मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८३ वा| श्लोक २७ ते ३० अध्याय ८३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ८३ वा - श्लोक २७ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २७ ते ३० Translation - भाषांतर दिवि दुन्दुभयो नेदुर्जयशब्दयुता भुवि । देवाश्च कुसुमासारन्मुमुचुर्हर्षविव्हला ॥२७॥गगनीं लागल्या सुरदुन्दुभि । त्रिदशविमानें दाटलीं नभीं । जयजयकार सुरकदंबीं । नरीं मुनिवरीं भूभागीं ॥२१५॥दिव्यप्रसूनीं वर्षती देव । गाती सप्तस्वरीं गंधर्व । रंभाप्रमुख अप्सरासमूह । मृत्य करिती ते काळीं ॥१६॥हर्षविह्वळ निर्जर सकळ । गर्जे जयघोषें भूतळ । त्रिजगीं आनंदकल्लोळ । विजयी घननीळ सुर गाती ॥१७॥तिये समयीं उत्साहेंसीं । परमानंदें परमात्मयासी । सप्रेम सादर वरावयासी । आलें सभेसी ते ऐक ॥१८॥तद्रङ्गमाविशमहं कलनूपुराभ्या पद्भ्यां प्रगृह्य कनकोज्ज्वलरत्नमालाम् ।नूत्ने निवीय परिधाय च कौशिकाग्र्ये सव्रीडहासवदना कबरीधृतस्रक् ॥२८॥भगवत्प्राप्तिहर्षनिर्भरें । आपुलें वर्णन आपुल्या वक्रें । करिती झाली तें येथ चतुरें । दूषण सहसा न मनावें ॥१९॥भगवत्प्राप्तीच्या उत्साहें । सभार्म्गणामाजि लाहें । प्रवेशलें मी द्रौपदीये । परिसती होय तें आतां ॥२२०॥शिबिका गजरथयानाविणें । श्रीकृष्ण वरावया कारणें । रंगीं प्रवेशलें केवळ चरणें । वसनाभरणें मंडित पैं ॥२१॥चरणीं नूपुरें रुणझुणती । पदविन्यासीं माळा । कनकग्रथिता परमोज्ज्वळा । हस्तीं घेऊनियां घननीळा ॥२२॥अनर्घ्य रत्नमणींचीमाळा । कनकग्रथिता परमोज्ज्वळा । हस्तीं घेऊनियां घननीळा । लक्षीं डोळां सप्रेम ॥२३॥कौशेयवसनांमाजि श्रेष्ठें । नूतनें रंगाढ्यें वरिष्ठें । नीवीबंधेंसीं द्रढिष्ठें । सोत्तरीयपरिधानें ॥२४॥कृष्णप्राप्तीचा हर्षोत्कर्ष । तेणें मंदस्मित वदनाब्जास । फुल्लार करितां र्ही मानस । संकोचवी कुमुदोपम ॥२२५॥वक्रापाङ्गीं हरिमुख पाहें । व्रीडापल्लवें छादित राहें । मंदस्मिताचिया उदयें । मुख भासुर भगणपवत् ॥२६॥मौळप्रसून अर्धचंद्र । विगत उडुपें जेंवि अंबर । शोभे जैसें सनक्षत्र । मुक्तीं भासुर तेंवि शिर ॥२७॥बिजोरा हांसळ्या निडळपट्टीं । दिव्यसुमनांची ग्रथित दाटी । केशपाशांची रैली सुधटी । शोभे गोमटी वेणीका ॥२८॥मूद राखडी केवडा कुहिरी । रत्नखचित कूर्म शफरी । अच्युत आंवळा बदरहारी । वेणिकाग्रीं शुभ गुच्छ ॥२९॥मंदारमाळा मौळाभरणीं । धरिली शोभे लावण्यगुणीं । हं सविन्यासें रुचिर चरणीं । सभारंगणीं प्रवेशलियें ॥२३०॥शतसखियांची भंवती घरटी । ज्यांचें सौन्दर्य अप्सरां मुकुटीं । उपचारार्पणाचिये रहाटी । वारिती दाटी वेत्रधरा ॥३१॥ऐसी प्रवेशोनियां सभा । नृपांमाजि पंकजनाभा । निरखितां उत्साह नावरे नभा । लावण्यलाभा मन मानी ॥३२॥सखीजनींही सभास्थानीं । दावितां नृपरत्नांच्या श्रेणी । त्यांमाजि लक्षिला चकपाणी । तें तूं श्रवणीं अवधारीं ॥३३॥उन्नीय वक्त्रमुरुकुन्तलकुण्डलत्बिङ्गण्डस्थलं शिशिरहासकटाक्षमोक्षैः ।राज्ञो निरीक्ष्य परितः शनकैर्मुरारेरसेऽनुरक्तहृदया निदधे स्वमालाम् ॥२९॥ईशन्मात्र उच वक्त्र । करूनि समस्त भूभुजचक्र । भंवतें पाहिलें म्यां सर्वत्र । निमेषमात्र न भरे तों ॥३४॥तिया वक्त्राचीं विशेषणें । श्लोकीं कथिलीं व्यासनंदनें । तैसीं हरिवरदव्याख्यानें ।उपलविजती तीं ऐका ॥२३५॥उरु म्हणिजे बहुकुंतल । कर्ण आणि गंडयुगल । तया दोहींचें अंतराळ । व्यापूनि कुडिल झळकती जे ॥३६॥ऐसे कुन्तळ सारूनि मागें । पाहिलें भूभुजचक्र अवघें । सलंबकटाक्षमोक्षणवेगें । स्मितापाङ्गें संमिश्र ॥३७॥कुण्डलप्रमुख भूषणें श्रवणीं । ज्यांवरी जडिले भासुर मणि । कुन्तल उजळिती स्वप्रभें करूनी । गंडस्थानीं बिम्बित जे ॥३८॥नीहार शीतळ जेंवि शरीरीं । तैसी स्मितभा संतापहारी । जिया कटाक्षांमाझारी । तिहीं श्रीहरि लक्षियला ॥३९॥इत्यादि सविलास अपाङ्गीं । सप्रेम लक्षिला श्रीशार्ङ्गी । हृदय रंगलें लावण्यरंईं । तिये समयीं नृपतनये ॥२४०॥चिन्तामणि जेंवि मिडगणीं । शशांक जसा कां उडुगणीं । तैशा भंवत्या नृपांच्या श्रेणी । पाहोनि नयनीं हरि वरिला ॥४१॥कर्दमभक्षक जे दर्दुर । तेंवि उपेक्षूनियां नृपवर । चकोर लक्षी अमृतकर । तेंवि श्रीधर लक्षियला ॥४२॥यंत्र भेदूनि सभाङ्गणीं । विजयश्रीसह चक्रपाणी । तरणि लोपी उडुगणश्रेणी । तेंवि नृपगणीं देदीप्य ॥४३॥तो म्यां लक्षूनि श्रीगोपाळ । मंदगामी जेंवि मराळ । तैसी जाऊनियां हळुहळु । घातली माळ तत्कंठीं ॥४४॥हरिरूपीं जडोनि गेलें हृदय । दैवें साधलें अघटित कार्य । माझा मनोरथ पावला विजय । निर्ज्जरनिचय जय म्हणती ॥२४५॥हर्षें वर्षती सुमनभार । निर्जर करिती जयजयकार । गंधर्व गाती सप्तस्वर । पढती मुनिवर शुभसूक्तें ॥४६॥मंडपीं जाला वाद्यगजर । ऐकें तोही संक्षेपमात्र । उत्साहभरित नरसुरचक्र । सुख अपार मम जनका ॥४७॥तावन्मृदङ्गपटहाः शङ्खभेर्यानकादयः । निनेदुर्नटनर्तक्यो ननृतुर्गायका जगुः ॥३०॥माळा घालितां कृष्णकंठीं । आनंदनिर्भर जाली सृष्टी । नाद न समाये गगनमठीं । जयबोभाटीं वाद्यांच्या ॥४८॥मृदंगांचा झणत्कार । ढोलदमामयांचा गजर । शंख भेरी दीर्घस्वर । वाजती उच्चतर दुन्दुभि ॥४९॥आनक गोमुख काहळा मधुर । मंगळ तुरें अतिसुस्वर । भाटबंदिजनांचे भार । बिरुदें अपार ते पढती ॥२५०॥नटवे नटिनी नाटकशाळा । कुशळा नर्तकी नर्तनशीळा । दावूनि कौशल्यकळा सकळा । नृत्यें करिती ते समयीं ॥५१॥गायक गाती तानमानें । आरोहावरोहमूर्च्छने । दाविती संगीतशिक्षाचिह्नें । गुणाढ्यपणें गुणवंत ॥५२॥ऐसा भरला सभारंग । वरिला असतां म्यां श्रीरंग । लज्जा पावला भूभुजवर्ग । तोही प्रसंग अवधारीं ॥५३॥विवाहसोहळा कथावा पुढें । तंव ते भूभुज चहूंकडे । खळवळूनियां उठिले फुडे । तेंचि रोकडें निरूपितें ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP