अत्यंत सहवासाचे सलगी । ते प्रीति मर्यादा आदरभंगी । याचा अनुभव सर्वां आंगीं । नव्हे सांगी सांगणीची ॥२००॥गंगातीरीं वसती प्राणी । ते गंगेतें सांडूनी । प्रवर्तती तीर्थाटनीं । दोषक्षालनीं उद्युक्त ॥१॥उदरीं वाहिलें नवमास । प्रसूत्यादि साहिले क्लेश । सलगी सांडूनि ते मातेस । सासुश्वशुरांस अभ्यर्ची ॥२॥स्वप्रकाशें मंडित किरणीं । अहरह गगनीं प्रकटे तरणी । नैरंतर्यें न भजे कोण्ही । सादर ग्रहणीं जन होती ॥३॥पायसपयाज्यशर्करामुक्ति । तेथ बाहुल्ये ये विरक्ति । कट्वम्लरामठक्षारतिक्तीं । सादर होती कीं ना हो ॥४॥एवं सन्निकर्षसलगीगुणें । प्रेममर्यादामहत्त्व उणें । यास्तव कृष्ण मानूनि अर्भकपणें । प्रश्न करणें या योग्य ॥२०५॥वसुदेव अविद्याभ्रमेंकरूनी । कृष्णीं निजार्भकत्व मानी । कृष्णमहिमा ही जाणोनी । सलगी करूनि अनादरता ॥६॥कृष्ण दिसतां मनुजाकृति । मनुजा ऐसा न घेपे भ्रान्ति । अगाध कृष्णाची अनुभूति । न नसे कल्पातीं तें ऐका ॥७॥यस्यानुभूतिः कालेन लयोत्पत्त्यादिनास्य वै । स्वतोऽन्यस्माच्च गुणतो न कुतश्चन रिष्यति ॥३२॥ज्याची अनुभूति न नाशे कदा । ऐका तयाही अनुवादा । गजत्सजनावनान्त धंदा । होतां अबोधामाजि न लपे ॥८॥येर प्राकृत सकळ प्राणी । जननस्थितिलय करितां गुणीं । अनुभव लोपे क्षणक्षणीं । घडमोदणीमाजिवडा ॥९॥पूर्व देह पावे लय । तेव्हां हारपे तत्प्रत्यय । नूतन तनु प्राप्त होय । तैं धरी सोय तस्मरणीं ॥२१०॥तैसी न नशे हरि अनुभूति । अवतरतांही सुरकार्यार्थीं । स्फुरदूप जे स्वसंवित्ति । ते कल्पान्तीं न पालटे ॥११॥अथवा उर्वारुकापरी । अपक्कीं तैक्त्य पक्कीं माधुरी । अनुभूतीचा लोप करी । काळान्तरीं न तेंवि हें ॥१२॥किंवा आपेंआप जैसी । विद्युल्लता स्फुरणासरिसी । गगनीं लोपे हरिस्मृति तैसी । आपेंआपही न लोपे ॥१३॥अथवा आणिकाही व्याघातें । न पवे अनुभूति लोपातें । घटप्रतीति मुद्गरघातें । पावे भंगातें ज्यापरी ॥१४॥अथवा न नशे गुणेंकरून । तेंही ऐका उदाहरण । रूपान्तरोत्पत्ति करून । पालटी गुण पूर्वरूपा ॥२१५॥निद्रालस्यप्रसादजडता । तमोगुणीं वर्ते वस्तुता । रजोगुणें त्या पालट होतां । तृष्णाप्रलोभकार्मठ्य ॥१६॥तैशी कृष्णाची अनुभूति । अचिन्त्यैश्वर्यगुणसंपत्ति । गुणीं न नशे तेही रीती । यथानिगुती निरूपिली ॥१७॥कोणा एक्या योगेंकरून । अनुभव व्याहत न होय जाण । सदृष्टांत हें व्याख्यान । शुकभगवान निरूपिती ॥१८॥तं क्लेशकर्मपरिपाकगुणप्रवाहैरव्याहतानुभवमीश्वरमद्वितीयम् ।प्राणादिभिः स्वविभवैरुपगूढमन्यो मन्येत सूर्यमिव मेघहिमोपरागैः ॥३३॥क्लेशकर्म आणि परिपाक । कीं सत्वजस्तमोगुणात्मक । इत्यादि प्रवाह अनेक । ज्याचा अनुभव न रोधिती ॥१९॥ऐसिया अव्याहतानुभवातें । अद्वितीय ईश्वर जाणोनि पुरतें । आपुल्या विभवीं छादित निरुतें । अन्य प्राकृत जन मानी ॥२२०॥क्लेशकर्मपरिपाकगुण । अनुभग न नशे इहींकरून । ऐका तयाचें लक्षण । ब्रह्मनंदन म्हणे मुनींतें ॥२१॥क्लेश म्हणिजे रागादिक । प्रियतम मानूनि इहामुष्मिक । वास्तव विसरणें निष्टंक । न शिवे कलंक हा कृष्णा ॥२२॥इहामुष्मिक उभय स्थळीं । प्रियतम मानूनि हृदयकमळीं । कृष्ण कोणता विषय कवळी । स्वबोधशाळी परिपूर्ण ॥२३॥गा त्या विषयाच्या अनुरागें । सकामकर्में करी आंगें । तत्फळप्राप्तीच्या प्रसंगें । अनुभव भंगे कृष्णाचा ॥२४॥तरी तो सनातन सर्वगत । इहामुष्मिकी यातायात । स्वबोध विसरूनि मानी नथ्य । हें तरी तेथ घडूं शके ॥२२५॥विषयानुरागमात्र मळ । अनुभव व्याहत करी केवळ । तो असतां मग कर्म सकळ । करी प्रबळ फळलोभें ॥२६॥मग त्या कर्माचरणकाळीं । जीवत्व अहंता झांकोळी । अनुभव व्याहत तये वेळीं । होय समुळीं वास्तव जो ॥२७॥वास्तव अनुभव व्याहत होतां । आपणा भावी परिपाकभोक्ता । परिपाक म्हणिजे कर्माचरिता । माजि सुखदुःख जें निपजे ॥२८॥सुकृत परिपक्क तेंचि सुख । मानी तद्भोगीं संतोख । वास्तव अनुभूति पावे लुक । स्वबोधच्छादक हें पटळ ॥२९॥विषयानुराग नाहींच कृष्णा । यालागीं स्वानुभव न झांकी तृष्णा । तदर्थ कर्में न करी नाना । कार्मठ्यपणा माजि नये ॥२३०॥कृष्ण नोहे सुखदुःखभोक्ता । न पवे निजानुभवव्याघात । विडंबानुसार अनुकार करितां । व्याहतप्रत्यय नोहे कीं ॥३१॥कृष्ण जन्मला वसुदेवसदनीं । ऐशीच प्रथा सर्व जनीं । परी तो स्पर्शला नाहीं योनी । हें न ठावें मनीं वसुदेवा ॥३२॥ज्यासी जन्मचि नाहीं साच । त्याचें कर्मही मग आहाच । सुखदुःखभोक्तृत्वें नडनाच । कैंचा वाच्य ते ठायीं ॥३३॥ऐसा अमळ कालत्रयीं । तबोध व्याहत एतत्त्रितयीं । नोहे ऐसा तुमच्या ठायीं । प्रत्यय बाणे कीं ना हों ॥३४॥नातरी प्रकाश प्रवृत्ति मोह । हे जे गुणत्रयप्रवाह । मायामय जो कृष्णदेह । वसवूनी प्रत्यय लोपविती ॥२३५॥वस्तुता कृष्णासी देहचि नाहीं । तेथ गुणप्रवाह कवणे ठायीं । प्रकटूनि व्याहत करील पाहीं वस्तव अनुभव कृष्णाचा ॥३६॥ऐसियातें अन्य जन । आपुले आंगींचे इत्यादि गुण । तिहीं छादित मानी जाण । सूर्यासमान तें ऐका ॥३७॥आपुल्या दृष्टीचिया कवळें । चंद्रा आंगींचें तेज पिवळें । मूर्ख मानी परंतु न कळे । आपुले डोळे मलिन हें ॥३८॥कीं आपुली दृष्टि मेघपटळीं । लोपवितां लोपला मानी हेळी । आपुलें विभव तन्मंडळीं । प्राकृतें आंधळीं आरोपिती ॥३९॥कीं शारदीं सजळनीहारधुई । निबिड दाटे जिये ठायीं । ते जन म्हणती सूर्यचि नाहीं । प्रकट असतांहीं न देखती ॥२४०॥कीं राहुमंडळा आणि सूर्या । द्वादश योजनें अंतर तया । असतां नेत्रीं प्राकृतांचिया । ग्रहणीं ग्रासिला साच गमे ॥४१॥ऐसा अन्य प्राकृत जन । प्राणज्ञानक्रियाकारण । समुच्चयें छादितप्रत्यय जाण । आपणासमान हरि भावी ॥४२॥ पंजरनिबद्ध जैसा पक्षी । पंजरच्छिद्रान्तरेंचि लक्षी । तैसा नव्हे जो अंतरिक्षीं । स्वानुभवपक्षीं उडणारा ॥४३॥पंजरनिबद्ध आपुले मनीं । आपणासमान त्याही मानी । आपण बद्ध तो चिद्गगनीं । विलसे म्हणोनी त्या न कळे ॥४४॥तैसा कृष्ण आपुले उदरीं । जन्मला मानूनि अनादरी । आम्हांलागीं प्रश्न करी । यथाधिकारीं हें उचित ॥२४५॥ऐसी नारदोक्ति ऐकून । त्यानंतरें ते मुनिजन । आनकदुंदुभिप्रति वचन । ऐकें राया वदले तें ॥४६॥अथोचुर्मुनयो राजन्नाभाष्यानकदुंदुभिम् । सर्वेषां श्रृण्वतां राज्ञां ततहिवाच्युतरामयोः ॥३४॥ऐकत असतां सर्व राजे । तेथ उपविष्ट होते जे जे । आणि रामाच्युतही सहजें । श्रवण करीत असतां पैं ॥४७॥वसुदेवाप्रति म्हणती मुनी । कर्मनिरास कर्में करूनी । पुशिला तरी तो ऐकें श्रवणीं । जो प्राचीन कविजनीं निरूपिला ॥४८॥कर्मणा कर्मनिर्हार एष साधुनिरूपितः । यच्छ्रद्धया यजेद्विष्णुं सर्वयज्ञेश्वरं मखैः ॥३५॥कर्में करूनि कर्म सुटणें । ऐसा प्रकार उत्तमपणें । कथिजेल तो श्रवण करणें । सावधपणें वसुदेवा ॥४९॥पूर्णश्रद्धें करून विष्णु । यजिजे होऊनि वितृष्णु । यज्ञसमुच्चयें करून । कर्ममोचन तत्कर्में ॥२५०॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP