मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८४ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ८४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७१ अध्याय ८४ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर तान्दृष्ट्वा सहस्रोत्थाय प्रागासीन नृपाडशः ।पाण्डवाः कृष्णरामौ च प्रणेम्र्विश्चवन्दितान् ॥६॥येता देखोनि त्या मुनीतें । नृपति बैसले तेथ जे होते । पाण्डवरामकृष्णादि अवघे ते । उभे ठाकले झडझडां ॥२०॥त्रिजगद्वंघ्र जे कां मुनि । त्यांतें देखूनि नमिती मूध्नि । पूजिते जाले सत्कारूनी । चक्रपाणि जेंवि अर्ची ॥२१॥रामकृष्ण अर्चिती जैसे । समास्त नृपही तयांचि सरिसे । पूजिते जाले सप्रेमरसे । शुद्धमानसें मुनिवर्यां ॥२२॥तानावर्च्युर्यवा सर्वे सहरामोऽच्युतोऽर्चयत् । स्वागतासनपाद्यार्घ्यमाल्यभूषानुलेपनैः ॥७॥ श्रेष्ठासनीं बैसवोनि सर्वां । स्वागतप्रश्न करिती बरवा । पादार्घ्याचमनादिगौरवा । पूजिते जाले यथाविधि ॥२३॥मलजगंधें अनुलेपनें । कर्स्तूती केशर सुगंध सुमनें । दियाभरणें अमूल्यवसनें । तपोधनांतें समर्पिली ॥२४॥धूपदीपदिव्योपहार । फलताम्बूल चामीकर । विविध रत्नें सर्वोपचार । पुष्पाञ्जळि निराजलें ॥२५॥ऐसे मुनिवर पूजिल्यावरी । विश्रान्ति पावले अभ्यंतरीं । सुखे बैसले त्यांप्रति हरी । वदे वैखरी तें ऐका ॥२६॥उवाच सुखमासीनान्भगवान्धर्मगुप्तनुः । सदसस्तस्य महतो यतवाचोऽनुशृण्वतः ॥८॥धर्मरक्षक ज्याची तनु । त्यालागीं म्हणिजे धर्मगुप्तनु । तो भगवान स्वमुखेंकरून । समाहित वचन बोलतसे ॥२७॥महतांचिये सभास्थानीं । श्रवण करीत असतां मुने । बोलता जाला चक्रपाणी । नियतवचनीं तें ऐका ॥२८॥श्रीभगवानुवाच - अहो वयं जन्मभृतो लब्धं कार्त्स्न्येन तत्फलम् । देवानामपि दुष्प्रापं यद्योगेश्वरदर्शनम् ॥९॥अहो म्हणिजे हर्षोत्कर्षें । भगवान बोले परमोल्लासें । आम्ही जन्मसाफल्य तैसें । लाधलों जैसें लाहों ये ॥२९॥जन्मवंतांचें सफळ जिणें । होय साकल्यें ज्या साधनें । देवांसही दुर्लभपणें । आम्हांकारणें तें सुलभ ॥३०॥जन्मसफल्याचें बीज । तें साकल्यें आम्हां सहज । देवां दुर्लभ जें निजगुज । तें पदकंज स्वामींचें ॥३१॥योगीश्वरांचें दर्शन । तें आम्हां सुलभ पूर्णत्वेंकरून । देखतां स्वामीचे श्रीचरण । त्रिजगीं मान्य धन्यतम ॥३२॥देवां दुर्लभ दर्शन तुमचें । आम्हां सुलभ तें आजि साचें । जालों अधिकारी स्पर्शाचे । चरणसेवनाचेनि मिसें ॥३३॥देवां दर्शनमात्रही न घडे । आम्हां स्पर्शन सेवन घडे । अघटित घटनेचेनि पाडें । आश्चर्य केवढें वाटतसे ॥३४॥किं स्वल्पतपसां नृणामर्चायां देवचक्षुषाम् । दर्शनस्पर्शनप्रशन्प्रह्वपादार्चनादिकम् ॥१०॥अपक्कज्ञानी अल्पबुद्धि । त्यांची विपरीत साधनसिद्धि । भजती देखोनियां उपाधि । फळनिरुपाधि अनोळख ॥३५॥मिष्ट उत्कृष्ट नेणती खंड । भजती तदर्थ इक्षुदंड । अल्पफळार्थ कर्मकाबाड । केवळ जडमूढ आचरती ॥३६॥तीर्थादिस्नानमात्रीं ज्यांची । तपोबुद्धि वर्ते साची । ऐसिया अल्पता पशूंची । निष्ठा कैंची सत्पुरुषीं ॥३७॥पाषाणादिप्रतिमामात्रीं । देवताबुद्धि ज्यांचे नेत्रीं । तयांची निष्ठा योगीश्वरीं । सुकृतकारी न संभवे ॥३८॥योगीश्वराचें दर्शन । अंगसंवाहनस्पर्शन । नम्रता प्रश्न पादार्चन । सुकृतसधनसें न वटे ॥३९॥कीं तें स्थूळदृष्टि मूढ । देहात्मवादी जे कां दृढ । तीर्थप्रतिमातपादि उघड । कर्मकाबाड श्रेष्ठ गमे ॥४०॥योगीश्वरांच्या ठायीं त्यांची । मानुषीप्रतीति वर्ते साची । यास्तव दर्शनस्पर्शनाची । पादार्चनाची असंभावना ॥४१॥जैसे आपण मनुष्यदेही । योगीश्वरही तैसेचि पाहीं । भासती आणि त्यांच्या ठायीं । निष्ठा न बणे पूज्यत्वीं ॥४२॥त्यांच्या दर्शनें कल्याणप्राप्ति । स्पर्शनें समस्ताघनिवृत्ति । नम्रप्रश्ने आत्मसंवित्ति । अमृतावाप्ति पादार्चनें ॥४३॥ऐसी भावना नुपजे तयां । स्थूळबुद्धि ज्या प्राणियां । असंभावना करूनियां । दृढनिश्चया अनुसरती ॥४४॥परि ते तारतम्य नेणती । स्थूळबुद्धि मंदमति । तेचि तारतम्याचे रीती । स्वमुखें श्रीपति वाखाणी ॥४५॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP