मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८४ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ८४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७१ अध्याय ८४ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर मुनय ऊचुः - यन्मायया तत्त्वविदुत्तमा वयं विमोहिता विश्वसृजामधीश्वराः । यदीशितव्यायति गूढ ईहया अहो विचित्रं भगवद्विचेष्टितम् ॥१६॥भगवंताचें दुरन्वय वचन । ऐकूनि तूष्णींभूत मुनिजन । जाले तयाचेंचि विवरण । करिती येथून दों श्लोकीं ॥८४॥तत्त्ववेत्तयांमाजि परम । श्रेष्ठही आम्ही उत्तमोत्तम । जयाचे मायेचा संभ्रम । योगें भवभ्रम अवलोकूं ॥८५॥विश्वस्रष्टे जे अधीश्वर । जिनें मोहिले थोर थोर । ऐसी जयाची माया दुस्तर । तो परमेश्वर श्रीकृष्ण ॥८६॥ज्या कारणास्तव तो श्रीहरि । स्वयें होऊनि नरशरीरी । जनीश्वरांचिये परी । चेष्टे संसारीं नररूपें ॥८७॥लेऊनि मानुषी अवगणी । जरी वर्ते मनुष्यपणीं । तर्ही ऐश्वर्यउभारणी । न झांके गुणीं लोपवितां ॥८८॥जरी तूं म्हणसी श्रीभगवंता । स्वयें ईश्वर मी जरी असतां । तरी कां घेतों अनीश्वरता । ऐक तत्वतां यदर्थीं ॥८९॥अहो या आश्चर्येकरून । म्हणती तुझें विचित्राचरण । यालागीं आम्हां अतर्क्य पूर्ण । तें अतर्क्यपण अवधारीं ॥९०॥अनीह एतद्वहुधैक आत्मना सृजत्यवत्यत्ति न बध्यते यथा । भौमैर्हि भूमिर्बहुनामरूपिणी अहो विभूम्नश्चरितं विडम्बनम् ॥१७॥तुझी षड्गुणैश्वर्यता । तें तूं अवधारीं भगवंता । ईहारहित अनीह असतां । ईहा समस्ता प्रकाशिसी ॥९१॥केवळ अक्रिय रूपेंकरून । करिसी सृजनावनाशन । बहुधा नसोनि होसी पूर्ण । नपवसी बंधन तद्योगें ॥९२॥एक भूमि अनेक भौतिकें । विस्तारूनि घटमठादिकें । बद्ध नोहे तदात्मकें । मृद्विवेकें अविकारी ॥९३॥घटमठादि वाचारंभण । तेथ मृत्तिकाचि सत्य जाण । ऐसें जें कां श्रुतीचें वचन । सन्मात्रपूर्ण तेंवि तूं ॥९३॥जरी म्हणसी मी वसुदेवपुत्र । केंवि मी स्थितिलयसृजना पात्र । यांचे कर्ते गुण स्वतंत्र । मी परतंत्र तनुधारी ॥९५॥ऐसें न म्हणें भो जगदीशा । धर्मसंस्थापक हा मानवी ठसा । घेऊनि वर्तसी मनुजांसरिसा । हेंचि परेशा आश्चर्य ॥९६॥विभूम्न म्हणिजे तूं परिपूर्ण । तुज जन्मादि मनुजाचरण । अवगणीचें विडंबन । केवळ अनुकरणमात्रची ॥९७॥तेंही अनुकरण किमर्थ म्हणसी । लक्षून लोकसंग्रहासी । धर्मसेतु प्रतिपादिसी । ऐक तेविषीं निवेदितों ॥९८॥अथापि काले स्वजनाभिगुप्तये बिभर्षि सत्त्वं खलनिग्रहाय च । स्वलीलया वेदपथं सनातनं वर्णाश्रमात्मा पुरुषः परोभवान् ॥१८॥लोकसंग्रहाचिकारणें । अनेक अवतार तुवां धरणें । तयाचीं साकल्यें निरूपणें । कोण्हा वदनें निरूपवती ॥९९॥यावरीही प्रस्तुतकाळीं । स्वजनगोपनार्थ भो वनमाळी । शुद्धसत्वात्मक सांवळी । मानुषी मूर्ति हे धरिसी ॥१००॥स्वलीला म्हणिजे क्रीडाचरणें । वेदमार्गातें प्रतिपादणें । स्वयें वर्तोनि प्रवृत्ति करणें । जनसंग्रहार्थ धर्मपथीं ॥१॥धर्मपथाचे उच्छेदक । उत्पथपाखण्डप्रतिपादक । ते खळनिग्रहार्थ सम्यक । शुद्धसत्वात्मक तनु धरिसी ॥२॥येर्हवीं प्रकृतीहूनि तूं पर । उत्तम पुरुष जो अक्षर । वर्णाश्रमात्मक शरीर । धरिसी साचार स्वलीला ॥३॥वर्णश्रमप्रतिपादना । अनाद्धर्मसेतुसंस्थापना । करावयालागीं ब्राह्मणां । बहुसम्मानें वाढविसी ॥४॥यालागीं तूं ब्रह्मण्यदेव । वेदवैदिकऋतुसमुदाव । याचें वाढविसी महत्त्व । सहेतु वास्तव तें ऐक ॥१०५॥ब्रह्म ते हृदयं शुक्लं तपः स्वाध्याय संयमै । यत्रोपलब्धं सद्व्यक्तमव्यक्तं च ततः परम् ॥१९॥आदिब्रह्म तें तूं मुख्य । जें सन्मात्र शुद्ध सम्यक । निर्गुण निराकार निष्टंक । अखंडैक अद्वितीय ॥६॥स्वगतप्रधानावलंबें तेंची । शुद्धसत्वात्मक पूर्णत्वाची । प्रणवरूप आदिबीजाची । आस्तिक्यता प्रकाशी ॥७॥प्रणवरूप तें व्यक्ताव्यक्त । कार्यकारणरूपें स्थित । कार्य म्हणिजे क्रियायुक्त । बीज अव्यक्त कारण तें ॥८॥त्यामाजि अव्यक्त बीजकारण । जें वेदाख्य अमल शुक्लवर्ण । तेंचि तुझें हृदय पूर्ण । अंतरंग निजरूप ॥९॥तयापासूनि मग जें व्यक्त । कर्मकलाप वेदोदित । तें तत्कार्य क्रियासहित । वर्त्ते संतत तव रूप ॥११०॥क्रियाकलाप म्हणसी कोण । तरी तो त्रिविध कायवाङ्मन । तपःस्वाध्याय संयम पूर्ण । प्राप्तिसाधन उत्तरोत्तर ॥११॥कायिक कर्म त्या नाम तप । वाङ्मय वेदपठनादि जल्प । ईश्वरप्रीत्यर्थ निष्कामकल्प । विगतसंकल्प संयम तो ॥१२॥पूर्वमीमांसापरिशीलन । निष्काम तदुदित कर्माचरण । नित्यनैमित्तिक अनुष्ठान । काम्यनिषिद्धपरित्यागें ॥१३॥येणें होय चित्तशुद्धी । ब्रह्माजिज्ञासा आकळे बुद्धी । उत्तरमीमांसा सद्गुरु बोधी । तैं उपलब्धी अव्यक्ता ॥१४॥तदुत्तर संयम क्रमें । मनोजय साधितां नियमें । शुद्धसन्मात्र वृत्तिविरामें । हेमीं हेमें जेंवि मिळिजे ॥११५॥तस्मात् वेद हृदय तुझें अमळ । यास्तव पूजिसी ब्राह्मणकुळ । हें आश्चर्य नव्हे केवळ । ऐक विवळ तें आतां ॥१६॥तस्माद्ब्रह्मकुलं ब्रह्मन् शास्त्रयोनेस्त्वमात्मनः । सभाजयसि सद्धाम तद्ब्रह्मण्याग्रणी भवान् ॥२०॥ब्रह्मन् ऐसें संबोधन । सन्मात्रब्रह्म तूं जनार्दन । वेद ब्रह्महृदयवान् । क्रियासंपन्न व्यक्तत्वें ॥१७॥वेद ब्रह्महृदय अमळ । तत्प्रवर्तक ब्राह्मणकुळ । शास्त्रयोनी जो तूं केवळ । निगमपाळ निगमात्मा ॥१८॥ऐसिया तुझें प्राप्तिस्थान । वेद मूर्तिमंत ब्राह्मण । त्यांचा वाढविसी सम्मान । तस्मात् ब्रह्मण्यवर्य तूं ॥१९॥वेदांचें जें वसतिस्थान । यालागीं सद्धाम त्या अभिधान । ब्रह्मनिष्ठाग्रणी तूं पूर्ण । ब्रह्मण्य म्हणोनि द्विज यजिसी ॥१२०॥अनन्यरूपा आपुलिया । भजतां भेद गेला विलया । ब्रह्मण्यबोधें तुज सन्मया । माजि मिळणें उपलब्धि ते ॥२१॥तस्मात् ईश्वर तूं केवळ । जनसंग्रहार्थ स्वधर्मशीळ । आम्ही तुजसीं पावलों मेळ । कृतार्थ केवळ तद्योगें ॥२२॥आज तुझेनि सन्निधिमात्रें । पावन झालों वाङ्मनोगात्रें । तें संक्षेपें कथितों वक्त्रें । विश्वश्रोत्रें परिसावें ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP