मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८३ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ८३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ८३ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - तथानुगृह्य भगवान्गोपीनां स गुरुर्गतिः । युधिष्ठिरमथापृच्छत्सर्वांश्च सुहृदोऽव्ययम् ॥१॥शुक म्हणे गा कुरुकुलतिलका । श्रवणभक्तिप्रकाशका । हरिगुणपरमामृतप्राशका । सावध निका हो आतां ॥९॥गोपीसान्त्वनोपसंहरण । करूनि पुढती श्रीकृष्णगुण । वर्णिता झाला शुकभगवान । तें येथून अवधारा ॥१०॥गोपी नेऊनियां एकान्तीं । प्रबोधूनियां अध्यात्मरीति । पावविल्या चित्सुखावाप्ति । गुरुर्गति यास्तव तो ॥११॥विसर्जूनि व्रजवनितांतें । यदुसमाजीं श्रीकृष्णनाथें । पुढती येऊन युधिष्ठिरातें । क्षेमकल्याण पूशिलें ॥१२॥जेथ जे जे होते नृपति । तैसेंच क्षेम सर्वांप्रति । पुसता झाला रुक्मिणीपति । परमप्रीति करूनियां ॥१३॥राष्ट्र दुर्गें कोश सेना । नृपा सचिवां वधूसंताना । दासदासी पोष्यां नाना । क्षेमकल्याणा पुशियेलें ॥१४॥हें ऐकोनि ते भूपती । काय प्रत्युत्तर बोलती । तें तूं ऐकें कुरुभूपती । म्हणे सुमती मुनिवर्य ॥१५॥त एवं लोकनाथेन परिपृष्टाः सुसत्कृताह । प्रत्यूचुर्हृष्टमनसस्तत्पादेक्षाहतां ह सः ॥२॥लोकनाथ जो श्रीकृष्ण । तेणें ऐशियां प्रकारेंकरून । अनामयप्रश्नें नृपांचा गण । पुशिला तो बोलतसे ॥१६॥श्रीकृष्णपाददर्शनावाप्ति । तेणें जाली पापोपहति । प्रफुल्ल प्रसन्नता मग चित्तीं । लाहोनि कथिती सुसत्कथा ॥१७॥सुष्ठु म्हणिजे सद्गुणभरित । श्रीकृष्णाचें यश ऊर्जित । वास्तव ऐश्वर्य संमिश्रित । वदती श्लोकोक्त तें ऐका ॥१८॥कुतोऽशिवं त्वच्चरणाम्बुजासवं महन्मनस्तो मुखनिःसृतं क्वचित् ।पिबन्ति ये कर्णपुटैरलं प्रभो देहभृतां देहकृदस्मृतिच्छिदम् ॥३॥प्रभो ऐशिया संबोधनें । ऐश्वर्य सूचिलें समर्थपणें । भो भगवंता आम्हांकारणें । अव्यय पुशिलें तरी ऐक ॥१९॥तुझें जें श्रीपादपंकजासव । श्रेष्ठांचिया मना पासाव । तन्मुखद्वारा ज्याचा प्रसव । ज्यापुढें वाव अमरसुधा ॥२०॥तें कदाचित एकही वार । श्रवणपुटें जे प्राशिती नर । त्यांसी कोठोनि मग अभद्र । स्पर्शावया उरों शके ॥२१॥सनकादिक जे ऊर्धरेते । तिहीं संकल्परहितचित्तें । सदैव भोगितां अवचितें । वदनपथें निःसृत जें ॥२२॥तया महंतांचे वदनींहून । वत पदपंकजासवमहिमान । स्रवतां प्राशिलें श्रवण भरून । त्यां कोठून अशिव शिवे ॥२३॥एकवार ही प्राशिलें पुरे । मग त्यां अभद्र कोठेंचि नुरे । त्यांचीं कर्में कल्याणकरें । उत्तरोत्तर पैं होती ॥२४॥अमरसुधेहूनि वरिष्ठ । श्रीपदपंकजासव जें मिष्ठ । तोही परिसा गुण उत्कृष्ट । जो कथिला स्पष्ट मुनिवर्यें ॥२५॥श्रीपादाब्जासव निर्धारें । एकवारही श्रवणद्वारें । प्राशन केलें मात्र पुरे । अविद्याभुररें मग कैंचें ॥२६॥कर्मसंभव जें शरीर । याचा कर्ता परमेश्वर । त्याची विस्मृति जें अज्ञान घोर । तच्छेदकर आसव हें ॥२७॥यालागीं निर्जरसुधेहून । पादाब्जासवीं उत्कट गुण । निर्जर स्वर्गसुधा प्राशून । पावती पतन पुण्यक्षयीं ॥२८॥तें तव पादाब्जासव दिव्य । श्रवणें नयनें नृपति सर्व । प्राशन करूनि पावलों शिव । कुशल सदैव तव कृपया ॥२९॥तुझें रूप सगुणनिर्गुण । यथामति करूनि कथन । आम्ही वंदितों तुज लागून । म्हणती नृपगण तें ऐका ॥३०॥हि त्वात्मधामविधुतात्मकृतत्र्यवस्थमानन्दसम्प्लवमखण्डमकुण्ठबोधम् । कालोपसृष्टनिगमावन आत्तयोगमायाकृतिं परमहंसगतिं नताः स्म ॥४॥हीति निश्चयात्मक वचन । नृपगण वदती भो भो कृष्ण । आम्ही तुजप्रति नमितों जाण । स्वकल्याण इच्छोनी ॥३१॥ज्या तुजप्रति नमितों आम्ही । तें तव स्वरूप कैसें स्वामी । जे अवगमलें हृदयपद्मीं । निगमागमीं प्रतिपाद्य ॥३२॥वास्तास्वरूपप्रकाशें करून । निरसलें अवस्थात्रयावरण । स्वसंवेद्य आनंदघन । अपरिच्छिन्न अखंड जें ॥३३॥अवस्थात्रयावरण कैसे । मनःकल्पनेमाजि उमसे । मग तें बुद्धिनिश्चयवशें । कवळी आपैसें आत्मत्वें ॥३४॥अस्थिनाड्यादि प्रपंच स्थूळ । रक्तरेतोद्भव जो समळ । विजातीय अमंगळ । तो आत्मा केवळ धी मानी ॥३५॥स्थूळशरीरी करनकदंब । करी चिदाभास तदवलंब । तैं दृश्याचा विरूढे कोंभ । प्रकटे शोभ विजगाची ॥३६॥चिदाभास तो विश्वाभिमानी । जाग्रदवस्था सत्य मानी । भरे विषयांचे आडरानीं । हांव धरूनी हव्यासीं ॥३७॥तंव तो मिथ्या विषयाभास । तदभिलाषें पावे त्रास । मिथ्याभ्रमीं कैंचा तोष । भोगी क्लेश जागृतींत ॥३८॥तेव्हां वाञ्छी आमरति । स्थूळभोक्तया ते अप्राप्ति । अज्ञानप्राचुर्यें सुषुप्ति । माजि विश्रान्ति तैं लाहे ॥३९॥तेथ आत्मत्वाचें विस्मरण । प्रकर्षें अज्ञ म्हणोनी प्राज्ञ । आत्मभावें निर्बुजून । प्रज्ञा स्वप्न अवलंबी ॥४०॥सुषुप्तीमाजि आनंदभोग । तोही अंतरे तैं निलाग । काल्पनिक करणवर्ग । स्वाप्न सवेग मग भावी ॥४१॥देखिली ऐकिली स्वप्नगर्भीं । त्रिजगद्रचना होय उभी । तेथ तैजसात्मत्व अवलंबी । भोगलाभीं प्रविविक्तीं ॥४२॥लटिक्यामाजि लटुफटु । तेचि स्वप्नींचा नाट्यनटु । काल्पनिक्त अमृतघटु । न शके प्रकटूं मिष्ठत्व ॥४३॥प्राज्ञतैजसविश्वात्मक । अवस्थात्रयीं त्रिनामक । चिदाभास भावी एक । अवस्थाकौतुकभोक्तृत्वें ॥४४॥नेत्रीं अवस्थांचें आवरण । स्वरूपीं नाहींच जाण । अतएव आनंदघन परिपूर्ण । अपरिच्छिन्न अखंडत्वें ॥४५॥तेंचि प्रविविक्त भोक्तृत्व लटिकें । अभीष्टत्वें क्षणैक न टिके । भयसंकटीं इच्छी सुटिके । लाटे घटिके जागर तैं ॥४६॥देशकाळवस्तुभेदें । खंडिलें न वचे परिच्छेदें । तें अखंड ऐसिया बोधें । कोविदवृन्दें प्रबोधिती ॥४७॥नर्मदेपर्यंत मालवदेश । तेथूनि खंडला निःशेष । तैसा अखंड आत्मयास । देशें निर्देश घडेना ॥४८॥चारी लक्ष बत्तीस सहस्र । इतुका विस्तीर्ण कळिकाळ घोर । तो खंडल्यावरी सुन्दर । स्वधर्मप्रचुर कृतयुग पैं ॥४९॥काळपरिच्छेदा सरिसा । आत्मा अखंड न खंडे जैसा । वस्तुपरिच्छेदा तोही परिसा । होय तैसा निरूपितों ॥५०॥क्रमें गजांचें खंडतां सैन्य । पुधें चालती अश्व जीवन । अश्व खंडतां पदातिगण । बोधें परिच्छिन्न निरूपितां ॥५१॥देश काल वस्तु ऐसी । परिच्छेदें कळे आपैसी । अखंड आत्मया खंडता तैसी । परिच्छिन्नत्वें न करवे ॥५२॥अखिलानंदकदंब तो तूं । अखंड अपरिच्छिन्न संततु । अनेक भेदभ्रमात्मक मी तूं । त्रिकाळीं परंतु नावगमे ॥५३॥तुझें स्वरूप अकुण्ठबोध । अवस्थावरणीं न घडे रोध । या लागीं सन्मात्र स्वसंवेद्य । निगमकोविद अनुभविती ॥५४॥जरी तूं म्हणसी देवकीतनय । परिच्छिन्न सावयवकाय । त्या मज ऐसें स्तवन काय । योग्य होय विचारा ॥५५॥ऐसें न म्हणावें भगवंता । काळनामा काळातीता । संतत सत्पथनिगमगोप्ता । या तव चरिता श्रुति गाती ॥५६॥युगानुयुगें अवतरून । स्वधर्मसेतुनिगमावन । करूनि रक्षिसी साधुस्वजन । दुष्टनिबर्हण करूनियां ॥५७॥प्रस्तुतकाळें निगम उच्छेद । पावले यास्तव अध्वरवृन्द । असाङ्गतेस्तव नव्हती फळद । त्रिजगा खेद तद्योगें ॥५८॥कृतादिकाळीं निसर्गनिष्ठा । यथोक्त वर्णधर्मप्रतिष्ठा । अविधि न करिती निगमपाठा । तैं ते अभीष्टा प्रसवती ॥५९॥काळान्तरें द्विजादि मळिन । अनध्यायीं वेदाध्ययन । तेणें निगम वीर्यहीन । निष्फळ यज्ञ तन्मंत्रीं ॥६०॥द्विजयजनादि निर्वीर्य वेद । तेणें निस्तेज अमरवृन्द । दैत्यासुरां परमानंद । करिती प्रतिपाद्य अभिचार ॥६१॥निगम उपसर्ग पावले काळें । जाणोनि त्रिजगत्पाळनशीळें । योगमाया तां घननीळें । अवलंबलीळे तनु धरणें ॥६२॥ते हे योगमायामय आकृति । मर्त्यनाट्य लावण्यमूर्ति । परमहंसाची सद्गति । परंज्योति मूर्तिमय ॥६३॥नव्हसी वसुदेवदेवकीचा । नव्हसी नंदयशोदेचा । गोशा द्विजमखाम्नायांचा । जाणोनि त्रिवाचा आम्ही नमितों ॥६४॥त्वा हें युष्मदीं द्वितीयैकवचन । निश्चयार्थी ही अव्यय जाण । हि ता पृथक द्विपदीं करून । तें हें व्याख्यान उपलविलें ॥६५॥हित्वा एक्याच पदें आतां । वाखाणिलें सामान्यता । पदसंदर्भ तोही श्रोतां । श्रवण करितां नुबगिजे ॥६६॥देहअहंते आत्मा नाम । गृहधनममता बोलिजे धाम । एवं अवस्थात्रयाचा क्रम । हित्वा म्हणिजे त्यागूनि ॥६७॥आनंदसंदोह जो संतत । अखंड अकुंठबोध भगवंत । जाणोनि त्या तव चरणीं प्रणत । आम्ही समस्त नृप म्हणती ॥६८॥ऐसे युधिष्ठिरप्रमुख नृपति । श्रीकृष्णाची करूनि स्तुति । वास्तवबोधें करूनि प्रणति । तंव मिनला युवतिसमुदाव ॥६९॥श्रीऋषिउवाच - इत्युतमश्लोकशिखामणिं जनेष्वभिष्टुवत्स्वन्धककौरवस्त्रियः ।समेत्य गोविन्दकथा मियोऽगृणंस्त्रिलोकगीताः श्रृणु वर्णयामि ते ॥५॥उत्तमश्लोकांचा शिखामणी । तो श्रीकृष्ण वृष्ण्यग्रणी । त्यातें स्तवितां भूभुजगणीं । श्रोतीं जाणोनि पूर्वोक्त ॥७०॥नृपाति जनपद स्तवीत असतां । तंव तेथें येऊनि कुरुयदुवनिता । परस्परें गोविन्दकथा । कथिती तत्वता उत्साहें ॥७१॥शुक म्हणे भो सौभद्रसुता । त्रिजगीं गीयमाना विख्याता । त्या मी कथितों तुजप्रति आतां । मत्स्यजामाता अवधारीं ॥७२॥कृष्णमहिमा वर्णिती जन । तंव कौरववनिता प्रेमें करून । यदुवनितांचें पातल्या स्थान । केलें पूजन तिहीं त्यांचें ॥७३॥क्षेमालिङ्गन परस्परें । जालीं स्वागतप्रश्नोत्तरें । हरिचरिताच्या श्रवणादरें । करिती आदरें सुखाचर्या ॥७४॥तेथ द्रौपदी श्रीकृष्णभगिनी । हरिवनितांसि ज्येष्ठ रुक्मिणी । नणदा भाउजया मिळोनी । हरिगुणकथनीं प्रवर्तल्या ॥७५॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP