मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८२ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ८२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय ८२ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर रोहिणी देवकी चाथ परिष्वज्य व्रजेश्वरीम् । स्मरन्त्यौ तत्कृतां मैत्रीं बाष्पकण्ठ्यौ समूचतुः ॥३६॥तंव रोहिणी देवकी प्रीति । नमस्कारूनि नंदाप्रति । यशोदेतें आलिङ्गिती । पूर्वील स्मरती स्नेहमैत्री ॥४७॥कंठ दाटले वोरसभरें । मुखें शब्द न उच्चारे । ऐसी अवस्था परस्परें । स्फुंदती अंतरें द्रवलेनी ॥४८॥मग वसुदेवादि यादवगणीं । नंद बैसविला निजासनीं । यशोदेतें सुखासनीं । देवकी रोहिणी बैसविती ॥४९॥का विस्मरेत वां मैत्रीमनिवृत्तां व्रजेश्वरि । अव्याप्याप्यैन्द्रमैश्वर्यं यस्या नेह प्रतिक्रिया ॥३७॥देवकी रोहिणी यशोदेसी । म्हणती व्रजेश्वरी कल्याणराशी । तुमची मैत्री हृदयकोशीं । अहर्निशी स्मरत असों ॥२५०॥ब्रह्माण्डभरी उपकार तुमचा । सर्वथा वदों न शकवे वाचा । निवृत्तिकारण असतां साचा । अनिवृत्ति आमुचा जीव जाणे ॥५१॥इंद्रलक्ष्मीही जालिया प्राप्त । तदैश्वर्यें होऊं अंकित । तथापि प्रतिक्रिया किंचित । नहूं समर्थ करावया ॥५२॥बोलों न शकवेचि सर्वथा । मौन आदरी वाग्देवता । तथापि अल्पस्वल्प उच्चारितां । त्या संकेता परिसिजे ॥५३॥एतावदृष्टपितरौ युवयोः स्म पित्रोः सम्प्रीणनाभ्युदयपोषणपालनानि ॥प्रपयोषतुर्भवति पक्ष्म ह यद्वदक्ष्णोर्न्यस्ताव कुत्र च भयौ न सतां परः स्वः ॥३८॥रामकृष्ण हीं लेंकुरें तान्हीं । गुप्त ठेविलीं तुमचिये सदनीं । जननी जनक यां लागूनी । मुळींहूनी अदृष्ट ॥५४॥जयांसी नाहीं जन्ममरण । त्यांचे जननीजनक कोण । मा ते देखती कैं कोठून । गिरा हें वचन प्रतिपादी ॥२५५॥तस्मात तुम्हीच माता पिता । तुमच्या ठायींच पितृत्व तत्वता । ठेविलें मुळींहूनि तत्वता । सर्वलालनता पावलें ॥५६॥तुम्हीं उत्संगीं कडिये खांदां । वाहूनि पावविलें प्रमोदा । भातुक्याच्या अनेक स्वादा । चाखवूनियां लाविलें ॥५७॥अंग्या टोप्या पादत्राणें । फडक्या वोढण्या कटिबंधनें । हेमरत्नांचीं विचित्राभरणें । बहुतां गुणें बहु केलीं ॥५८॥ऊर्जित अभ्युदय जिताणी । गृहशान्त्यर्थ जोशी जाणी । देवदेव्हारे पुंसवणी । केली सांडणी पायरवीं ॥५९॥व्रतें यात्रा सायास नवस । यास्तव केले तुम्हीं बहुवस । दांत डोळे अनेक क्लेश । साहिले विशेष बालत्वीं ॥२६०॥साय दुग्ध दधि नवनीत । शर्करा सद्यस्तप्त घृत । मक्षिकासंभवमधुमिश्रित । तुम्हीं यां संतत कवळ दिल्हे ॥६१॥अनेक पक्कान्नपरवडी । बाळच्छंदें घातली कोडी । ती ती पुरविली आवडी । नाहीं सवडी दाखविली ॥६२॥विचित्र परोपरीचीं पक्कान्नें । पायस संयाव शुभ्र परमान्नें । घृतपाचितें दिव्य ओदनें । नृपाशनार्हें जेवविलीं ॥६३॥स्तनपानादि धारोष्ण क्षीर । प्राशवूनियां निरंतर । वाढविले हे उभय कुमर । हा उपकार केंवि फिटे ॥६४॥नाना खेळांचिया परवडी । देऊनि पुरविली आवडी । दिसों न दिधलीं बापुडीं । नाना सांकडीं सोसिलिया ॥२६५॥कंसभयाच्या संकटीं । विघ्नें सोशिलीं कोट्यनुकोटी । येव्हडी साहोनियां साहोनियां अटाटी । नुमसां गोठी कोठें कैं ॥६६॥पोषण पालन ऐसिया परी । तुम्हांपासूनि राममुरारी । पावोनि वाढले तुमचे घरीं । गोष्ठी दुसरी न जाणतां ॥६७॥तुम्हीच केवल मातापिता । ऐशी भावना यांचिया चित्ता । न विसंबलां रक्षण करितां । नेत्रपातांचिया परी ॥६८॥पातीं सदैव रक्षिती बुबुळां । तैसे परी तुम्ही या बाळां । यास्तव निर्भय खेळती खेळां । मनें मोकळा वावरूनी ॥६९॥तस्मात सदय सज्जनांसी । भावना नाहीं स्वपर ऐसी । हें काय वदिजे तुम्हांपाशीं । परि सदैव मानसीं स्मरत असों ॥२७०॥ऐशी देवकी रोहिणी । यशोदेप्रति उपकारश्रेणी । स्मरोनि वदल्या मंजुळवाणी । त्या घातल्या श्रवणीं नृपाचिये ॥७१॥त्या वरी गोपींचा वोरस । विरहिणींचा संभ्रमरस । वाखाणील व्यासौरस । तोही विशेष अवधारा ॥७२॥श्रीशुक उवाच - गोप्यश्च कृष्णमुपलभ्य चिरादभीष्टं यत्प्रेक्षणे दृशिषु पक्ष्मकृतं शपन्ति । दृग्भिहृदीकृतमलं परिरभ्य सर्वास्तद्भावमापुरपि नित्ययुजां दुरापम् ॥३९॥गोपी पावोनि कृष्णसान्निध्य । संतत ध्यानयोगें जें साध्य । चिरकाळ अभीष्ट आत्माराध्य । म्हणती विरोध विधिकृत हा ॥७३॥बहुतां दिवशीं प्रियतमभेटी । यास्तव प्रेक्षणीं आवडी मोठी । परंतु विधीची करणी खोटी । जे पक्ष्मणीं दृष्टि वृथा केल्या ॥७४॥या लागीं शापिती विधातिया । म्हणती पातीं कां डोळियां । निर्मिली त्यांची विमेषक्रिया । हरि पहावया विक्षेपक ॥२७५॥अंगुळें मोडूनि कडकडाटीं । विधातियावरी क्षोभती पोटीं । कृष्णमूर्ति प्राशूनि दृष्टी । नेती भेटी हृदयकमळा ॥७६॥हृदयीं नेऊनि कृष्णध्यान । देती सप्रेम आलिङ्गन । ठाकती कृष्णमय होऊ । ताटस्थ्य संपूर्ण तनुभावा ॥७७॥योगाभ्यासी योगारूढ । त्यासिही प्राप्ति जे अवघड । ते चित्सुखावाप्ति लाहती उघड । प्रपंचकाबाड विसरूनी ॥७८॥ऐसिया स्वपादनिरता गोपी । जाणोनियां विश्वव्यापी । सभा सांडूनियां साक्षेपीं । तत्प्रेम जोपी तें ऐका ॥७९॥भगवांस्तास्तथाभूता विविक्त उपसङ्गतः । आश्लिष्यानामयं पृष्ट्वा प्रहसन्निदमब्रवीत ॥४०॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । यालागीं सर्वज्ञ श्रीभगवान । गोपीहृद्गत अनुभवून । एकान्तस्थान प्रवेशला ॥२८०॥गोपी पावल्या चित्सुखावाप्ति । हृदयीं कवळूनि आपुली मूर्ति । ऐसें जाणोनि कमलापति । तयां एकान्तीं भेटला ॥८१॥विविक्तस्थानीं अंतरवेत्ता । जाला गोपींतें आळंगिता । अंतरबाह्य पूर्णावस्था । त्या तन्मयता अनुभविती ॥८२॥ऐसिया गोपी कवळूनि हृदयीं । विश्रान्ति पावविल्या अक्षयी । क्षेम कुशल अनामयीं । प्रश्नप्रवाहीं श्रम नुरवी ॥८३॥हास्यवदनें गोपींप्रति । मधुरोत्तरीं कमलापति । बोलता जाला तेंचि श्रोतीं । एकाग्रवृत्ति परिसावें ॥८४॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP