मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८४ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ८४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७१ अध्याय ८४ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥११॥अम्मयें म्हणिजे जलमयें तीर्थें । पापक्षालनीं नव्हती समर्थें । मृत्तिकापाषाणमयदैवतें । जी असमर्थें फलदानीं ॥४६॥योगीश्वरांच्या कृतसंकल्पें । उदकें होती तीर्थरूपें । मृत्तिका पाषाण सुरप्रतापें । स्फुरती जल्पें ज्यांचेनी ॥४७॥तया तीर्थप्रतिमांप्रति । भजतां चिरकाळें फळें देती । साधुदर्शनें सफळ होती । मनोरथमात्र भजकांचे ॥४८॥प्रतिमातीर्थादिकांएं परम । साधुसेवनीं तारतम्य । क्लेशसाध्य आणि सुगम । पुन्हा पुरुषोत्तम प्रतिपादी ॥४९॥नाग्निर्न सूर्यो न च चन्द्रतारका न भूर्जलं खं श्वसनोऽथ वाड्मनः । उपासिता भेदकुतो हरन्त्यघं विपश्चितो घ्नन्ति मुहूर्तसेवया ॥१२॥पंचमहाभूतें भिन्न । इयें उपास्यें सहवाङ्मन । यांतें उपासितां भेदज्ञ । अघनाशन न करिती पैं ॥५०॥उपास्य भिन्न उपासक भिन्न । उपासनामार्ग भिन्न । तदाचरणीं फळही भिन्न । भजे भेदज्ञ या बोधें ॥५१॥भूमि म्हणिजे प्रतिमा पार्थिव । जळविशेषें तीर्था नांव । अग्न्यर्केन्दुतारका सर्व । तेजस्तत्व जाणावें ॥५२॥श्वसनशब्दें बोलिजे पवन । देहचाळक जो मुख्य प्राण । खं म्हणिजे केवळ शून्य । आकाश म्हणोनि जाणावें ॥५३॥वाग्देवता ते गायत्री । मनोदेवता ज्योत्स्ना चान्द्री । इत्यादिदैवतें भेदज्ञनरीं । पृथगाकारीं भजिजेत ॥५४॥भेदबुद्धी भेदज्ञ भजती । तैं तीं दैवतें प्रसन्न होती । कल्पित दोषांची निवृत्ती । करूं न शकती चिरकाळें ॥५५॥तीर्थाटनें दोष गेला । तंव कर्मलोपात्मक आंगीं जडला । एंव भज्यभेद झाला । दोषां वेगळा करवेला ॥५६॥चिरकाळ भजनाच्या प्रसंगें । एक आंगींचा दोष भंगे । तंव अनेकदोषसमुच्चय लागे । तो न भंगे तद्योगें ॥५७॥तैसे नव्हेती साधुजन । मुहूर्तमात्र ज्यांचें सेवन । केलिया दोषांचें जन्मस्थान । ते भंगिती अज्ञान अभेदें ॥५८॥मुहूर्तमात्र ज्यां सहवासीं । वसतां निरसिती ते द्वैतासी । अविद्यानाशें अज्ञानासी । भेदेंसहित क्षालन पैं ॥५९॥भेद हरतां अभेदवोधें । चिन्मात्रैक निवळे नुसधें । निवर्त निरासे अखिलानंदें । स्वसंवेद्य चिन्मात्र ॥६०॥तस्माद्भूताद्युपासना । करूं न शकती दोषनिरसना । मुहूर्तमात्र साधुसेवना । करितां सन्मात्र करिती ते ॥६१॥यास्तव साधूवांचोनि कोण्ही । समर्थ नव्हती दोषनिरसनीं । साधु उपेक्षूनि तीर्थादिभजनीं । निष्ठा धरिती ते ऐका ॥६२॥यस्याऽऽत्मबुद्धिः कुणपे त्रिधातुके स्वधीः कलत्रादिषु भौम इज्यधीः । यत्तीर्थबुद्धिः सलिले न कर्हिचिज्जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः ॥१३॥कुणप म्हणिजे जितचि प्रेत । त्रिधातु म्हणिजे कफ वात पित्त । ऐसें शरीर नाशवंत । अहंबुद्धि तेथ जयांसी ॥६३॥आत्मबुद्धि त्रिधातुकीं । आत्मीयबुद्धि कलत्रादिकीं । स्वधीशब्दाच्या अर्थविवेकीं । कवळी निष्टंकीं भ्रमग्रस्त ॥६४॥माझा देश माझा ग्राम । माझी वृत्ति माझें सद्म । पुत्र कलत्र मित्र आश्रम । कर्म धर्म मामक हें ॥६५॥स्वधीशब्दें इत्यादि सकळ । आपुलें मानोनि ममताजाळ । आणि भूविकार जे जे समळ । देवता केवळ त्यां मानी ॥६६॥तीर्थबुद्धि जळाच्या ठायीं । ऐसा जयासी निश्चय पाहीं । योगीश्वरांतें या प्रवाहीं । जाणोनि कांहीं त्यां न भजे ॥६७॥त्रिधातुक कुणपदेह । मम सम योगीश्वरही होय । तेथ अधिक कोणतें काय । पूज्यत्व लाहे केंवि हा ॥६८॥ऐशिये असंभावनेकरून । योगीश्वरांतें पाहती गौण । नेणती तत्कृट साध्य साधन । मग त्यां महिमान केंवि कळे ॥६९॥देहचतुष्ठयातीत । प्रत्यगात्मा निर्गळित । स्वरूपसमरसें जे संतत । योगी वर्तत आत्मत्वें ॥७०॥विश्वात्मकत्वें योगिजन । तेथ कुणपबुद्धि ज्यालागून । तोचि केवळ गो खर श्वान । किंवा हीन त्याहूनिही ॥७१॥अभेदबोधें निर्मम योगी । ममता लावी जो त्यां आंगीं । आत्मीयभाव जो नापंगी । तो अभागी गोरखवत् ॥७२॥मृत्पाषाणधातुप्रतिमा । देवताबुद्धि तेथ ज्या अधमा । योगीश्वरीं पूज्यत्वगरिमा । न धरी दुरात्मा गोखर तो ॥७३॥जळाच्या ठायीं तीर्थभावना । भावी तद्योगें अघनिरसना । योगिदर्शनें निष्पापपणा । न मानी जाणा गोखर तो ॥७४॥तृणकाष्ठादिभारवाह । वृषभा खरा सम त्याचा देह । अभिज्ञजनाच्या ठायीं रोह । जो करी पहा हो प्राकृतवत ॥७५॥ऐसें भगवंतें मुनिजना । बोलिलें असतां अनुरूप वचना । आनंद जाला त्यांचिया मना । तो कुरुरत्ना शुक सांगे ॥७६॥श्रीशुक उवाच - निशम्येत्थं भगवतः कृष्णस्याकुण्ठमेधसः ।वचो दुरन्वयं विप्रास्तूष्णीमासन्भ्रमद्धियः ॥१४॥ज्याची मेधा कुण्ठित नोहे । अकुण्ठमेधस त्या म्हणावें । षड्गुणैश्वर्यें जो मिरवे । तो पूर्ण वैभवें भगवंत ॥७७॥तया कृष्णाचें ऐसें वचन । ऐकोनि समस्तही मुनिजन । संमत अनुरूप जाणोन । मौन धरून राहिले ॥७८॥अन्वय तर्किला न वचे कांहीं । बुद्धि निश्चळ न थरे ठायीं । विचारविवरणप्रवाहीं । प्रत्युत्तरार्थ धी भ्रमती ॥७९॥विचारविवरणीं भ्रमित बुद्धि । मौनस्थ बैसले तपोनिधि । विलंबें विवरूनि यथाविधि । वदती त्रिशुद्धि तें ऐका ॥८०॥चिरं विमृश्य मुनय ईश्वरस्येशितव्यताम् । जनसङ्ग्रह इत्यूचुः स्मयन्तस्तं जगद्गुरुम् ॥१५॥चिरकाळ विचार करूनी मुनीं । निर्धार केला आपुले मनीं । जें ईश्वरें अनीश्वरपणीं । कर्माधिकारी कां होणें ॥८१॥ईश्वर असतां अनीश्वरपण । धरूनि होइजे कर्माधीन । जें जनसंग्रहमात्र कारण । हें विवरून दृढ केलें ॥८२॥हास्यवदनें कृष्णाप्रती । प्रत्युत्तरा मुनि बोलती । जगद्बोधात्मक ज्या शक्ती । यास्तव म्हणती जगद्गुरु ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP